Homeमहत्त्वाचेशिरपूर तालुका पोलीस ठाणे सांगवी पोलीस ठाणे म्हणजे कुणाचा “लाडका जावई”? इथे...

शिरपूर तालुका पोलीस ठाणे सांगवी पोलीस ठाणे म्हणजे कुणाचा “लाडका जावई”? इथे २ गाड्यांना ५ सारथी, १५ पोलिस कर्मचारी फुकटचा पगार खातात!  बाकीच्या ठाण्यांत मात्र “एक प्यादा, शंभर कामं”

शिरपुर |प्रतिनिधी

धुळ्यात गुन्हेगार मोकाट, कायदा-सुव्यवस्था वाऱ्यावर. एकीकडे ठाणेदार हवालदारासाठी वरिष्ठांकडे हात जोडतात, ड्युटी करता करता पोलिसांची हाडं खिळखिळी होतात. आणि दुसरीकडे शिरपूर तालुका  सांगवी पोलीस ठाणे? अहो, हे तर धुळ्याचं “स्वित्झर्लंड”! वरकमाईवाल्यांसाठी नंदनवन!

“अजब तुझा कारभार, सांगवी सरकार”..!

मंजूर गाड्या फक्त दोन. पण स्टेअरिंग धरायला ड्रायव्हर नेमले पाच आणि एका गाडीमागे अडीच ड्रायव्हर – हा आकडा बघून गणिताचं पण डोकं फिरेल.  हे “पंचरत्न” आहेत तरी कोण?  चालक.  साहेब, हे गाडी चालवतात की ठाण्यात बसून फक्त चहा पितात? जनतेच्या पैशावर असला तमाशा?

१५ “गेस्ट आर्टिस्ट” कुणाच्या वशिल्याने?

मंजूर पदांपेक्षा १५ पोलिस कर्मचारी जास्त आहेत. जिल्ह्यातली इतर पोलिस ठाण्यात मनुष्यबळासाठी तडफडत असताना इथे मात्र जवान शिळे होत पडलेत.

हा काय “मामा-भाच्याचा” वाटा आहे का? कुणाच्या फोनवर या बदल्या झाल्या? कुणाच्या ताटाखालचं मांजर आहे?

पोलीस खात्यात दबक्या आवाजात चर्चा आहे – “वजन” ठेवल्याशिवाय सांगवीत पोस्टिंग मिळत नाही! हे मात्र तेवढं सत्य आहे. असे सांगितलं जातं.

आई-बहीण सुरक्षित कुठे.?

बलात्कार, विनयभंग, कौटुंबिक हिंसाचार… बाईने तक्रार घेऊन जायचं कुठे? सांगवीत महिला पोलीस शोधावी लागते भिंग घेऊन.  १५ पोलिस कर्मचारीची फौज पोसायला पैसे आहेत, पण माहिला कॉन्स्टेबल द्यायला खात्याकडे बजेट नाही? तर पीडितेच्या डोळ्यातले पाणी पुसायला तरी कुणी महिला पोलीस हवी की नको?

एसपी साहेब, डोळे उघडा..!

हा सावळा गोंधळ किती दिवस चालणार? सांगवी पोलिस ठाण्यावर एवढी “ममता” का? बाकीच्या ठाण्यांच्या कपाळावर काय “अवदसेचं” कुंकू लावलंय?

जनता विचारतेय – या “मेहेरबानी”चा रेट काय?

एसपी साहेब, आता तरी या “लाडक्या” ठाण्याचं बस्तान हलवा. समान वाटप करा, नाहीतर उद्या धुळे जिल्हा पोलीस दलात अजून नवीन चर्चेचा विषय तयार होण्यास मदत होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सांगवी पोलीस ठाणे म्हणजे कुणाचा “लाडका जावई”..? २ गाड्यांना ५ सारथी, मंजूर संख्याबळापेक्षा १५...

शिरपुर | प्रतिनिधी धुळे जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना अनेक पोलीस ठाण्यांमध्ये कर्मचारी अभावी पोलिसांची अक्षरशः दमछाक होत आहे. कुठे एकाच कर्मचाऱ्यावर तीन-तीन...

रोबोटिक शस्त्रक्रियेने व्यावसायिकाला हिप रिप्लेसमेंटच्या दुःस्वप्नापासून वाचवले

पॉलीलिनरसह सिरेमिक रोपण पुणे: दोन वर्षांपूर्वी, जेव्हा एका 40 वर्षीय व्यावसायिकाने, आजारी लठ्ठपणाशी झुंज देत, हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया केली, तेव्हा त्याला "आयुष्य बदलणारी"...

पीएमसीने डेक्कनमधील आरसीसी क्लासेससाठी वापरलेली जागा बेकायदेशीर वापर आणि संरचनात्मक बदलांशी संबंधित अनेक उल्लंघनांसाठी...

डेक्कनमधील शिवराज मोटेगावकर संचालित आरसीसी क्लासेस हे कोचिंग सेंटर बुधवारी सील करण्यात आले.डेक्कनमधील शिवराज मोटेगावकर संचालित आरसीसी क्लासेस या कोचिंग सेंटरचा परिसर बुधवारी...

शिरपूर शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई..! “टँगो पंच” बनावट देशी दारू कारखाना उद्ध्वस्त मानवी जीवाशी...

शिरपूर | प्रतिनिधी धुळे जिल्ह्यात शिरपूर येथे मानवी जीविताला धोका निर्माण करणाऱ्या बनावट देशी दारू व्यवसायाविरोधात शिरपूर शहर पोलिसांनी मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत...

दहिवदमध्ये महसूल विभागाचा लोकाभिमुख उपक्रम “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला” नागरिकांचा उत्स्फूर्त...

  शिरपूर | प्रतिनिधी ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या थेट गावपातळीवर सोडवून शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महसूल विभागाने सुरू केलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान” अंतर्गत दहिवद...

error: Content is protected !!