Homeक्राईमखंडेराव यात्रेत दुकानाच्या वादातून रक्तरंजित राडा कु-हाड, तलवार, काठ्यांचा ससर्रास वापर; १८...

खंडेराव यात्रेत दुकानाच्या वादातून रक्तरंजित राडा कु-हाड, तलवार, काठ्यांचा ससर्रास वापर; १८ जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल?

शिरपूर (प्रतिनिधी): शिरपूर शहरातील ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज मंदिर यात्रोत्सवात खेळण्यांची दुकाने लावण्याच्या कारणावरून दोन गटांत तुफान हाणामारी होऊन यात्रेच्या आनंदावर विरजण पडले. गुरुवारी (ता. ५) सायंकाळी खंडोबा मंदिराशेजारील मच्छीबाजार परिसरात घडलेल्या या खळबळजनक घटनेत कु-हाड, तलवार व लाकडी काठ्यांचा वापर झाल्याने अनेक जण जखमी झाले. प्रकरणी दोन्ही गटांच्या तक्रारीनुसार एकूण १८ जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेनिमित्त मच्छीबाजार परिसरात खेळण्यांची दुकाने लावण्यात आली होती. दुकानाच्या जागेवरून सुरू झालेला वाद काही क्षणांतच चिघळला आणि हाणामारीत रूपांतरित झाला. एका गटाने कु-हाड घेऊन केलेल्या हल्ल्यात प्रदीप मनोज भिल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर दुसऱ्या बाजूने काठ्यांनी केलेल्या मारहाणीत हात, पाय व पाठीवर जखमा झाल्या. भांडणादरम्यान आरोपींनी हातात शस्त्रे घेऊन परिसरातील दुकाने बळजबरीने बंद पाडत दहशत निर्माण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
दरम्यान, दुसऱ्या गटाकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीतही परस्परविरोधी आरोप करण्यात आले आहेत. आपल्यावर कु-हाड, तलवार व लाकडी दांडक्यांनी प्राणघातक हल्ला झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या हल्ल्यात रविंद्र आधार सोनवणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर शिरपूर येथील कॉटेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. इतर जखमींनाही उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दंगल, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव, शस्त्रांचा वापर व सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करणे आदी विविध कलमान्वये दोन्ही गटांतील १८ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पीएसआय संदीप दरवडे व पीएसआय कुशारे करीत आहेत.
या घटनेमुळे यात्रोत्सवाच्या काळात परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मच्छीबाजार व मंदिर परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात्रेतील भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांकडून सतर्कता वाढविण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड येथील रेस्टोबारमध्ये वादातून तिघांनी एकाला बेदम मारहाण केली

पुणे : दौंड तालुक्यातील सहजपूर गावात आदल्या दिवशी एका व्यक्तीचा (३९) चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी यवत पोलिसांनी मंगळवारी तिघांना अटक केली.याप्रकरणी पिंपळे गुरव रहिवासी...

जुन्नरमध्ये बिबट्याचे हल्ले कमी करण्यासाठी AI-आधारित सायरन, सेलफोन अलर्ट

पुणे: जुन्नर वनविभागाने 20 अतिसंवेदनशील गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्राणी शोधणे आणि सतर्कता यंत्रणा बसवली आहे, जेथे बिबट्याचे दर्शन आणि हल्ले रहिवाशांसाठी वारंवार धोक्याचे...

पोलीस वसाहतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला अटक

पुणे : शहरातील पोलीस वसाहतीत रविवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास समर्थ पोलिसांनी एका पोलीस हवालदाराच्या मुलाला (23) एका अल्पवयीन मुला (12) सोबत अश्लील चाळे...

जनगणना कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख सत्यापित करण्यासाठी QR कोड

पुणे: महाराष्ट्र 16 मे ते 14 जून या कालावधीत घरोघरी जाऊन गणनेचा सराव सुरू करणार असून, खऱ्या जनगणनेच्या अधिकाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी नवीन...

दरवाढीच्या भीतीने पेट्रोल, डिझेलच्या विक्रीत २० टक्क्यांनी वाढ, पंतप्रधानांची घोषणा

पुणे: इंधनाच्या संभाव्य दरवाढीच्या अंदाजात पेट्रोल पंपांवर कोणतीही गर्दी दिसत नसली तरीही गेल्या दोन-तीन दिवसांत शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत सुमारे 20% वाढ झाल्याचे...

error: Content is protected !!