Homeताज्या बातम्याथाळनेर-भोरटेक रस्त्यावर भीषण अपघात तीन चाकी वाहनाखाली दबून...

थाळनेर-भोरटेक रस्त्यावर भीषण अपघात तीन चाकी वाहनाखाली दबून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

शिरपुर (प्रतिनिधी) – शिरपूर तालुक्यातील थाळनेर-भोरटेक मार्गावर गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलस्वार तरुणाचा तीन चाकी वाहनाखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, थाळनेर येथील ईश्वर निळकंठ कोळी (वय ४२) हे गुरुवारी दुपारी सुमारे २ वाजेच्या सुमारास आपल्या मोटरसायकलने भोरटेक गावाकडून थाळनेरकडे येत होते. त्याचवेळी मुडावाद येथील महादेव मंदिराचे दर्शन घेऊन काही महिला GJ-21-V-6857 क्रमांकाच्या तीन चाकी वाहनाने होळनांथे गावाकडे परतत होत्या.

दरम्यान, भरधाव वेगातील तीन चाकी वाहनाचे टी-पॉइंटजवळ नियंत्रण सुटले. समोरून येणारे वाहन पाहून ईश्वर कोळी यांनी मोटरसायकल रस्त्याच्या कडेला थांबवली होती. मात्र, नियंत्रण सुटलेल्या वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. धडकेनंतर तीन चाकी वाहन मोटरसायकलवर पलटी झाल्याने ईश्वर कोळी हे वाहनाखाली दबले गेले.

घटनास्थळी उपस्थित महिलांनी व ग्रामस्थांनी तातडीने वाहन उचलून जखमी ईश्वर कोळी यांना बाहेर काढले. मात्र, अपघातानंतर वाहन चालकाने मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याचे सांगण्यात येत आहे. भोरटेक परिसरातील शेतकऱ्यांनी तत्काळ मदतकार्य करत जखमींना थाळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणीअंती ईश्वर कोळी यांना मृत घोषित केले.

मयत ईश्वर कोळी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व चार मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे थाळनेर परिसरात शोककळा पसरली असून रात्री तापी नदीकाठी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

याप्रकरणी थाळनेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय भाटेवाल करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खरीप हंगामात एल निनोचा धोका वाढल्याने 181 महा ब्लॉक्स कृषी तणावासाठी अत्यंत असुरक्षित आहेत

एल निनोच्या चिंतेमध्ये राज्य खरीप हंगामाकडे जात असताना या अहवालाला महत्त्व प्राप्त झाले आहे पुणे : महाराष्ट्रातील एकूण 353 पैकी निम्म्याहून अधिक (181)...

हुक्का फ्लेवर्स, गांजा, दारूवर बंदी : पुण्यात रात्री उशिरा पार्टी छाप्यात 107 पुरुष, 49...

पुणे रेव्ह पार्टीतून अल्पवयीन मुलांसह १५६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी पहाटे लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तुळापूर...

पुणे पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी २६ वर्षीय तरुणाला अटक

पुणे : गुलटेकडी येथील मीनाताई ठाकरे वसाहत येथील रहिवासी (२६) यांना खडक पोलिसांनी शुक्रवारी पहाटे २.२० च्या सुमारास पोलीस ठाण्याच्या आवारात कर्मचाऱ्यांना...

मान्सूनने महाराष्ट्राचे दार ठोठावले आहे, परंतु कोरड्या हवेच्या ड्रॅगने देशांतर्गत कूच करण्याचा धोका आहे

दक्षिण कोकणात शनिवारी नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा आणि आशा निर्माण झाली. पुणे: नैऋत्य मोसमी पावसाने किनारपट्टीच्या काही भागात प्रवेश केल्याने...

दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्याच्या रहिवाशांच्या तक्रारीनंतर महापौरांनी भामा आसखेड युनिटला भेट दिली

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी पाणीपुरवठा विभागाला तत्काळ सुधारात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत आणि बाधित भागातील पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्व त्रुटी दूर...

error: Content is protected !!