Homeराजकीयजि. प. निवडणुका कधी होणार? आरक्षणाचा पेच कायम; इच्छुकांचा संयम सुटण्याच्या...

जि. प. निवडणुका कधी होणार? आरक्षणाचा पेच कायम; इच्छुकांचा संयम सुटण्याच्या मार्गावर २१ जानेवारीच्या सुनावणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष

शिरपुर धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा प्रश्न अद्यापही अनिश्चिततेच्या अंधारातच अडकलेला आहे. नगरपरिषद निवडणुकांचा धुरळा खाली बसताच आता ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अपेक्षा वाढली होती. मात्र आरक्षणाच्या टक्केवारीचा गुंता न सुटल्याने निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी, इच्छुक उमेदवारांचा संयम सुटण्याच्या मार्गावर असून राजकीय वातावरणात अस्वस्थता वाढताना दिसत आहे.

धुळे जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ६५ गट, तर धुळे, साक्री, शिंदखेडा आणि शिरपूर या चार पंचायत समित्यांचे एकूण १२२ गण निवडणुकीसाठी सज्ज आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून इच्छुक उमेदवारांनी जनसंपर्क, सामाजिक उपक्रम, कार्यक्रमांचे आयोजन आणि प्रचाराची रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. मात्र निवडणूक जाहीर न झाल्याने या साऱ्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आरक्षणाचा तिढा; निवडणूक प्रक्रियेला ब्रेक

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण मर्यादेचा मुद्दा सध्या न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेला आहे. काही जिल्ह्यांमध्ये आरक्षणाची टक्केवारी ५७ टक्क्यांपर्यंत गेल्याने निवडणूक आयोगालाही निर्णय घेणे अवघड बनले आहे. यामुळेच निवडणुका लांबणीवर पडल्या असून आता २१ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या महत्त्वपूर्ण सुनावणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

खर्च वाढतोय, कार्यकर्त्यांत नाराजी

वारंवार निवडणुका पुढे ढकलल्या जात असल्याने इच्छुक उमेदवारांचा निवडणूकपूर्व खर्च प्रचंड वाढत आहे. प्रचार साहित्य, संपर्क मोहिमा, कार्यक्रम यावर खर्च सुरूच असून “निवडणूक होणार तरी कधी?” या प्रश्नामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम, नाराजी आणि उदासीनता पसरू लागली आहे.

प्रशासक राज; लोकशाहीचा आवाज दाबला जातोय का?

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर सध्या प्रशासक राज सुरू असल्याने लोकनियुक्त प्रतिनिधींचा अभाव तीव्रतेने जाणवत आहे. ग्रामीण विकास, स्थानिक प्रश्न, योजनांची अंमलबजावणी यासाठी लोकप्रतिनिधींची गरज असताना निवडणुका लांबणीवर पडणे म्हणजे लोकशाही प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

२१ जानेवारीनंतरच स्पष्ट दिशा

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणासंदर्भात स्पष्ट निर्णय दिल्यास निवडणूक आयोगाकडून तत्काळ निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत मात्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे भवितव्य न्यायालयीन निकालावरच अवलंबून राहणार असून संपूर्ण धुळे जिल्हा अजूनही ‘वेटिंग मोड’मध्येच आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पोलीस वसाहतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला अटक

पुणे : शहरातील पोलीस वसाहतीत रविवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास समर्थ पोलिसांनी एका पोलीस हवालदाराच्या मुलाला (23) एका अल्पवयीन मुला (12) सोबत अश्लील चाळे...

जनगणना कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख सत्यापित करण्यासाठी QR कोड

पुणे: महाराष्ट्र 16 मे ते 14 जून या कालावधीत घरोघरी जाऊन गणनेचा सराव सुरू करणार असून, खऱ्या जनगणनेच्या अधिकाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी नवीन...

दरवाढीच्या भीतीने पेट्रोल, डिझेलच्या विक्रीत २० टक्क्यांनी वाढ, पंतप्रधानांची घोषणा

पुणे: इंधनाच्या संभाव्य दरवाढीच्या अंदाजात पेट्रोल पंपांवर कोणतीही गर्दी दिसत नसली तरीही गेल्या दोन-तीन दिवसांत शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत सुमारे 20% वाढ झाल्याचे...

पुणे जिल्हा प्रशासनाने उष्णतेच्या लाटेचा सल्ला जारी केला आहे, कंपन्यांना कामगारांसाठी पंखे आणि विश्रांतीची...

पुणे: जिल्हा प्रशासनाने बुधवारी उष्णतेच्या लाटेचा सल्ला जारी करून उद्योग, कारखाने आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या आयोजकांना कामगार आणि अभ्यागतांसाठी पिण्याचे पाणी, छायांकित विश्रांती...

बारामती हवाई पट्टीजवळ प्रशिक्षण विमान कोसळले, पायलट किरकोळ जखमी होऊन बचावला

पुणे: रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीचे एक विमान बुधवारी सकाळी 8.50 च्या सुमारास पुणे जिल्ह्यातील बारामती हवाई पट्टीजवळ क्रॅश लँड झाले आणि प्रशिक्षणार्थी वैमानिक किरकोळ...

error: Content is protected !!