Homeमहत्त्वाचेथाळनेर, अजनाडसह अनेक गावांत वादळी वाऱ्यासह गारपीट; केळी-पपईसह पिकांचे मोठे नुकसान आ....

थाळनेर, अजनाडसह अनेक गावांत वादळी वाऱ्यासह गारपीट; केळी-पपईसह पिकांचे मोठे नुकसान आ. अमरिशभाई पटेल व आ. काशिराम पावरा यांचे तातडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला आदेश

शिरपूर | प्रतिनिधी :
शिरपूर तालुक्यातील थाळनेर, अजनाड, सावेर, बभळाज, तरडी, होळनांथे, भाटपुरा आदी अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे केळी, पपई, गहू, मका, हरभरा यासह विविध पिके अक्षरशः जमीनदोस्त झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
ही घटना दि. 27 जानेवारी 2026 रोजी दुपारनंतर घडली असून अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी पिके आडवी झाली, तर जोरदार गारपिटीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. काही भागांत शेतांमध्ये पाणी साचून पिके कुजण्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व आमदार काशिराम दादा पावरा यांनी नुकसानग्रस्त गावांचा आढावा घेत तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. गावागावातील तलाठी व कृषी सहाय्यकांनी तात्काळ पंचनामे सुरू करावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली.
यावेळी तालुका कृषी अधिकारी तसेच अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते. शेतकऱ्यांनी आपले नुकसान प्रशासनासमोर मांडत, शासनाने तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी केली.
शेतकऱ्यांचा आक्रोश
या गारपीट-वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके पूर्णतः नष्ट झाली असून, तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. मोठ्या मेहनतीने उभे केलेले पीक काही मिनिटांत उद्ध्वस्त झाल्याने अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
मदतीची मागणी
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्व पिकांचे तातडीने पंचनामे करून शासनाने त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी ठाम मागणी आ. अमरिशभाई पटेल व आ. काशिराम पावरा यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड येथील रेस्टोबारमध्ये वादातून तिघांनी एकाला बेदम मारहाण केली

पुणे : दौंड तालुक्यातील सहजपूर गावात आदल्या दिवशी एका व्यक्तीचा (३९) चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी यवत पोलिसांनी मंगळवारी तिघांना अटक केली.याप्रकरणी पिंपळे गुरव रहिवासी...

जुन्नरमध्ये बिबट्याचे हल्ले कमी करण्यासाठी AI-आधारित सायरन, सेलफोन अलर्ट

पुणे: जुन्नर वनविभागाने 20 अतिसंवेदनशील गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्राणी शोधणे आणि सतर्कता यंत्रणा बसवली आहे, जेथे बिबट्याचे दर्शन आणि हल्ले रहिवाशांसाठी वारंवार धोक्याचे...

पोलीस वसाहतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला अटक

पुणे : शहरातील पोलीस वसाहतीत रविवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास समर्थ पोलिसांनी एका पोलीस हवालदाराच्या मुलाला (23) एका अल्पवयीन मुला (12) सोबत अश्लील चाळे...

जनगणना कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख सत्यापित करण्यासाठी QR कोड

पुणे: महाराष्ट्र 16 मे ते 14 जून या कालावधीत घरोघरी जाऊन गणनेचा सराव सुरू करणार असून, खऱ्या जनगणनेच्या अधिकाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी नवीन...

दरवाढीच्या भीतीने पेट्रोल, डिझेलच्या विक्रीत २० टक्क्यांनी वाढ, पंतप्रधानांची घोषणा

पुणे: इंधनाच्या संभाव्य दरवाढीच्या अंदाजात पेट्रोल पंपांवर कोणतीही गर्दी दिसत नसली तरीही गेल्या दोन-तीन दिवसांत शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत सुमारे 20% वाढ झाल्याचे...

error: Content is protected !!