Homeक्राईमशिरपूरमध्ये बनावट दारू कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई ₹8.47...

शिरपूरमध्ये बनावट दारू कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई ₹8.47 लाखांचा मुद्देमाल जप्त; मुख्य आरोपी फरार

शिरपूर | प्रतिनिधी

राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यातील जामन्यापाडा शिवारात बनावट देशीदारू तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल ₹8 लाख 47 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मुख्य आरोपी घटनास्थळावरून पसार झाला आहे.

मा. श्री. राजेश देशमुख साहेब, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, मा. श्री. प्रसाद सुर्वे साहेब, सह आयुक्त (अं.व.द.), मा. श्रीमती यु.आर. वर्मा मॅडम, विभागीय उप आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक तसेच श्रीमती स्वाती काकडे मॅडम, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, धुळे यांनी बनावट मद्य निर्मिती व विक्री रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने ही धडक कारवाई करण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक देविदास नेहूल यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, ग्रामपंचायत न्यू बोराडी अंतर्गत जामन्यापाडा शिवारात मच्छिंद्र तारासिंग पावरा यांच्या झोपडीवजा घरात काही इसम बनावट देशीदारू तयार करत आहेत.

माहितीची खातरजमा करून दोन पंचांसमक्ष पथकाने छापा टाकला असता घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर बनावट दारू व साहित्य आढळून आले. यामध्ये —टँगो पंच 90 मिलीच्या 300 सीलबंद बाटल्या450 लिटर तयार बनावट देशीदारू12 हजार रिकाम्या बाटल्या500 लिटर शुद्ध मद्यार्क (स्पिरीट)5 हजार जिवंत बुचे300 रिकामे खोके20 प्लास्टिक ट्रे दोन कॅप सीलिंग मशीन स्पिरीट वासाचे प्लास्टिक केन बोलेरो पिकअप वाहन असा एकूण ₹8,47,400/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.दरम्यान, पथक घटनास्थळी पोहोचताच आरोपी राजेश पावरा व त्याचा साथीदार अंधाराचा फायदा घेत फरार झाले.या प्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम विविध अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींसह साहित्य पुरवठादारांचा शोध सुरू आहे.

ही कारवाई निरीक्षक देविदास नेहूल यांच्या नेतृत्वाखाली जवान काशिनाथ गोसावी, प्रतीकेश भामरे, वाहन चालक रविंद्र देसले यांनी केली. तसेच सीमा तपासणी नाका हाडाखेड येथील दुय्यम निरीक्षक मुकेश पाटील, जवान संतोष निकम, एम.पी. म्हस्के, हेमंत पाटील व वाहन चालक निलेश मोरे यांनी सहकार्य केले.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास अधीक्षक स्वाती काकडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक देविदास नेहूल करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भविष्यातील निवडणुकांवर लक्ष ठेवून AICC ने 69 शहर, जिल्हा अध्यक्षांची नियुक्ती केली आहे

एमपीसीसीचे उपाध्यक्ष मोहन जोशी पुणे : अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) ने 2029 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यात 69 नवीन शहर आणि जिल्हाध्यक्षांची...

अतिमासेमारी, हवामानातील बदल भारतातील सार्डिनची संख्या झपाट्याने कमी करू शकतात: अभ्यास | पुणे बातम्या

पुणे : हवामान-संबंधित बदलांसह मासेमारीच्या दाबात तीव्र वाढ, देशाच्या नैऋत्य किनारपट्टीवरील सार्डिनच्या संख्येवर गंभीरपणे परिणाम करू शकते.भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM) आणि...

पळवापळवीच्या तक्रारींनंतर पीएमसी प्रमुख पार्किंगच्या ठिकाणी कंत्राटदारांची नियुक्ती करणार आहे. पुणे बातम्या

जेएम रोडवर पीएमसीची बहुमजली इमारत पार्किंग पुणे : PMC द्वारे चालवल्या जाणाऱ्या विविध सुविधांना मोठ्या अपग्रेडची आवश्यकता असल्याच्या अनेक तक्रारींनंतर नागरी संस्थेने जेएम...

लोहेगाव हवाई तळाजवळ कचरा टाकणाऱ्यांना पक्ष्यांच्या हल्ल्याचा धोका वाढल्याने एफआयआरला सामोरे जावे लागू शकते.

लोहेगाव येथील एअरफोर्स स्टेशनच्या परिमितीच्या भिंतीबाहेर कचरा पुणे : लोहेगाव येथील भारतीय वायुसेना (IAF) स्टेशन एअरबेसजवळ कचरा टाकताना आढळलेल्या लोकांविरुद्ध पोलिस तक्रारी दाखल...

सांगवी पोलीस ठाणे म्हणजे कुणाचा “लाडका जावई”..? २ गाड्यांना ५ सारथी, मंजूर संख्याबळापेक्षा १५...

शिरपुर | प्रतिनिधी धुळे जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना अनेक पोलीस ठाण्यांमध्ये कर्मचारी अभावी पोलिसांची अक्षरशः दमछाक होत आहे. कुठे एकाच कर्मचाऱ्यावर तीन-तीन...

error: Content is protected !!