Homeताज्या बातम्याकोडीद ग्रामसंवादात विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या ...

कोडीद ग्रामसंवादात विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना

शिरपूर (प्रतिनिधी) : नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी गुरुवारी शिरपूर तालुक्यातील आदिवासीबहुल कोडीद गावाला भेट देत ग्रामसंवाद कार्यक्रमाद्वारे ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. यावेळी शासनाच्या विविध योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत आहे का, याची त्यांनी सविस्तर माहिती घेतली.

ग्रामसंवादादरम्यान नागरिकांनी सामाजिक अर्थसहाय्य योजनांमधील ई-केवायसी संदर्भातील अडचणी, तसेच लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी येणाऱ्या केवायसी समस्यांबाबत विभागीय आयुक्तांसमोर आपली मते मांडली. महिलांनीही विविध योजनांमधील अडचणींची माहिती दिली.

यावेळी कोडीद येथील अंगणवाडी केंद्रांच्या समस्या, आदिवासी आश्रमशाळेची स्थिती आणि आगामी शैक्षणिक वर्षासाठी करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. विभागीय आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

तसेच वनपट्टाधारकांच्या ई-केवायसीची स्थिती, ॲग्री स्टॅक आणि पीएम-किसान योजनेचा लाभ मिळत असल्याबाबत चौकशी करण्यात आली. गावातील प्रमुख कृषी पिके, खत व बियाणे पुरवठ्याची उपलब्धता याचीही माहिती त्यांनी जाणून घेतली.

यावेळी विभागीय आयुक्तांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी, स्वस्त धान्य दुकान आणि सेतू केंद्राची पाहणी करून नागरिकांना सेवा देताना येणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला. शासनाच्या विविध सेवांचा लाभ नागरिकांना वेळेत आणि प्रभावीपणे मिळण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

या दौऱ्यात जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेलदार, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार महेंद्र माळी, गटविकास अधिकारी प्रदीप पवार, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘वारंवार माझा अपमान केला’ : पुण्यातील टीसीएसच्या तांत्रिकाने गळफास घेतला; दोन महिला सहकाऱ्यांविरुद्ध एफआयआर

पुणे: आयटी फर्मच्या 48 वर्षीय कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या दोन कर्मचाऱ्यांसह तीन जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल...

‘2 महिला सहकाऱ्यांनी अनुकूल काम नाकारले, तज्ञांच्या बाहेर प्रकल्प नियुक्त केले’: पुणे टीसीएस तंत्रज्ञांनी...

पुणे: एका 48 वर्षीय TCS कर्मचाऱ्याचा, ज्याचा या महिन्याच्या सुरुवातीला आत्महत्येने मृत्यू झाला होता, त्याने तीन लोकांवर - दोन महिला सहकाऱ्यांसह -...

नोकरीच्या खोट्या जाहिरातींना बळी पडू नका: महा मेट्रो

पुणे : मेट्रो प्रशासनाने नोकरी इच्छूक आणि नागरिकांनी खोट्या भरतीच्या जाहिरातींबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.प्रशासनाने म्हटले आहे की "बेईमान घटक" अनैतिक...

मुंबई-आग्रा महामार्गावर इगतपुरीजवळ ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने तब्बल ५ तास वाहतूक कोंडी

पुणे : मुंबई-आग्रा महामार्गावरील इगतपुरीपासून जवळच असलेल्या मुंडे गावाजवळ शुक्रवारी पहाटे ट्रकची धडक बसल्याने सुमारे पाच तास वाहतूक विस्कळीत झाली होती.पहाटे साडेचारच्या...

PMC ने नागरी अभियांत्रिकी-माध्यम शाळांसाठी 101 कोटी रुपयांची PPP योजना पुढे ढकलली

नागरी संस्था नागरी इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालवण्याच्या प्रस्तावावर पुनर्विचार करेल पुणे : पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) स्थायी समितीने गुरुवारी इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालविण्यासाठी एनजीओला...

error: Content is protected !!