Homeक्राईमपशुखाद्याच्या आड विदेशी दारूची तस्करी! कंटेनरमधून तब्बल २०.५०...

पशुखाद्याच्या आड विदेशी दारूची तस्करी! कंटेनरमधून तब्बल २०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त; एलसीबीची धडाकेबाज कारवाई

धुळे | प्रतिनिधी

पशुखाद्याच्या गोण्यांच्या आड विदेशी दारूचा मोठा साठा लपवून त्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर धुळे स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धडाकेबाज कारवाई केली. मुंबई-आग्रा महामार्गावरील अवधान चौफुली येथे रचलेल्या सापळ्यात कंटेनर पकडण्यात आला असून, विदेशी दारूसह कंटेनर व पशुखाद्य असा तब्बल २० लाख ५० हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी धुळे जिल्ह्यातील अवैध दारू निर्मिती व बेकायदेशीर वाहतुकीविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना १ ऑक्टोबर रोजी गोपनीय माहिती मिळाली की, नाशिकहून धुळ्याकडे येणाऱ्या एमएच १४ जीयू ५५५३ क्रमांकाच्या कंटेनरमध्ये विदेशी दारूचा साठा लपवून नेण्यात येत आहे.

माहिती मिळताच एलसीबीच्या पथकाने मुंबई-आग्रा महामार्ग क्रमांक ३ वरील अवधान चौफुली येथे सापळा रचला. अवधान टोलनाक्याकडून धुळ्याच्या दिशेने येणारा संशयित कंटेनर दिसताच पोलिसांनी तो थांबवून झडती घेतली. सुरुवातीला कंटेनरमध्ये पशुखाद्याच्या गोण्या दिसत असल्या तरी पोलिसांनी बारकाईने तपासणी केली असता पशुखाद्याच्या आड विदेशी दारूचे बॉक्स लपवून ठेवण्यात आल्याचे उघड झाले.

लाखोंची दारू, कंटेनरसह मोठा मुद्देमाल जप्त

कारवाईत अशोक लेलँड गुरु कंटेनरची किंमत १० लाख रुपये, पशुखाद्याच्या ५० गोण्या किंमत ५० हजार रुपये, तसेच विविध कंपन्यांची विदेशी दारू असा मोठा साठा जप्त करण्यात आला.

जप्त दारूमध्ये डॅमन अँड ड्यू, रॉयल चॅलेंज, डीएसपी ब्लॅक क्लासिक व्हिस्की, सिग्राम्स ब्लेंडर्स प्राईड रेअर प्रीमियम व्हिस्की, मास्टर ब्लेंडर्स सिग्नेचर रेअर एज्ड व्हिस्की आणि मॅजिक मोमेंट्स फ्लेवर्ड व्होडका यांचा समावेश आहे.

चौघांची नावे समोर

कंटेनरमध्ये चालक विजय सुरेश ठाणगे (४२) आणि क्लिनर इसाक नूर शेख (३६), दोघे रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर आढळून आले. पोलिसांच्या चौकशीत विशाल सुरेश ठाणगे, रा. श्रीरामपूर याने दारूचा साठा भरून दिल्याचे, तर तो बापू वाणी उर्फ विनोद वसंत देशमुख, रा. चोपडा, जि. जळगाव यांच्याकडे घेऊन जात असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी मोहाडी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३४/२०२६ दाखल करण्यात आला असून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम विविध अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एलसीबीच्या पथकाची उल्लेखनीय कामगिरी

पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि दीपक ढोके, पोलीस अंमलदार शिरीष भदाणे, सदेसिंग चव्हाण, संदीप पाटील, सतीश जाधव, मच्छिंद्र पाटील, जितेंद्र अहिरराव, महेंद्र सपकाळ, अतुल निकम आणि राजीव गिते सदरची  कारवाई यांनी केली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूरमध्ये गांजा तस्करांवर पोलिसांचा छापा! पॅकिंग सुरू असतानाच धाड; मध्य प्रदेशातील सरपंचासह तिघे पसार...

शिरपूर,  : गांजाची विक्री करण्यासाठी पॅकिंग सुरू असतानाच सांगवी पोलिसांनी धडक कारवाई करत छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळी असलेल्या तिघांनी पळ काढला. विशेष...

पळासनेर दरोडा प्रकरणी पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये! ३ कोटी ६ लाखांच्या लुटीने धुळे जिल्हा...

शिरपूर : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पळासनेर परिसरात तब्बल ३ कोटी ६ लाख रुपयांच्या रोकड रकमेवर दरोडा टाकण्यात आल्याच्या गंभीर घटनेने संपूर्ण धुळे जिल्ह्यात खळबळ...

पळासनेरजवळ महामार्गावर ३ कोटी ६ लाखांचा सशस्त्र दरोडा! कार अडवून चालकासह साथीदाराला बेदम मारहाण;...

शिरपूर : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पळासनेर परिसरात तब्बल ३ कोटी ६ लाख रुपयांच्या रोकड रकमेवर दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अज्ञात पाच...

शिरपूर शहर पोलीस ठाण्याचा ‘मेगा स्ट्राइक’! १ कोटी ५२ लाख ५० हजारांचा गांजा...

  शिरपूर : शिरपूर शहर पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत आंबाफाटा गावाच्या पुढील डोंगराळ भागात वनपट्ट्यावरील जमिनीवर बेकायदेशीररीत्या लागवड केलेले गांजाचे पीक उद्ध्वस्त केले....

शिरपूर पोलिसांचा ‘मेगा स्ट्राइक’! ₹७ कोटी ६७ लाखांचा गांजा उद्ध्वस्त! ३,०६८ किलो...

  शिरपूर, धुळे : शिरपूर तालुक्यातील महादेव दोंदवाडा परिसरात अनेरडॅम वन्यजीव अभयारण्याच्या हद्दीतील वनविभागाच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे गांजाची लागवड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिरपूर...

error: Content is protected !!