Homeराजकीयशिरपूरातील शेकडो युवकांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश ...

शिरपूरातील शेकडो युवकांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत सलमान नूर काझी यांचे शक्तिप्रदर्शन

शिरपुर| प्रतिनिधी

धुळे येथील दुलारी गार्डनमध्ये शनिवारी (दि. ६ जून) शिवसेना (शिंदे गट) पक्षाची जिल्हास्तरीय आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत शिवसेना युवा नेते तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिक्षणमंत्री दादाजी भुसे, शिवसेना राष्ट्रीय सचिव भाऊसाहेब चौधरी, ज्येष्ठ नेते आनंद परांजपे, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार मंजुळा गावित, माजी आमदार शिरीष चौधरी, जिल्हाप्रमुख सतीष महाले यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी शिरपूर शहरातील युवा नेते तथा अल्पसंख्यांक विकास हक्क फाउंडेशनचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सलमान नूर काझी यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश करून राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने युवक आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला.

प्रवेश करणाऱ्यांमध्ये मस्तुफा बोहरी, अबरार शेख, रहीम शेख, जाबीर मलक, रईस मलक, इरफान मण्यार, आरिफ मलक, उस्मान, कमिल शेख, कालू दादा, नासिर हारून बागवान, तालिब शेख, आकीब शाह, जुनेद खान, अफसर मलक, मुजाहिद शेख, अदनान सय्यद, जैद सय्यद, फैजान मलिक यांच्यासह शेकडो युवा कार्यकर्त्यांचा समावेश होता.

यावेळी बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिरपूर शहरातील अल्पसंख्यांक विभागाच्या संघटनात्मक बांधणीसाठी आणि पक्षवाढीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याची ग्वाही दिली. “शिवसेना अधिक बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद दिली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

या भव्य पक्षप्रवेशामुळे शिरपूर शहरातील शिवसेनेची ताकद वाढणार असून आगामी स्थानिक राजकारणात त्याचे परिणाम दिसून येतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!