ग्रामस्थ आवाज़
शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४, मागास प्रवर्गासाठी १६ तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३४ ग्रामपंचायती आरक्षित?
शिरपूर | प्रतिनिधी
शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर सन २०२५-२०३० या कालावधीसाठी ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणानुसार अनुसूचित जाती (अनु. जाती) प्रवर्गासाठी चार ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. यामध्ये भोरटेक रूदावली अंतुर्ली अर्थे बु. या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
तर अनुसूचित जमाती (अनु. जमाती) प्रवर्गासाठी एकूण १४ ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या आहेत. यामध्ये थाळनेर, टेकवाडे, अर्थे खु., होळ, वाघाडी, बभळाज, भावेर, भटाणे, विखरण बु. अजनाड, गिधाडे, जापोरा, वनावल, टेंभे. बु. या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
🔹 नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी १६ ग्रामपंचायती
नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (मागास प्रवर्ग) १६ ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अहिल्यापूर . चांदपूरी,. नवे भामपूर, . सुभाषनगर, . आढे . पिळोदे, . साकवद . वरुळ . आमोदा बलकुवे-मुखेड बोरगांव . नांथे . मांजरोद कळमसरे. कुवे . शिंगावे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
🔹 सर्वसाधारण प्रवर्गात ३४ ग्रामपंचायती
उर्वरित ग्रामपंचायतींचे सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे. यामध्ये . सावळदे, . भोरखेडा, लोंढरे, ताजपुरी, करवंद, . उंटावद, अजंदे खु., बाभुळदे, जवखेडा.अजंदे बु., .गरताड, . वाठोडे, . तरडी, . खर्दे खु. पाथर्डे, . घोडसगाव, . दहिवद. भाटपुरा. . मांडळ, खामखेडा प्र.था., . असली तांडे, जुने भामपुर, कुरखळी, जातोडे, . पिंपळे, सावेर गोदी, भरवाडे, तऱ्हाडी त.त., पिंप्री, . जैतपुर उप्परपिंड खदें बु हिंगोणी बु. बाळदे तोंदे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.या सरपंच आरक्षण सोडतीची प्रक्रिया सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडली. आरक्षण जाहीर झाल्याने आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांच्या राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.
The post शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर  अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४, मागास प्रवर्गासाठी १६ तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३४ ग्रामपंचायती आरक्षित? appeared first on ग्रामस्थ आवाज़.
शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत; ९ सप्टेंबरला महिला आरक्षण निश्चित होणार
शिरपूर | प्रतिनिधी
शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून, मंगळवार, ८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता शिरपूर तहसील कार्यालयातील नवीन प्रशासकीय इमारतीत आरक्षण सोडत आयोजित करण्यात आली आहे.
शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या २०२५ ते २०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या सरपंच पदांसाठी यापूर्वी जून २०२५ मध्ये आरक्षण सोडत घेण्यात आली होती. मात्र, त्यानंतरच्या सुधारित आरक्षणानुसार नव्याने सोडत घेण्यात येणार आहे.
📌 सुधारित आरक्षणानुसार वर्गवारी
एकूण ६८ ग्रामपंचायतींपैकी—
🔵 अनुसूचित जाती (SC) – ४ ग्रामपंचायती
🟢 अनुसूचित जमाती (ST) – १४ ग्रामपंचायती
🟠 नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) – १६ ग्रामपंचायती
⚪ सर्वसाधारण प्रवर्ग – ३४ ग्रामपंचायती
अशा प्रकारे एकूण ६८ सरपंच पदांसाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.
👩‍🦰 ९ सप्टेंबरला महिला आरक्षणाची सोडत
यानंतर बुधवार, ९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता, शिरपूरचे उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महिला आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया पार पडणार आहे. ही प्रक्रिया देखील शिरपूर तहसील कार्यालयातील नवीन प्रशासकीय इमारतीत होणार आहे.
इच्छुकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
या दोन्ही आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेसाठी तालुक्यातील आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, आजी-माजी सरपंच व उपसरपंच, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार महेंद्र माळी यांनी केले आहे.
The post शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत  ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत; ९ सप्टेंबरला महिला आरक्षण निश्चित होणार appeared first on ग्रामस्थ आवाज़.
शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३ हजार ७२ किलो वजनाची कॅनॅबिस (गांजा सदृश्य) वनस्पतींची उभी पिके आढळून आली असून, त्यांची अंदाजे किंमत ७ कोटी ६८ लाख रुपये असल्याची माहिती देण्यात आली आहे.
 दिनांक १ सप्टेंबर २०२६ रोजी जामन्यापाणी वनक्षेत्रालगत आजूबाजूच्या परिसरात अज्ञात इसमांनी कॅनॅबिस वनस्पतीची लागवड केल्याची गोपनीय माहिती वन विभाग व पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, प्रभारी अधिकारी, शिरपूर शहर पोलीस ठाणे यांना मिळाली. त्यानंतर ही माहिती धुळे येथील मा. मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आली. NDPS कायदा १९८५ मधील कलम ५२अ नुसार दुर्गम भागातून गांजा वाहून आणणे शक्य नसल्याने, न्यायालयाच्या देखरेखीखाली मालमत्तेची यादी तयार करून मुद्देमाल नष्ट करण्यासाठी विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्या छापा कारवाईसाठी नियुक्ती करण्यात आली.
 त्यानुसार २ सप्टेंबर २०२६ रोजी शिरपूर तालुका पोलीस ठाणे व वन विभागाने संयुक्तरीत्या अतिदुर्गम भागातील नियतक्षेत्र भोरखेडा, रोहिणी व खंबाळे परिसरात कारवाई केली. या भागातील सुमारे ९० गुंठे क्षेत्रावर मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या कॅनॅबिस वनस्पतीची बेकायदेशीर लागवड केल्याचे आढळून आले.
 कारवाईदरम्यान विविध ठिकाणी आढळलेल्या गांजाच्या पिकाची किंमत पुढीलप्रमाणे आहे :
 ८२८ किलो कॅनॅबिस वनस्पती — अंदाजे २ कोटी ७ लाख रुपये
 २ हजार १४४ किलो कॅनॅबिस वनस्पती — अंदाजे ५ कोटी ३६ लाख रुपये
 १०० किलो कॅनॅबिस वनस्पती — अंदाजे २५ लाख रुपये
 अशा प्रकारे एकूण ३ हजार ७२ किलो गांजाच्या वनस्पतींची किंमत ७ कोटी ६८ लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
 यापैकी जागेवरच गांजाच्या झाडांचा नाश करण्यात आला असून, १० गुंठे क्षेत्रातील सुमारे १०० किलो कॅनॅबिस वनस्पतींची झाडे पुढील कायदेशीर सोपस्कारासाठी जप्त करण्यात आली आहेत. छापा कारवाईदरम्यान हुक्का भिकला पावरा, रा. खंबाळे, ता. शिरपूर, जि. धुळे याचे नाव निष्पन्न झाले असून त्याच्याकडून वनपडत क्रमांक प्राप्त करण्यात आला आहे.
 या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात विविध रित्या गुन्हा दाखल
सदर कामगिरी यांनी केली पोलीस अधीक्षक धुळे श्री. विशाल आनंद, उपवनसंरक्षक धुळे (प्रादेशिक) श्री. मोहन नाईकवाडी यांचे मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधीर पाटील / सहा. वनसंरक्षक श्री. राहुल घरटे यांचे उपस्थितीत मा. कार्यकारी दंडाधिकारी श्री. महेश साळुंखे,तहसिल कार्यालय शिरपूर शिरपूर तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. जयपाल हिरे वन परिक्षेत्रीय अधिकारी-सांगवी श्री. विशाल दुसाणे श्री. कैलास सोनवणे श्री. सुनिल जोग/ श्री. किरण गिरवले पोउनि. मनोज कचरे / पोउनि. हेमंत खैरनार पोउनि. मिलींद पवार आणि शिरपूर तालुका पोलीस ठाणे व वनविभागाचे कर्मचारी अशांनी संयुक्तरित्या करण्यात आली आहे.
The post शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त
 ९० गुंठे क्षेत्रातील ३ हजार ७२ किलो गांजाच्या झाडांची लागवड उघड; पोलीस-वन विभागाची संयुक्त कारवाई
 शिरपूर? appeared first on ग्रामस्थ आवाज़.
धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांचे कडक आदेश 2 अधिकारी आणि 1 कर्मचारी निलंबित; निवृत्त अधिकाऱ्यावरही कारवाईचे आदेश!
प्रतिनिधी।धुळे
धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक त्रास दिल्याचा आरोप असलेल्या 2 अधिकारी आणि 1 कर्मचाऱ्यांस निलंबित करण्यात आले आहे. तर या प्रकरणातील एका निवृत्त अधिकाऱ्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पीडित महिलेचा वरिष्ठ अधिकारी कडून लैंगिक छळ होत असल्याने महिला कर्मचारी ने तक्रार केली होती.या तक्रार च्या अनुषंगाने अंतर्गत चौकशी समितीने चौकशी करून अहवाल आयुक्त कार्यालयात सादर केला होता.वरिष्ठ दुययम निरीक्षक ए. व्ही.भंडागे, निरीक्षक आर. आर. धनवटे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक जे. बी. फुलपगारे आणि जवान गौरव सपके यांच्यावर अश्लिल शेरेबाजी, मानसिक त्रास दिल्याचे गंभीर आरोप करण्यात आले होते…
या गंभीर तक्रारीनंतर अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली होती. यानंतर समिती मार्फत अनेक तासांच्या बैठका घेत ऑडिओ क्लिप्ससह विविध तांत्रिक आणि इतर पुराव्यांची तपासणी करण्यात आली… समितीने चौकशीचा अहवाल राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ.राजेश देशमुख यांच्याकडे सादर केला… अहवालातील निष्कर्ष आणि पुरावे विचारात घेऊन आयुक्तांनी कारवाईचे थेट आदेश देत ए. व्ही. भडागे, जे. बी. फुलपगारे आणि गौरव सपके यांना निलंबित करण्यात आलंय… तर आर. आर. धनवटे हे सेवानिवृत्त असल्याने त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. सततच्या मानसिक त्रासामुळे खचलेल्या या महिला कर्मचाऱ्याने अन्याया विरोधात लढा उभारला आणि अखेर तिच्या तक्रारीवर चौकशी होऊन दोषींवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
धुळ्यातील या कारवाईमुळे महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहण्याचा स्पष्ट संदेश प्रशासनाकडून देण्यात आला असल्याचे आता बोलले जात आहे.
राज्यात सर्वात मोठी कारवाई-
कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक अत्याचार अधिनियम 2013 नुसार ही कारवाई करण्यात आली आहे.एकाच वेळेस चार अधिकारी कर्मचारी वर कारवाई ने राज्य उत्पादन शुल्क विभागाने आदर्श घालून दिला आहे. दरम्यान निडरपणे लढणाऱ्या महिला कर्मचारी याचे देखील कौतुक होत आहे. त्याच्या धाडस मुळे या पुढे अत्याचार करणाऱ्या च्या मनात धाक निर्माण होणार आह
The post धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई!  महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांचे कडक आदेश 2 अधिकारी आणि 1 कर्मचारी निलंबित; निवृत्त अधिकाऱ्यावरही कारवाईचे आदेश! appeared first on ग्रामस्थ आवाज़.
शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने जप्त; विद्यार्थ्यांच्या अन्नाच्या गुणवत्तेची होणार तपासणी
शिरपूर | प्रतिनिधी
शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता तपासण्यासाठी उडीद डाळ, पीठ आणि बेसन पीठ या तीन अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी घेतले.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली असून, नमुन्यांचा प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर आवश्यक ती पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, याच दिवशी धुळे शहरातील मालेगाव रोडवरील ‘हॉटेल सुपर सम्राट’ येथेही अन्न व औषध विभागाने धडक तपासणी केली. तपासणीदरम्यान अस्वच्छता, अन्नपदार्थांवर माशांचा प्रादुर्भाव तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ मधील नियमांचे उल्लंघन आढळून आल्याने संबंधित हॉटेलला दि. ८ ऑगस्ट २०२६ पासून बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
ही संयुक्त कारवाई सहाय्यक आयुक्त (अन्न) श्री. गो. वी. माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिजीत जाधव, सुर्णाना महाजन, अरविंद राऊत आणि मंगेश भावसार यांनी केली.
जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत या मोहिमेतून मिळत आहेत.
The post शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई!     आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने जप्त; विद्यार्थ्यांच्या अन्नाच्या गुणवत्तेची होणार तपासणी appeared first on ग्रामस्थ आवाज़.
कर्तव्याचा सन्मान! धुळे जिल्ह्याच्या भूमिपुत्राला केंद्रीय गृहमंत्र्यांचे प्रतिष्ठेचे पदक आर्थिक गुन्ह्यांच्या तपासातील उल्लेखनीय कामगिरीची दखल; सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे यांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
शिरपूर | प्रतिनिधी
कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिक सेवा आणि तपासातील अचूकता यांची राष्ट्रीय पातळीवर दखल घेत आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे यांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर झाले आहे. हा सन्मान केवळ त्यांच्या वैयक्तिक कार्याचा नसून धुळे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
मुंबई, थाळनेर, धुळे, नाशिक यांसह विविध ठिकाणी सेवा बजावताना उमेश बोरसे यांनी अनेक क्लिष्ट आणि गाजलेल्या गुन्ह्यांचा यशस्वी तपास करून आपली वेगळी ओळख निर्माण केली. गुन्ह्याच्या मुळापर्यंत पोहोचण्याची हातोटी, तांत्रिक पुराव्यांचा प्रभावी वापर, कायद्याचे सखोल ज्ञान आणि निष्पक्ष तपास या गुणांमुळे त्यांनी अनेक प्रकरणांना योग्य दिशा दिली.
तपासातील अचूकता ठरली यशाची गुरुकिल्ली
आर्थिक गुन्ह्यांचा तपास हा अत्यंत गुंतागुंतीचा मानला जातो. मात्र, कागदपत्रांचे बारकाईने विश्लेषण, आर्थिक व्यवहारांचा सखोल अभ्यास आणि आधुनिक तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर करून उमेश बोरसे यांनी अनेक कठीण प्रकरणे यशस्वीरीत्या उकलली. त्यांच्या तपासशैलीमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह न्यायव्यवस्थेचाही विश्वास त्यांनी संपादन केला.
दबावाला न झुकता कायद्याच्या चौकटीत काम
कर्तव्य बजावताना कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता कायद्याच्या चौकटीत राहून निष्पक्षपणे काम करणे, ही त्यांच्या कार्यशैलीची सर्वात मोठी ताकद मानली जाते. शिस्त, वेळेचे भान, तपासातील बारकावे आणि जनतेशी संवेदनशील संवाद यामुळे ते पोलीस दलातील विश्वासार्ह व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात.
समाजहिताची जपलेली बांधिलकी
गुन्हे उघडकीस आणण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था राखणे, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेत तत्पर आणि न्याय्य कारवाई करण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे नागरिकांचाही त्यांच्यावर विशेष विश्वास आहे.
महाराष्ट्र पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा
केंद्रीय गृहमंत्री पदक हे उत्कृष्ट तपासकौशल्य आणि उल्लेखनीय सेवेसाठी दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च सन्मानांपैकी एक मानले जाते. उमेश बोरसे यांच्या कार्याची केंद्र शासनाने घेतलेली ही दखल त्यांच्या सेवाभावी वृत्तीची आणि प्रामाणिक कर्तव्यनिष्ठेची साक्ष आहे.
या गौरवपूर्ण यशाबद्दल पोलीस अधिकारी, प्रशासन, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार आणि नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या या यशाने धुळे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलाचा अभिमान उंचावला आहे.
The post कर्तव्याचा सन्मान! धुळे जिल्ह्याच्या भूमिपुत्राला केंद्रीय गृहमंत्र्यांचे प्रतिष्ठेचे पदक     आर्थिक गुन्ह्यांच्या तपासातील उल्लेखनीय कामगिरीची दखल; सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे यांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव appeared first on ग्रामस्थ आवाज़.
धुळे जिल्ह्यातील जप्त अंमली पदार्थांवर बुलडोझर; 9,536 किलो मुद्देमालाची विल्हेवाट
शिरपुर धुळे : अंमली पदार्थांविरोधात महाराष्ट्र पोलिसांनी सुरू केलेल्या ‘Zero Tolerance’ मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. धुळे जिल्ह्यातील विविध 13 गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला तब्बल 9,536 किलो अंमली पदार्थांचा मुद्देमाल, ज्याची एकूण किंमत सुमारे 12 कोटी 47 लाख 30 हजार 450 रुपये आहे, त्याची रांजणगाव, पुणे येथे कायदेशीर आणि पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.
भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयामार्फत ‘नशा मुक्त भारत अभियान’ राबविण्यात येत आहे. तसेच ‘नशामुक्त भारत-2029’ या संकल्पनेनुसार अंमली पदार्थांच्या गैरव्यवहाराविरोधात कठोर कारवाई करण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे.
याच मोहिमेचा भाग म्हणून 4 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्र एनव्हायरो पॉवर लिमिटेड, रांजणगाव, जिल्हा पुणे येथे धुळे जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली.
या कारवाईत उच्चस्तरीय ड्रग डिस्पोजल समिती (HLDDC) अंतर्गत 3,151 किलो अंमली पदार्थांची, तर RDDC अंतर्गत 6,385 किलो अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली. अशाप्रकारे एकूण 9,536 किलो अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले.
या जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ₹12,47,30,450 इतकी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
ही संपूर्ण प्रक्रिया अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे, सुनील रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह धुळे जिल्हा पोलीस प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
या कारवाईत धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, सहायक पोलीस निरीक्षक दीपक ढोके तसेच अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या कारवाईसाठी असई संतोष जाधव, पोहेकॉ सुरेश भालेराव, पोहेकॉ शिरीष भदाणे , पोहेकॉ तुपार सूर्यवंशी आणि पोकॉ नितीन दिवसे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कोट्यवधी रुपयांचा आणि तब्बल 9.5 टन वजनाचा अंमली पदार्थ नष्ट करण्यात आल्याने धुळे जिल्ह्यातील अंमली पदार्थविरोधी कारवाईला मोठे बळ मिळाले आहे.
The post धुळे जिल्ह्यातील जप्त अंमली पदार्थांवर बुलडोझर; 9,536 किलो मुद्देमालाची विल्हेवाट appeared first on ग्रामस्थ आवाज़.
फेक ऑडिओ क्लिपचा कट? माजी मंत्री आमरीशभाई पटेल यांच्या नावाने व्हायरल ऑडिओप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार
शिरपूर | प्रतिनिधी
माजी मंत्री तथा माजी आमदार आमरीशभाई पटेल यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करून तयार करण्यात आल्याचा दावा असलेली कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शिरपूरच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
फिर्यादीनुसार, ५ ऑगस्ट रोजी एका परिचित व्यक्तीमार्फत इन्स्टाग्रामवरील व्हायरल रीलची लिंक प्राप्त झाली. संबंधित लिंक उघडून पाहिल्यानंतर आमरीशभाई पटेल यांच्या आवाजाशी साधर्म्य असलेली कथित ऑडिओ क्लिप प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले. या व्हिडिओमध्ये एका मराठी वृत्तवाहिनीच्या नावाचा वापर करून दिशाभूल करणारा मजकूरही दाखविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) किंवा अन्य तांत्रिक माध्यमांचा वापर करून आमरीशभाई पटेल यांच्या आवाजाची बनावट प्रतिकृती तयार करण्यात आली असावी, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकारामुळे त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा आणि जनतेमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
फिर्यादीने संबंधित इन्स्टाग्राम लिंक, स्क्रीनशॉट आणि उपलब्ध तांत्रिक पुरावे पोलिसांकडे सुपूर्द केले असून, ही क्लिप नेमकी कोणी तयार केली, ती सोशल मीडियावर कोणी प्रसारित केली आणि त्यामागील उद्देश काय होता, याचा तपास सुरू आहे.
पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तांत्रिक तपास करत असून, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते
The post फेक ऑडिओ क्लिपचा कट? माजी मंत्री आमरीशभाई पटेल यांच्या नावाने व्हायरल ऑडिओप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात  तक्रार appeared first on ग्रामस्थ आवाज़.
विश्व आदिवासी दिन उत्सव शांततेत आणि एकोप्याने साजरा करा : आमदार काशीराम पावरा
शिरपूर | प्रतिनिधी
शिरपूर हे शांतताप्रिय शहर असून येथील नागरिकांच्या सलोख्यामुळे शहराचा सर्वत्र नावलौकिक झाला आहे. ९ ऑगस्ट रोजी होणारा विश्व आदिवासी दिन उत्सव सर्वांनी एकोप्याने, शांततेत आणि उत्साहात साजरा करून आदर्श निर्माण करावा, असे आवाहन आमदार काशीराम पावरा यांनी केले.
विश्व आदिवासी दिनानिमित्त शहरात मिरवणुकीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शिरपूर शहर पोलीस ठाण्यात शांतता समिती व विविध सामाजिक संघटनांची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी आमदार पावरा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
ते म्हणाले की, शिरपूर तालुक्याला सामाजिक सलोखा आणि परंपरेचा उज्ज्वल इतिहास लाभला आहे. चोपडा जीन ते पित्रेश्वर कॉलनी मैदान या मार्गावरील मिरवणुकीत सर्वांनी पारंपरिक वेशभूषा आणि वाद्यांसह सहभागी व्हावे. मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी. ग्रामीण भागातील सरपंच व पोलीस पाटील यांनाही विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या असून आदिवासी बांधवांनी हा उत्सव शांततेत आणि बंधुभावाने साजरा करावा, असेही त्यांनी सांगितले.
उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) सुधीर पाटील यांनी पोलिसांकडून करण्यात आलेल्या सुरक्षा नियोजनाची माहिती देत सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.
पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी मिरवणुकीदरम्यान घातक हत्यारे न आणता केवळ पारंपरिक शस्त्रांच्या प्रतिकृतींचा वापर करावा, संशयास्पद अथवा गैरप्रकार करणाऱ्या व्यक्तींची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच आक्षेपार्ह गाणी वाजविणे टाळावे, असे आवाहन केले.
यावेळी सांगवी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मिलिंद पवार तसेच शांतता समितीचे सदस्य, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The post विश्व आदिवासी दिन उत्सव शांततेत आणि एकोप्याने साजरा करा : आमदार काशीराम पावरा appeared first on ग्रामस्थ आवाज़.
मंदिरफोडींच्या मालिकेचा शेवट! मध्यप्रदेशातील दोन सराईत चोर शिरपूर शहर पोलिसांच्या जाळ्यात
शिरपूर शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ४ किलो १९९ ग्रॅम चांदीचे दागिने, रोख रकमेसह ७.८३ लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक जिल्हातील मंदिरांमध्ये नालिव्च स्वरूपात चोरी करणान्या मध्यप्रदेशातील दोन सराईत चोरट्यांना शिरपूर शहर पोलिसांनी अटक करत राहा मंदिरफोडींचा पर्दाफाश केला आहे. संशयितांकडून ४ फिलो १९९ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आणि रोख रामम अता एकूण ७लाख ८३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मंदिरांतील डोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती या कारवाईमुळे कनी गाली आहे. ३० जूनच्या रात्री शिरपूर तालुक्यातील सावळदे येथील दत्ता मंदिरात चोरी झाल्यानंतर शिरपूर शहर पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तमास कहा पोलिसांनी मध्यप्रदेशातील बहयानी जिल्ह्यातील सदिन गिलदार देशका (२७) व मिकला रामसिंग देवका (३९) रा. नाहझ्या फल्या मोहाला ता. सेंधवा यांना ताब्यात घेतले चाँकशीत दोघांसंशयितांनी शिरपूर शहरातील शहादा रोडवरील एका घरात, सावळदे एका झोपडीत, म दात मंदिरात, धुळे येथील रोकडोबा हनुमान मंदिर परिसरातील श्रीराम मंदिर, मालेगाव जवळील रामदेव महाराज मंदिर, सटाणा जवळील साई बाबा मंदिचल चोरी केल्याची कबुली दिली. त्यामुळे शहर पोलिसांना धुळे व नाशिक जिल्ह्यातील एकूण सहा गुन्ह्यांची उबाल करण्यात यश आले. संतमितंवळून चांदीये का, मुकुट, माटल्या, कहे, जोडवे, पैंजण, साखळ्या, हार, इतर चांदीचे दागिने तसेच देखा क्रम जाए शरण्यात आली. जात मुद्देमालाचे एकूण मूल्य ७ लाख ८३ हजार ४०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर
कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद. अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांचे मार्गदर्शना खाली शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, पीलाआय जितेंद्र महाजन आणि पोलीस अंमलदार रविंद्र आखडमल, अतुल पाटील, योगेश दामाहे, गोविंद कोळी, विनोद आखडमल, मनोज महाजन, सचिन वाघ, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, भटू साळुंके, आरीफ तडवी, सोमा ठाकरे, उमेश पवार, अनिता पावरा, चित्रा पावस आर.सी.पी. पथक यांनी केली आहे
The post मंदिरफोडींच्या मालिकेचा शेवट! मध्यप्रदेशातील दोन सराईत चोर शिरपूर शहर पोलिसांच्या जाळ्यात appeared first on ग्रामस्थ आवाज़.