शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुका पोलिसांनी अवैध शस्त्र व्यवहारावर मोठा घाव घालत तीन गावठी बनावटीचे कट्टे, जिवंत काडतुसे आणि मॅगझीनसह दोन संशयितांना सिनेस्टाईल पाठलाग करून जेरबंद केले. मध्यप्रदेशातून शिरपूरकडे शस्त्रांचा साठा आणला जात असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचत ही धडाकेबाज कारवाई केली. दि. 23 मे 2026 रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास गुन्हेशोध पथकाला माहिती मिळाली की, दोन इसम उमर्टी (मध्यप्रदेश) येथून आंबे मार्गे शिरपूरकडे गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसे घेऊन येत आहेत. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले.पोलीस पथक आंबे गावाच्या परिसरात पोहोचले असता दगडी बाकड्याजवळ दोन संशयित इसम उभे असल्याचे दिसून आले. पोलिसांची गाडी पाहताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेगाने पाठलाग करत दोघांनाही पकडले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे विकास उर्फ पल्लुराम मनोज घारु (रा. येवला, जि. नाशिक) रावसाहेब अशोक मोरे (रा. निमगाव, ता. येवला, जि. नाशिक)अशी आहेत. अंगझडतीमध्ये आरोपींकडून ३ गावठी कट्टे (पिस्टल) ६ जिवंत काडतुसे २ अतिरिक्त मॅगझीन असा एकूण ₹१ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात विविध रित्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी (अतिरिक्त कार्यभार शिरपूर तालुका पोलीस ठाणे) यांच्या नेतृत्वाखाली पोसई मनोज कचरे, पोहेकॉ संतोष पाटील, संदिप ठाकरे, राजू ढिसले, पोकॉ योगेश मोरे, विजय डिवरे, स्वप्निल बांगर, चाअसई अल्ताफ मिर्झा व चापोकॉ इसरार फारुकी यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















