Homeमहत्त्वाचेधुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेला नवी दिशा; अवैध धंद्यांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’...

धुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेला नवी दिशा; अवैध धंद्यांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करणार : एसपी विशाल आनंद सिंगुरी

शिरपूर  | प्रतिनिधी

धुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी कठोर आणि प्रभावी पावले उचलण्यात येणार असून, जिल्हा गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी पोलिस प्रशासन कटिबद्ध असल्याचा ठाम संदेश नवनियुक्त पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी यांनी दिला. पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या कामाची दिशा स्पष्ट करत गुन्हेगारीविरोधात व्यापक कृती आराखडा जाहीर केला.

पोलीस अधीक्षक सिंगुरी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत. विशेषतः ड्रग्ज, गांजा, भांग यांसारख्या तरुणाईला उद्ध्वस्त करणाऱ्या नशिल्या पदार्थांच्या विक्री व तस्करीवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच बनावट दारू निर्मिती, सट्टा, मटका आणि इतर अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वाढत्या शहर विस्तारामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येकडेही त्यांनी गांभीर्याने लक्ष वेधले. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी शिस्तबद्ध नियोजन केले जाईल तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे संकेत त्यांनी दिले.

प्रलंबित गुन्ह्यांतील फरार आरोपींना अटक करणे हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान असल्याचे सांगत, विशेष शोध मोहीम राबवून अशा आरोपींना लवकरात लवकर कायदेशीर प्रक्रियेत आणले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“पोलीस आणि जनता यांच्यातील समन्वय हा गुन्हेगारी रोखण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांनी निर्भयपणे माहिती द्यावी. संशयास्पद हालचाली, अवैध धंदे किंवा कोणतीही गोपनीय माहिती तात्काळ पोलिसांपर्यंत पोहोचवावी,” असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी त्यांनी सांगितले की, वरिष्ठांच्या आदेशांची जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. माध्यमांशी नियमित समन्वय राखण्यासाठी पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी वेळोवेळी अधिकृत माहिती प्रसारमाध्यमांना देणार आहेत.

आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विशेष पथके तयार करण्यात आल्याची माहिती देत, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पत्रकार परिषदेला अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय देवरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड येथील रेस्टोबारमध्ये वादातून तिघांनी एकाला बेदम मारहाण केली

पुणे : दौंड तालुक्यातील सहजपूर गावात आदल्या दिवशी एका व्यक्तीचा (३९) चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी यवत पोलिसांनी मंगळवारी तिघांना अटक केली.याप्रकरणी पिंपळे गुरव रहिवासी...

जुन्नरमध्ये बिबट्याचे हल्ले कमी करण्यासाठी AI-आधारित सायरन, सेलफोन अलर्ट

पुणे: जुन्नर वनविभागाने 20 अतिसंवेदनशील गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्राणी शोधणे आणि सतर्कता यंत्रणा बसवली आहे, जेथे बिबट्याचे दर्शन आणि हल्ले रहिवाशांसाठी वारंवार धोक्याचे...

पोलीस वसाहतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला अटक

पुणे : शहरातील पोलीस वसाहतीत रविवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास समर्थ पोलिसांनी एका पोलीस हवालदाराच्या मुलाला (23) एका अल्पवयीन मुला (12) सोबत अश्लील चाळे...

जनगणना कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख सत्यापित करण्यासाठी QR कोड

पुणे: महाराष्ट्र 16 मे ते 14 जून या कालावधीत घरोघरी जाऊन गणनेचा सराव सुरू करणार असून, खऱ्या जनगणनेच्या अधिकाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी नवीन...

दरवाढीच्या भीतीने पेट्रोल, डिझेलच्या विक्रीत २० टक्क्यांनी वाढ, पंतप्रधानांची घोषणा

पुणे: इंधनाच्या संभाव्य दरवाढीच्या अंदाजात पेट्रोल पंपांवर कोणतीही गर्दी दिसत नसली तरीही गेल्या दोन-तीन दिवसांत शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत सुमारे 20% वाढ झाल्याचे...

error: Content is protected !!