शिरपूर | प्रतिनिधी
शिरपूर शहरात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट मोटारसायकली आणि वाहनांच्या काचांवर काळ्या फिल्म लावणाऱ्यांविरोधात शिरपूर शहर पोलिसांनी कारवाई केली. करवंद नाका परिसरात ही कारवाई करण्यात आली.
मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या बुलेटस्वारांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असून, वाहनांवरील काळ्या काचांच्या फिल्मही काढण्यात आल्या. या कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.
शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शहरातील नागरिकांना कर्णकर्कश आवाजाचा त्रास होऊ नये आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन व्हावे, यासाठी पोलिसांकडून पुढेही अशा प्रकारची कारवाई सुरू ठेवण्यात येणार आहे.
पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांचा स्पष्ट इशारा — नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही; कारवाई यापुढेही सुरूच राहणार!
🚔 शिरपूर शहर पोलिसांची धडक कारवाई; नियम पाळा, अन्यथा कारवाईला सामोरे जा!

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















