Homeमहत्त्वाचेशिरपूर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांना उत... ...

शिरपूर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांना उत… अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल नाही….

शिरपूर- येथील शिरपूर तालुका पोलिस ठाणे हे महाराष्ट्र व मध्यप्रदेश सिमेला लागून आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध धंद्यांना उत आला आहे. दारूची अवैध विक्री, गुटखा तस्करी, जुगार/मटका अड्डे, वाळू माफिया आणि अवैध जमीन/खनिज उत्खनन हे प्रमुख अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. या धंद्यांमुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असून, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहेत. पोलीस कारवाई होऊनही हे धंदे पुन्हा जोमाने सुरू होतात. पोलिस आणि महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहे. गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना अपयश आले असून अनेक पोलिस कर्मचारी गेल्या कित्येक वर्षांपासून थांड मांडून बसले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिरपूर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत भुरट्या चोरांची संख्या वाढली असून किरकोळ चोरीचे प्रमाण वाढले आहे. शेती अवजारे, विद्युत केबल, विद्युत मोटारींच्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. दारू, मटका असे अवैध धंदे कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत याची चर्चा सुरू आहे. गल्‍ली-बोळात सुरू असलेले जुगाराचे अड्डे, हॉटेल व ढाब्यावर मिळणारी दारू यामुळे तरूण पिढी व्यसनाच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. त्यातच बेकायदा सावकारीचे तालुक्याला ग्रहणच लागले आहे. हे सावकार मासिक 10 ते 15 टक्के आकारणी करून नागरिकांची लूट करत आहेत. यामुळे अनेकांनचे संसार उध्दवस्त होवू लागले आहेत. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने अवैध धंदे तेजीत असल्याचे चित्र आहे.

पैसे मिळविण्याच्या हव्यासात पूर्ण नुकसान

मटक्यात ओपन व क्‍लोज याप्रमाणे आकडे लावले जातात. ओपनमध्ये आकडा लागला तर लालसेपोटी आलेले पैसे परत क्‍लोज आकड्यात लावले जातात. परंतु, क्‍लोजमध्ये आकडा न लागल्याने मिळालेल्या रकमेलाही मुकावे लागते. तसेच व्यसनाधीनता वाढते. कमी अवधीत जास्त पैसे मिळवण्याच्या हव्यासात पूर्ण नुकसान होत आहे. त्यामुळे मटका बंद करावा, अशी मागणी नागरिक करत आहे. या सर्व बाबींकडे नुतन पोलीस अधीक्षक विशाल आनंद शिंगुरी यांनी जातीने लक्ष लावावे अशी मागणी सध्या करण्यात येत आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!