शिरपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिरपूर येथील जनक विला, आमदार कार्यालयाच्या प्रांगणात माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम दादा पावरा व अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत 29 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी आमदार अमरिशभाई पटेल यांनी अतिशय दुःखी होऊन स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या बद्दलच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. ज्येष्ठ नेते खा. शरद पवार साहेब व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याशी अतिशय जिव्हाळ्याचे, कौटुंबिक व सहानुभूतीपूर्ण नाते होते. महाराष्ट्राला पुढे नेण्याचे व जनतेला न्याय देण्याचे काम त्यांनी मनापासून केले. शिस्तप्रिय व अभ्यासू मंत्री म्हणून आम्ही त्यांच्याकडे नेहमी पाहत होतो. त्यांच्या कामकाजातील काटेकोरपणा, निर्णयक्षमता आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यासाठी ते परिचित होते. महाराष्ट्राच्या राजकारणात अजित दादांनी दिलेले योगदान सदैव आमच्या स्मरणात राहील असे सांगून भाईंनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. शिरपूर येथील पाणी पुरवठा ऑटोमेटिक यंत्रणा, गार्डन, अनेक विकासकामे पाहून अजित दादा कौतुक करायचे. शिरपूरच्या अनेक विकासकामांसाठी त्यांनी मदत केली. आमचे जवळचे कौटुंबिक संबंध होते. अजित दादा गेल्याने महाराष्ट्र राज्याचे फार मोठे नुकसान झाले आहे असे दुःख व्यक्त करत भाई म्हणाले.
आमदार काशिराम दादा पावरा यांनी अजितदादा पवार यांच्या सोबतच्या विधान भवनातील व मंत्रालयातील आठवणी सांगून अतिशय अभ्यासू नेते आपल्यातून गेल्याचे दुःख प्रकट केले.
यावेळी आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम दादा पावरा, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, माजी जि.प.अध्यक्ष डॉ. तुषारभाऊ रंधे, बाजार समिती सभापती के.डी.पाटील,
माजी जि.प.उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, सुभाष कुलकर्णी, नरेंद्रसिंग राजपूत, नारायणसिंग चौधरी, शिरपूर ग्रामीण अध्यक्ष भरत पाटील, सांगवी मंडळ अध्यक्ष योगेश बादल, थाळनेर मंडळ अध्यक्ष विरुपाल राजपूत, माजी तालुकाध्यक्ष किशोर माळी, सूतगिरणी उपाध्यक्ष संग्रामसिंग राजपूत, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष कैलासचंद्र अग्रवाल, महिला अध्यक्ष डॉ. वैशाली निकम, शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे सभापती शामकांत ईशी, वासुदेव देवरे, डॉ. वृषाली बडगुजर, गणेश सावळे, बाळासाहेब पाटील, पप्पू पाटील, अरुण धोबी, नगरसेवक, नगरसेविका, भाजपाचे पदाधिकारी, शिरपूर शहर व तालुक्यातील नागरिक, महिला, युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रस्ताविक के. डी. पाटील व आभार भरत पाटील यांनी मानले.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















