Homeशिक्षण-प्रशिक्षणशिरपूर येथील जिल्हा ग्रंथोत्सव २०२५ मध्ये ग्रंथदिंडी, परिसंवाद व सांस्कृतिक कार्यक्रमांनी रसिकांची...

शिरपूर येथील जिल्हा ग्रंथोत्सव २०२५ मध्ये ग्रंथदिंडी, परिसंवाद व सांस्कृतिक कार्यक्रमांनी रसिकांची मने जिंकली

 

शिरपूर : उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय धुळे तसेच शिरपूर एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धुळे जिल्हा ग्रंथोत्सव २०२५ चे दिमाखदार उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

 

ग्रंथोत्सवाची सुरुवात आर.सी.पटेल मेन बिल्डिंग येथून भव्य ग्रंथदिंडीने करण्यात आली. या ग्रंथदिंडीमध्ये शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, उपनगराध्यक्ष सौ. संगीताताई देवरे, शिरपूर एज्युकेशन सोसायटी सचिव सौ. रेशा पटेल, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, अहिराणी साहित्यिक सुभाष अहिरे, संस्थेचे सीईओ डॉ. उमेश शर्मा, आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलाच्या विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, लेखक कवी व विद्यार्थी मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभागी झाले होते. तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. उत्साहपूर्ण वातावरणात ही ग्रंथदिंडी शिरपूर शहरातून पित्रेश्वर कॉलनी परिसर, करवंद नाका मार्गे आर. सी. पटेल फार्मसी कॉलेज कॅम्पस मध्ये दाखल झाली. यानंतर उद्घाटन सोहळ्याला सुरुवात झाली. प्रारंभी सरस्वती पूजन व ग्रंथ पूजन करण्यात आले.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार काशिराम दादा पावरा होते. प्रमुख उद्घाटक महाराष्ट्र ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी उद्घाटन केले. यावेळी नाशिक विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सचिन जोपुळे, माजी जि. प. अध्यक्ष डॉ. तुषारभाऊ रंधे, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, उपनगराध्यक्षा सौ. संगीताताई देवरे, संस्था सचिव सौ. रेशा पटेल, नाशिक विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. दत्ता परदेशी, अविनाश भदाणे, जिल्हा ग्रंथालय परिषदेचे अध्यक्ष, अनिल बाविस्कर (जिल्हा ग्रंथालय अधिकारी, छत्रपती संभाजीनगर), चंद्रशेखर ठाकूर (जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जालना), राहुल महिरे, संचालक विजय अग्रवाल, संचालक अतुल भंडारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी जगदीश पाटील, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे ट्रस्टी, सर्व प्राचार्य उपस्थित होते.

 

यावेळी मान्यवराच्या हस्ते ‘अ’ वर्ग वाचनालय श्री.छत्रपती शिवाजी वाचनालय, साक्रीचे उज्वल रमाकांत अग्निहोत्री, ‘ब’ वर्ग वाचनालय अण्णासाहेब र.रा.टोणगावकर ग्रंथालय, दोंडाईचाचे निरंजन श्रीराम महाजन, ‘क’ वर्ग वाचनालय श्रीमती भिमाबाई बाजीराव माळी सार्वजनिक ग्रंथालय, शिरपूरचे सौ. प्रेरणा भरत रोकडे तसेच ‘ड’ वर्ग वाचनालय कै.कुसूमबाई बाळकृष्ण वाणी सार्वजनिक वाचलनालय, बाळापूर ता.जि.धुळे येथील सौ. प्रतिभा प्रमोद वाणी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच वृषाली ठाकरे, संदेश हजारे, जी.एस.देवरे, सखाराम रोकडे या उत्कृष्ट वाचकांचा सत्कार करण्यात आला. जयपालसिंह गिरासे, प्रा.भास्कर खैरनार, डॉ.युवराज पवार, कवि अन्सारी अमेराह जमीर, भूमिका गर्ग, रितेश मिश्रा, डॉ. रजीनकांत सोनार या लेखक व कवीचा सत्कार करण्यात आला.

 

यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उद्घाटक महाराष्ट्र ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी मनोगतात शिरपूर शहरात असलेल्या वाचन संस्कृतीचे कौतुक केले. तसेच सुरुवातीला भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारी जी ग्रंथ दिंडी निघाली तिच्यामध्ये युवकांच्या सहभाग व उत्साहाबद्दल कौतुक केले. शिरपूर मध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेल्या व प्रकाशित केलेल्या पुस्तकांचा स्टॉल लावण्यात आला आहे, हे पण एक नाविन्यपूर्ण कल्पना असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शासनाच्या वतीने प्रथमच असा जिल्हास्तरावरचा ग्रंथोत्सव तालुकास्तरावर आयोजित करावा अशी अपेक्षा होती आणि हे महाराष्ट्रात प्रथमतः शिरपूर या ठिकाणी होताना दिसत आहे.

 

शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांनी संस्थेतर्फे उभारण्यात आलेली श्रीमती केतकीबेन मुकेशभाई पटेल या अत्याधुनिक ग्रंथालयाविषयीची माहिती उपस्थितांना दिली. या ग्रंथालयामध्ये जागतिक स्तरावरचे विविध सॉफ्टवेअर व ऑनलाइन जर्नल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत अशी माहिती दिली. तसेच ग्रंथोत्सवाला आलेल्या मान्यवरांनी या ग्रंथालयाला भेट द्यावी व त्या संदर्भात काही सुधारणा असल्यास सांगावे. संस्थेतील शिक्षकांनी देखील अधिक प्रमाणात विविध पुस्तकांचे लेखन करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार काशिराम दादा पावरा यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळत असते. कुठलाही लेखक लेखन करत असताना तो आपल्या आंतर प्रेरणेने लेखन करत असतो, त्यामुळे ते मार्गदर्शन खूप यशस्वी होते. तसेच औपचारिक शिक्षणाच्या माध्यमातून बाह्य जगाचे ज्ञान मिळते व व्यक्तिमत्व विकास होत असतो. पण बऱ्याचदा अध्यात्मिक शिक्षणाचे ज्ञान संतांच्या माध्यमातून समाजापर्यंत जाते आणि हे अध्यात्मिक ज्ञान मानवाला आंतरिक अनुभव देऊन मानवाला जोडण्याचे काम करतो असे त्यांनी सांगून ग्रंथोत्सवाला शुभेच्छा दिल्या.

 

उद्घाटनानंतर दुपारच्या सत्रात “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर : इतिहास, साहित्य आणि लोककल्याणाचा आदर्श” या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात डॉ. सदाशिव सूर्यवंशी, डॉ. बी. एन. पाटील व सौ. दर्शना पवार यांनी अभ्यासपूर्ण विचार मांडले. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. फुला बागुल होते.

 

यानंतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात एच. आर. पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गणेश वंदनेने झाली. त्यानंतर एच. आर. पटेल महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या कोकणी आदिवासी नृत्य व लावणीने प्रेक्षकांची दाद मिळवली. आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालय, शिरपूरच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक गोंधळ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. तसेच आर. सी. पटेल शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पावरा आदिवासी नृत्याने कार्यक्रमात रंगत आणली. यानंतर एच. आर. पटेल फार्मसी महाविद्यालय, शिरपूरच्या विद्यार्थ्यांनी ‘छावा’ ही नाटिका तसेच “तुझं मागतो मी आता” हे गीत सादर केले.

लेखक सुभाष अहिरे व दिग्दर्शक प्रवीण माळी यांनी सादर केलेली “आहेर” ही खानदेश दर्शन घडविणारी अहिराणी नाटिका विशेष आकर्षण ठरली. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या शेवटी आर. सी. पटेल आय.एम.आर.डी. च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मराठी बँड कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.

 

ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, रविवार दि. १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळच्या सत्रात “ए आय युगातील वाचन” या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सकाळच्या दुसऱ्या सत्रात प्रवीण माळी यांचे “आयतं पोयतं सख्यानं” हे अहिराणी कथाकथन व नाट्य सादरीकरण होणार आहे. दुपारच्या सत्रात क- कवितेचा बहुभाषिक कवी संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. दुपारी 2 ते 4 वाजे दरम्यान क-कवितेचा हा बहुभाषिक कवी संमेलनाचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जगदिश देवपूरकर असतील. रावसाहेब कुवर, बाळु श्रीराम, प्रविण पवार, राजेंद्र जाधव, के.बी.लोहार, माया साळुंखे, दत्तात्रय कल्याणकर, चंद्रशेखर कासार, गुलाब मोरे, अरविंद भामरे, शामल पाटील, कमलेश शिंदे, शिल्पा जैन, यशवंत निकवाडे, ज्योत्स्ना पवार, कुसूम चौधरी, आनंद देशमुख, नागोराव डोंगरे, संजय धनगवाड, सुजित राजपूत हे कवी सहभागी होणार आहेत. त्यानंतर ग्रंथोत्सवाचा समारोप होणार आहे.

 

या जिल्हा ग्रंथोत्सवात महाराष्ट्रातील नामवंत प्रकाशक व पुस्तक विक्रेत्यांचे भव्य पुस्तक प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यामध्ये कविता प्रकाशन (धुळे), कस्तुरी प्रकाशन (अमळनेर), मनोज पुस्तकालय (धुळे), नवजीवन बुक स्टॉल (धुळे), कुशल बुक शॉप, दीपस्तंभ प्रकाशन (जळगाव), ज्ञानप्रबोधिनी प्रकाशन (पुणे), अन्नपूर्णा पब्लिकेशन (इंदोर), अथर्व पब्लिकेशन (जळगाव) आदींसह ए. आर. पटेल इंग्लिश मीडियम स्कूल, भारतीय विकास साधना, गायत्री परिवार, योग विद्या धाम व इस्कॉन युथ फोरम, शिरपूर यांचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत.

एका छताखाली एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुस्तकांचे स्टॉल शिरपूरमध्ये प्रथमच भरविण्यात आले असून, या संधीचा लाभ शिरपूर व परिसरातील वाचकप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

यावेळी रोहीदास हाके यांच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ या काव्यसंग्रहाचे तसेच सुरेश मोरे यांचे ‘प्रारंभ वाचन संस्कृतीचा’ या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिक, लेखक, साहित्यप्रेमी, कवि, कथाकथनकार, नागरीक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

वाचनप्रेमींसाठी भव्य ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ, साहित्य व वाड्.मय विषयक पुस्तके विक्रीसाठी स्टॉल लावण्यात आले आहे. हा ग्रंथोत्सवात सकाळी 10.00 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामुल्य प्रवेश राहणार आहे. या ग्रंथोत्सवाचा जिल्ह्यातील नागरिक, पत्रकार, विद्यार्थी, ग्रंथप्रेमी व साहित्य रसिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन संयोजन समितीमार्फत करण्यात आले येत आहे.

 

 

 

  1.  ग्रंथोत्सवाचा समारोपाचा कार्यक्रम सायंकाळी 4 ते 5 वाजता नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यावेळी तहसिलदार महेंद्र माळी, जिल्हा कोषागार अधिकारी प्रविण पंडित, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सोनार, पोलीस निरीक्षक किशोर परदेशी, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे सीईओ डॉ. उमेश शर्मा हे उपस्थित राहणार आहेत.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड येथील रेस्टोबारमध्ये वादातून तिघांनी एकाला बेदम मारहाण केली

पुणे : दौंड तालुक्यातील सहजपूर गावात आदल्या दिवशी एका व्यक्तीचा (३९) चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी यवत पोलिसांनी मंगळवारी तिघांना अटक केली.याप्रकरणी पिंपळे गुरव रहिवासी...

जुन्नरमध्ये बिबट्याचे हल्ले कमी करण्यासाठी AI-आधारित सायरन, सेलफोन अलर्ट

पुणे: जुन्नर वनविभागाने 20 अतिसंवेदनशील गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्राणी शोधणे आणि सतर्कता यंत्रणा बसवली आहे, जेथे बिबट्याचे दर्शन आणि हल्ले रहिवाशांसाठी वारंवार धोक्याचे...

पोलीस वसाहतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला अटक

पुणे : शहरातील पोलीस वसाहतीत रविवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास समर्थ पोलिसांनी एका पोलीस हवालदाराच्या मुलाला (23) एका अल्पवयीन मुला (12) सोबत अश्लील चाळे...

जनगणना कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख सत्यापित करण्यासाठी QR कोड

पुणे: महाराष्ट्र 16 मे ते 14 जून या कालावधीत घरोघरी जाऊन गणनेचा सराव सुरू करणार असून, खऱ्या जनगणनेच्या अधिकाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी नवीन...

दरवाढीच्या भीतीने पेट्रोल, डिझेलच्या विक्रीत २० टक्क्यांनी वाढ, पंतप्रधानांची घोषणा

पुणे: इंधनाच्या संभाव्य दरवाढीच्या अंदाजात पेट्रोल पंपांवर कोणतीही गर्दी दिसत नसली तरीही गेल्या दोन-तीन दिवसांत शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत सुमारे 20% वाढ झाल्याचे...

दौंड येथील रेस्टोबारमध्ये वादातून तिघांनी एकाला बेदम मारहाण केली

पुणे : दौंड तालुक्यातील सहजपूर गावात आदल्या दिवशी एका व्यक्तीचा (३९) चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी यवत पोलिसांनी मंगळवारी तिघांना अटक केली.याप्रकरणी पिंपळे गुरव रहिवासी...

जुन्नरमध्ये बिबट्याचे हल्ले कमी करण्यासाठी AI-आधारित सायरन, सेलफोन अलर्ट

पुणे: जुन्नर वनविभागाने 20 अतिसंवेदनशील गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्राणी शोधणे आणि सतर्कता यंत्रणा बसवली आहे, जेथे बिबट्याचे दर्शन आणि हल्ले रहिवाशांसाठी वारंवार धोक्याचे...

पोलीस वसाहतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला अटक

पुणे : शहरातील पोलीस वसाहतीत रविवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास समर्थ पोलिसांनी एका पोलीस हवालदाराच्या मुलाला (23) एका अल्पवयीन मुला (12) सोबत अश्लील चाळे...

जनगणना कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख सत्यापित करण्यासाठी QR कोड

पुणे: महाराष्ट्र 16 मे ते 14 जून या कालावधीत घरोघरी जाऊन गणनेचा सराव सुरू करणार असून, खऱ्या जनगणनेच्या अधिकाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी नवीन...

दरवाढीच्या भीतीने पेट्रोल, डिझेलच्या विक्रीत २० टक्क्यांनी वाढ, पंतप्रधानांची घोषणा

पुणे: इंधनाच्या संभाव्य दरवाढीच्या अंदाजात पेट्रोल पंपांवर कोणतीही गर्दी दिसत नसली तरीही गेल्या दोन-तीन दिवसांत शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत सुमारे 20% वाढ झाल्याचे...
error: Content is protected !!