शिरपूर हाडाखेड महात्मा गांधी सप्ताहाच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत संपूर्ण राज्यात अवैध मद्यनिर्मिती व तस्करीविरोधात विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत धुळे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे.
प्राप्त गुप्त माहितीच्या आधारे दिनांक ०८ ऑक्टोबर २०२५ रोजी कोळश्यापाणी शिवार (मोयदा), ता. शिरपूर, जि. धुळे येथे अवैधरीत्या बनावट देशी दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला. छाप्यात कौलारू घरात चालणाऱ्या या अवैध व्यवसायाचा भंडाफोड करण्यात आला. या ठिकाणाहून बनावट देशी दारूसह एक चारचाकी वाहन व एक दुचाकी वाहन मिळून एकूण ₹३,८४,०२०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागासाठी एक मोठे यश ठरली आहे.
ही कारवाई मा. श्री. राजेश देशमुख, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई; मा. श्री. प्रसाद सुर्वे, सहआयुक्त (अंमलबजावणी व दमन), राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई; मा. श्रीमती यू. आर. वर्मा, विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभाग, नाशिक; तसेच श्रीमती स्वाती काकडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत श्री. ए. पी. मते, निरीक्षक, सीमा तपासणी नाका, हाडाखेड; श्री. डी. पी. नहुल, निरीक्षक शिरपूर; श्री. हिप्परगेकर, प्र. निरीक्षक, भरारी पथक धुळे; श्री. राजेश धनवटे, निरीक्षक धुळे; तसेच श्री. एस. एस. निकम, दुय्यम निरीक्षक हाडाखेड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय जवान गोरख पाटील, प्रशांत बोरसे, हेमंत पाटील, एम. पी. म्हस्के, के. एम. गोसावी, केतन जाधव, प्रतीकेश भामरे तसेच वाहन चालक निलेश मोरे, विजय नाहींदे व रवींद्र देसले यांच्या पथकाने समन्वयाने ही कारवाई केली.
या धाडीत बनावट दारू उत्पादन व साठवणूक करणाऱ्या इसमांविरुद्ध आवश्यक गुन्हे नोंदविण्यात आले असून पुढील तपास अधीक्षक श्रीमती स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















