शिरपूर शहर पोलिसांनी गुप्त बातमीच्या आधारे पारधीवाडा, वाघाडी येथे मोठी कारवाई करत बनावट दारू तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ४ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आणखी दोन आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
या छाप्यात पोलिसांनी ४४० लिटर स्पिरीट, तब्बल २ हजार रिकाम्या दारूच्या बाटल्या, तयार केलेल्या दारूच्या बॉटल्स, विविध साहित्य तसेच बोलेरो पिकअप वाहन असा मुद्देमाल हस्तगत केला. या सर्व जप्त मालाची एकूण किंमत ₹४,२३,००० इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपी कोठडीत
या प्रकरणी पोलिसांनी चेतन राजु भोई (२८) व तुषार प्रभाकर बारी (२६, दोन्ही रा. आदर्शनगर, शिरपूर) यांना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना १ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, चौकशीत या प्रकरणात आणखी दोन आरोपींचा सहभाग असल्याचे उघडकीस आले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक कार्यरत आहे.
सदरची कारवाई यांनी केली
जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधिक्षक श्री. अजय देवरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनिल गोसावी यांनी केले. प्रत्यक्ष कारवाईत शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री. किशोरकुमार परदेशी यांच्यासह सपोनि/हेमंत पाटील, पोउनि/संदिप दरवडे, हेमंत खैरनार, पोउनि/सुरेश सोनवणे, पोहेकॉ रविंद्र आखडमल, राजेंद्र रोकडे, पोकॉ/आरीफ तडवी, सोमा ठाकरे, सचिन वाघ, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, भटु साळुंके, विनोद आखडमल, मनोज महाजन, प्रशांत पवार, मनोज दाभाडे व विवेकानंदन जाधव यांनी सहभाग घेतला.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















