धुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीला वेसण घालण्यासाठी राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहिमेने धुळे पोलिस दलाने पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. जिल्हाभरात एकाचवेळी घेतलेल्या विशेष कारवाईत पोलिसांनी अवैध धंद्यांवर धाडी टाकत शेकडो गुन्हे नोंदवले, संशयितांना ताब्यात घेतले, तर हरविलेल्या तब्बल ४८ महिला आणि मुली यशस्वीपणे स्वगृही परत आणल्या. या मोहिमेमुळे अनेक कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई राबवण्यात आली.
पोलिसांकडून कारवायांचा सपाटा !
जिल्हाभरात ऑपरेशन ऑल आऊटसाठी १९ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. यादरम्यान अवैधधंद्यांवर धाडी टाकण्यात आल्या. पोलिसांच्या कारवाईत दोन तलवारी, एक कोयता हस्तगत झाला. चितोड रोडवरील चंद्रकांत गजानन थोरात याच्याकडून एक तलवार व एक कोयता मिळून आला, तर चाळीसगाव सगाव रोडवरील सोएल आरिफ शहा याच्याकडून एक तलवार मिळाली. तसेच गावठी हातभट्टींवर टाकलेल्या धाडीत १० हजार ८४१ लिटर दारू व रसायन मिळून आले. मुद्देमालाची किंमत सुमारे १२ लाख रुपये इतकी आहे. याप्रकरणी पोलिसांनी ७१ जणांवर गुन्हे दाखल केले. तर देशी व विदेशी दारू संदर्भात ७ जणांवरगुन्हा दाखल झाला. शिवाय जुगार खेळणार्यांनाही दणका देण्यात आला आहे. यात पोलीस दप्तरी ३४ केसेस व ३९ आरोपींची नोंद झाली. विशेष म्हणजे पानटपरीवर अंमली पदार्थाची विक्री करणार्यांवरही फौजदारी कारवाई झाली. यात ७८ गुन्हे दाखल झाले. तर ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’च्या ११ आणि मद्य प्राशून धिंगाणा घालणार्यांवर ७ गुन्हे पोलिसांनी नोंदविले.
बार, ढाबे आणि ओयो हॉटेल्सची झाडाझडती
पोलिसांनी बार, ढाबे आणि हॉटेल्स यांची झाडाझडती घेतली. सुमारे दी २२० ठिकाणी पोलिसांनी तपासणी केली. यात ५ ओयो हॉटेल्सचाही समावेश आहे. तर मोटार वाहन कायद्यान्वये ८४९ केसेस पोलिसांनी नोंदविल्या असून याद्वारे ५ लाख ९३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच ६४३ दुचाकी व चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली.
हिस्ट्रीशीटर आणि वॉन्टेड आरोपींना अटक
विशेष म्हणजे पोलिसांनी हिस्ट्रीशीटर गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. अफजल लयस मोहम्मद खान (रा. साबीरनगर, धुळे) व पापा फरोज शहा (रा. दोंडाईचा) या दोघा वॉन्टेड आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेनेएलसीबी) ताब्यात घेतले. तसेच तडीपार असणाऱ्या आनंद उर्फ वावड्या दत्तात्रय पाटील (रा. बारी गल्ली, शिरपूर) व मयूर उर्फ बबुआ सुरेश कंदारे (रा. मील परिसर, धुळे) यांच्यावरही कारवाई करण्यात आली. कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून पोलिसांनी आक्षेपार्ह ‘रिल’ बनविणाऱ्या राम गोरख जाधव (२१, रा. अण्णाभाऊ साठे नगर, फाशी पूल) आणि शंभर फुटी रस्त्यावरील एका अल्पवयीन मुलाला बरे कडक समज दिली आहे. शिवाय पोलिसांनी ४१ जणांना वॉरंट बजावले ही असून यात १८ नॉन-बेलेबल तर २३ बेलेबल वॉरंटचा समावेश आहे.
रात्रीच्या अंधारात हिंडणाऱ्यांवर कारवाई
रात्रीच्या अंधारात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या ७ जणांवर पोलिसांनी ती महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ प्रमाणे कारवाई केली. यात भुर्या उर्फ दरबारसिंह कमलसिंह राजपूत (रा. अमोदा), संजय मनोहर शिंदे (रा. समता नगर, धुळे), फैजान उर्फ इन्या मुजमील अन्सारी (रा. हाजी नगर, धुळे), शाबीर शहा, शब्बीर शहा (रा. तिरंगा चौक, धुळे), मोईन खान फिरोज खान (रा. जुने धुळे), जावेद नबी पिंजारी व खत्री उर्फ शहीद जावेद शहा (रा. अशोक नगर, दोंडाईचा) यांचा समावेश आहेसायबर गुन्हेगारांसाठी इशारा सोशल मीडियावर चिथावणीखोर
तसेच गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या पोस्ट्स प्रचंड व्हायरल केल्या जात आहेत. या विरोधात पोलिसांनी झिरो टॉलरन्सचे धोरण स्वीकारले आहे. पोलिसांनी आक्षेपार्ह ६ अकाऊंट शोधून ते डिलीट करण्यासाठी मेटा कंपनीकडे प्रस्ताव पाठविला असून संबंधितांवर फौजदारी कारवाई होणार आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना सावध रहाणे हेच शहाणपणाचे ठरणार आहे.
हरविलेल्या महिला-मुलींचा शोध
एरव्ही बेपत्ता झालेली व्यक्ती लवकर सापडत नाही. परंतु धुळे पोलिसांनी हरविलेल्या ४८ महिला व मुलींचा छडा लावून त्यांना स्वगृही परत आणले. तर ५ बेपत्ता पुरुषांनाही शोधण्यात आले. यासह एक अपहरण झालेली मुलगी धुळे तालुका पोलिसांनी पलसाणा (ता. जि. सुरत) येथून शोधून काढली असून याप्रकरणी आरोपीवर कायदेशीर कारवाई होणार आहे.
जनतेचा पोलिसांवर विश्वास अधिक दृढ
धुळे पोलिसांच्या या सर्वंकष कारवाईमुळे नागरिकांमध्ये प्रचंड समाधान व्यक्त होत आहे. पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि जबाबदारी यामुळे गुन्हेगारीला निश्चितच वेसण बसेल, असा विश्वास जनतेने व्यक्त केला आहे. ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहिमेने केवळ गुन्हेगारांना धडा शिकवला नाही, तर धुळे पोलिस दलाचा कायदा आणि नागरिकांचा विश्वास हा बोधवाक्य अधिक दृढ केला आहे.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















