Homeराजकीयशिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या 2025 चे शिरपूरचा कौल स्पष्ट! नगराध्यक्षपद भाजपकडे; विरोधकांचा दारुण...

शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या 2025 चे शिरपूरचा कौल स्पष्ट! नगराध्यक्षपद भाजपकडे; विरोधकांचा दारुण पराभव

चिंतन पटेल यांचा ऐतिहासिक विजय; ३१ जागांवर भाजपाचा भगवा, शिरपूरमध्ये ‘एमआयएम’  एन्ट्री

शिरपूर | प्रतिनिधी

शिरपूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने राजकीय इतिहास घडवत दणदणीत विजय मिळवला असून नगराध्यक्षपद भाजपकडे आले आहे. भाजपाचे उमेदवार चिंतन पटेल यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवत नगराध्यक्षपदावर शिक्कामोर्तब केले. यासोबतच एकूण ३१ जागांवर भाजपाने वर्चस्व प्रस्थापित करत नगरपरिषद पूर्णतः आपल्या ताब्यात घेतली आहे.

या निकालामुळे शिरपूरच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून, आतापर्यंत प्रभावशाली मानल्या जाणाऱ्या एमआयएमचा तीन जागा पैकी एक जागा त्यांनी विजयी केले आहे . जनतेने स्पष्ट शब्दांत विकासाला पसंती दिली असून, जुन्या समीकरणांना सपशेल नकार दिला आहे.

मतमोजणी केंद्रावर उत्साह, शहरात जल्लोष

मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर भाजपाच्या आघाडीने विजय निश्चित होत गेल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. निकाल अधिकृत होताच शहरभर फटाके, ढोल-ताशे, गुलाल उधळत भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. “भाजप जिंदाबाद”च्या घोषणांनी संपूर्ण शिरपूर दुमदुमून गेले.

जनतेने दिला विकासाचा स्पष्ट आदेश

या निवडणुकीत जनतेने विकास, स्थिर प्रशासन, पारदर्शक कारभार आणि विश्वासार्ह नेतृत्वाला कौल दिला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण व शहराच्या नियोजनाबाबत असलेल्या अपेक्षा भाजपाच्या प्रचारातून प्रभावीपणे मांडल्या गेल्या.याउलट विरोधकांकडे ठोस विकास आराखड्याचा अभाव, अंतर्गत मतभेद आणि जनतेशी तुटलेला संवाद ही बाब त्यांना महागात पडली.

राजकीय विश्लेषण : भाजपाची संघटनात्मक ताकद निर्णायक

या दणदणीत विजयामागे भाजपाची मजबूत संघटना, बूथस्तरीय नियोजन, शिस्तबद्ध प्रचार आणि कार्यकर्त्यांची मेहनत हे महत्त्वाचे घटक ठरले. विशेषतः तरुण, मध्यमवर्गीय व नवमतदारांनी मोठ्या प्रमाणावर भाजपाच्या बाजूने कौल दिला.ही निवडणूक केवळ नगराध्यक्षपदापुरती मर्यादित न राहता, शिरपूरच्या पुढील राजकीय दिशेचा जनमतसंग्रह ठरली असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे

नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा निर्धार

विजयानंतर प्रतिक्रिया देताना नगराध्यक्ष चिंतन पटेल म्हणाले,“

शिरपूरच्या प्रत्येक नागरिकासाठी समान न्यायाने, प्रामाणिकपणे आणि वेगाने विकासकामे राबवू. जनतेने दिलेला विश्वास हीच माझी सर्वात मोठी जबाबदारी आहे.”

शिरपूरच्या विकासाचा नवा अध्याय सुरू

या निकालानंतर शिरपूर शहरासाठी विकासाचा नवा अध्याय सुरू झाला असून, भाजपाकडून मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. निवडणूक जिंकली असली तरी आता आश्वासने पूर्ण करण्याची खरी परीक्षा सुरू झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पोलीस वसाहतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला अटक

पुणे : शहरातील पोलीस वसाहतीत रविवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास समर्थ पोलिसांनी एका पोलीस हवालदाराच्या मुलाला (23) एका अल्पवयीन मुला (12) सोबत अश्लील चाळे...

जनगणना कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख सत्यापित करण्यासाठी QR कोड

पुणे: महाराष्ट्र 16 मे ते 14 जून या कालावधीत घरोघरी जाऊन गणनेचा सराव सुरू करणार असून, खऱ्या जनगणनेच्या अधिकाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी नवीन...

दरवाढीच्या भीतीने पेट्रोल, डिझेलच्या विक्रीत २० टक्क्यांनी वाढ, पंतप्रधानांची घोषणा

पुणे: इंधनाच्या संभाव्य दरवाढीच्या अंदाजात पेट्रोल पंपांवर कोणतीही गर्दी दिसत नसली तरीही गेल्या दोन-तीन दिवसांत शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत सुमारे 20% वाढ झाल्याचे...

पुणे जिल्हा प्रशासनाने उष्णतेच्या लाटेचा सल्ला जारी केला आहे, कंपन्यांना कामगारांसाठी पंखे आणि विश्रांतीची...

पुणे: जिल्हा प्रशासनाने बुधवारी उष्णतेच्या लाटेचा सल्ला जारी करून उद्योग, कारखाने आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या आयोजकांना कामगार आणि अभ्यागतांसाठी पिण्याचे पाणी, छायांकित विश्रांती...

बारामती हवाई पट्टीजवळ प्रशिक्षण विमान कोसळले, पायलट किरकोळ जखमी होऊन बचावला

पुणे: रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीचे एक विमान बुधवारी सकाळी 8.50 च्या सुमारास पुणे जिल्ह्यातील बारामती हवाई पट्टीजवळ क्रॅश लँड झाले आणि प्रशिक्षणार्थी वैमानिक किरकोळ...

error: Content is protected !!