Homeमहत्त्वाचेदहिवदमध्ये महसूल विभागाचा लोकाभिमुख उपक्रम “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला”...

दहिवदमध्ये महसूल विभागाचा लोकाभिमुख उपक्रम “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला” नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद एका दिवसात 800 हून अधिक लाभार्थींना विविध योजनांचा लाभ

शिरपूर | प्रतिनिधी

ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या थेट गावपातळीवर सोडवून शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महसूल विभागाने सुरू केलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान” अंतर्गत दहिवद येथे आयोजित समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे 800 हून अधिक लाभार्थींनी उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घेतला.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे आयोजन मा. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते आणि मा. उपविभागीय अधिकारी शिरपूर श्री. शरद मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक आणि तहसीलदार महेंद्र माळी यांच्या हस्ते झाले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती के. डी. पाटील, उपसभापती शेखर पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच, मंडळ अधिकारी व तलाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली

शिबिरात सेतू शाखेमार्फत उत्पन्न दाखले, अधिवास व जात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. संजय गांधी शाखेकडून मंजूर प्रकरणांची वाटपपत्रे देण्यात आली. पुरवठा विभागाने नवीन व दुबार शिधापत्रिकांचे वितरण केले, तर बालविकास विभागामार्फत बेबी किटचे वाटप करण्यात आले.

कृषी विभागाकडून ट्रॅक्टर अनुदान लाभार्थींना मंजुरी देण्यात आली तसेच माती परीक्षण अहवालही वितरित करण्यात आले. वनहक्क धारकांचे केवायसी देखील यावेळी पूर्ण करण्यात आले.

“योजनांचा लाभ गावातच मिळाल्याने समाधान”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना तहसीलदार महेंद्र माळी यांनी अभियानाचा उद्देश स्पष्ट केला. अध्यक्षीय भाषणात उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांनी विद्यार्थ्यांनी, शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी अशा शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

शासनाच्या विविध सेवा व योजना गावपातळीवर उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी दहिवद मंडळातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुका पोलीस ठाणे सांगवी पोलीस ठाणे म्हणजे कुणाचा “लाडका जावई”? इथे २ गाड्यांना...

शिरपुर |प्रतिनिधी धुळ्यात गुन्हेगार मोकाट, कायदा-सुव्यवस्था वाऱ्यावर. एकीकडे ठाणेदार हवालदारासाठी वरिष्ठांकडे हात जोडतात, ड्युटी करता करता पोलिसांची हाडं खिळखिळी होतात. आणि दुसरीकडे शिरपूर तालुका  सांगवी...

रोबोटिक शस्त्रक्रियेने व्यावसायिकाला हिप रिप्लेसमेंटच्या दुःस्वप्नापासून वाचवले

पॉलीलिनरसह सिरेमिक रोपण पुणे: दोन वर्षांपूर्वी, जेव्हा एका 40 वर्षीय व्यावसायिकाने, आजारी लठ्ठपणाशी झुंज देत, हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया केली, तेव्हा त्याला "आयुष्य बदलणारी"...

पीएमसीने डेक्कनमधील आरसीसी क्लासेससाठी वापरलेली जागा बेकायदेशीर वापर आणि संरचनात्मक बदलांशी संबंधित अनेक उल्लंघनांसाठी...

डेक्कनमधील शिवराज मोटेगावकर संचालित आरसीसी क्लासेस हे कोचिंग सेंटर बुधवारी सील करण्यात आले.डेक्कनमधील शिवराज मोटेगावकर संचालित आरसीसी क्लासेस या कोचिंग सेंटरचा परिसर बुधवारी...

शिरपूर शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई..! “टँगो पंच” बनावट देशी दारू कारखाना उद्ध्वस्त मानवी जीवाशी...

शिरपूर | प्रतिनिधी धुळे जिल्ह्यात शिरपूर येथे मानवी जीविताला धोका निर्माण करणाऱ्या बनावट देशी दारू व्यवसायाविरोधात शिरपूर शहर पोलिसांनी मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत...

पुणे कँट पार्किंग शुल्क वाढीमुळे नागरिकांची नाराजी आहे. पुणे बातम्या

पार्किंगच्या पायाभूत सुविधा आणि वाहतूक व्यवस्था सुधारल्याशिवाय सुधारित शुल्कांना जनतेचा विरोध होत राहील, असे रहिवाशांनी सांगितले. पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या (पीसीबी) दुचाकी...

error: Content is protected !!