Homeक्राईमशिरपूरमध्ये गांजा तस्करांवर पोलिसांचा छापा! पॅकिंग सुरू असतानाच धाड; मध्य प्रदेशातील सरपंचासह...

शिरपूरमध्ये गांजा तस्करांवर पोलिसांचा छापा! पॅकिंग सुरू असतानाच धाड; मध्य प्रदेशातील सरपंचासह तिघे पसार १४ लाख ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त; ओला-सुका गांजा, दुचाकी आणि तीन मोबाईल पोलिसांच्या ताब्यात

शिरपूर,  : गांजाची विक्री करण्यासाठी पॅकिंग सुरू असतानाच सांगवी पोलिसांनी धडक कारवाई करत छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळी असलेल्या तिघांनी पळ काढला. विशेष म्हणजे, पसार झालेल्यांमध्ये मध्य प्रदेशातील एका गावच्या सरपंचाचा समावेश असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. या कारवाईत पोलिसांनी ओला व सुका गांजा, एक दुचाकी आणि तीन मोबाईल फोन असा एकूण १४ लाख ३९ हजार १० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेलगत असलेल्या जामन्यापाणी परिसरातील वनजमिनीवर गांजाची लागवड करून त्याची विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे ५ नोव्हेंबर रोजी दुपारी पावणेपाचच्या सुमारास उपनिरीक्षक हेमंत खैरनार व उपनिरीक्षक कचरे यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला.

यावेळी घटनास्थळी तीन व्यक्ती गांजाचे पॅकिंग करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. मात्र, पोलिसांना पाहताच तिघांनीही घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी त्यांचा काही अंतरापर्यंत पाठलाग केला; परंतु दुर्गम डोंगराळ भागाचा फायदा घेत संशयित पसार होण्यात यशस्वी झाले.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाची कसून तपासणी केली असता ओला व सुका गांजा, एक दुचाकी आणि तीन मोबाईल फोन असा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणात रेवा किसन बारेला (पावरा, रा. फलिया दुगानी, जि. बडवानी, मध्य प्रदेश) याचे नाव प्रमुख संशयित म्हणून समोर आले आहे. तो फलिया दुगानी गावचा सरपंच असल्याची माहिती आहे. त्याच्यासह अन्य दोन साथीदारांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पसार संशयितांचा शोध सुरू आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पळासनेर दरोडा प्रकरणी पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये! ३ कोटी ६ लाखांच्या लुटीने धुळे जिल्हा...

शिरपूर : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पळासनेर परिसरात तब्बल ३ कोटी ६ लाख रुपयांच्या रोकड रकमेवर दरोडा टाकण्यात आल्याच्या गंभीर घटनेने संपूर्ण धुळे जिल्ह्यात खळबळ...

पळासनेरजवळ महामार्गावर ३ कोटी ६ लाखांचा सशस्त्र दरोडा! कार अडवून चालकासह साथीदाराला बेदम मारहाण;...

शिरपूर : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पळासनेर परिसरात तब्बल ३ कोटी ६ लाख रुपयांच्या रोकड रकमेवर दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अज्ञात पाच...

शिरपूर शहर पोलीस ठाण्याचा ‘मेगा स्ट्राइक’! १ कोटी ५२ लाख ५० हजारांचा गांजा...

  शिरपूर : शिरपूर शहर पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत आंबाफाटा गावाच्या पुढील डोंगराळ भागात वनपट्ट्यावरील जमिनीवर बेकायदेशीररीत्या लागवड केलेले गांजाचे पीक उद्ध्वस्त केले....

शिरपूर पोलिसांचा ‘मेगा स्ट्राइक’! ₹७ कोटी ६७ लाखांचा गांजा उद्ध्वस्त! ३,०६८ किलो...

  शिरपूर, धुळे : शिरपूर तालुक्यातील महादेव दोंदवाडा परिसरात अनेरडॅम वन्यजीव अभयारण्याच्या हद्दीतील वनविभागाच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे गांजाची लागवड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिरपूर...

शिरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचा ‘सर्जिकल स्ट्राइक’; ५.७७ कोटींची गांजासदृश अंमली...

  शिरपूर | प्रतिनिधी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात अवैध गांजा लागवडीविरोधात अवघ्या काही दिवसांत दोन मोठ्या कारवाया झाल्याने परिसरातील अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर लागवडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर...

error: Content is protected !!