शिरपूर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी रात्री सिनेमालाही लाजवेल अशी कारवाई घडली. शिरपूर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर फक्त काही मिनिटांत पथकाने सापळा रचला आणि कट्टा घेऊन फिरणाऱ्या दोन तरुणांना पल्सरसह जेरबंद केले. या कारवाईदरम्यान मिळालेला मुद्देमाल पाहून पथकाने स्वतःही सुटकेचा निश्वास टाकला.मा. पोनि जयपाल हिरे यांना उशिरा रात्री धडकी भरवणारी माहिती मिळाली—“आंबा ते लालमाती रस्त्यावरून एक पल्सर वेगाने येत आहे… डबलसीट… समोरच्याने काळं जॅकेट घातलंय… कमरेला गावठी कट्टा आहे!” क्षणाचाही विलंब न करता आदेश सुटले आणि पोसई मनोज कचरे यांच्यासह डीबी पथकाने महामार्ग क्रमांक 52 वर हेरगिरी सुरू केली.नेमके वर्णनाप्रमाणेच काळ्या पल्सरची हेडलाईट दूरवर दिसू लागली… पथक हायअलर्ट! पल्सर जवळ येताच पोलिसांनी आडवा पाडलेला सापळा पाहून चालक गोंधळला आणि क्षणात दोघेही जाळ्यात अडकले.चौकशीत संशयितांनी आपली नावे सांगितली— प्रकाश लक्ष्मण राठोड (23) आणि साहिल युनूस शेख (20), दोघेही पुणे निवासी.गावठी बनावटीची पिस्तूल — किंमत 25,000 दोन जिवंत काडतुसे — किंमत 2,000 पल्सर मोटारसायकल MH-16-DN-5002 — किंमत 50,000 एकूण मुद्देमाल प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात विविध अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोसई मनोज कचरे करीत आहेत.
ही कारवाई खालील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे : मा. पोलीस अधीक्षक धुळे श्री. श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे, उप विभागीय पोलीस अधिकारी शिरपूर विभाग श्री. सुनिल गोसावी, तसेच शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोसई मनोज कचरे, पोसई मिलींद पवार, संतोष पाटील, संदिप ठाकरे, योगेश मोरे, संजय भोई, सुनिल पवार आणि धनराज गोपाळ सहभागी कारवाई केली आहे.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















