Homeक्राईमशिरपूर शहर पोलीस डी.बी. पथकाची धडाकेबाज कामगिरी नवीन बांधकामातील वायर चोरी...

शिरपूर शहर पोलीस डी.बी. पथकाची धडाकेबाज कामगिरी नवीन बांधकामातील वायर चोरी प्रकरण उघडकीस; दोन आरोपी जेरबंद, १.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त

शिरपूर (प्रतिनिधी) – शिरपूर शहरात वाढत असलेल्या घरफोडी व चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने अत्यंत शिताफीने कारवाई करत नवीन बांधकामातील इलेक्ट्रिक वायर चोरी करणाऱ्या दोन तरुण आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल १,०५,०७५/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.शिरपूर शहर पोलीस ठाण्यात विविध गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी जितेंद्र गुलाबसिंग गिरासे (वय ३८, व्यवसाय – नोकरी, रा. जातोडा, ता. शिरपूर, जि. धुळे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.०० ते ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८.०० या कालावधीत वरझडी रोडवरील पाणी फिल्टर प्लांटच्या मागे असलेल्या ले-आऊट नं. ३१, प्लॉट नं. ३० येथील नवीन घराच्या बांधकामात चोरी घडली होती.अज्ञात चोरट्यांनी कडी-कोंड्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत RR KABLE कंपनीचे १७ बॉक्स, त्यामध्ये हिरव्या, पिवळ्या, काळ्या, लाल व निळ्या रंगाच्या इलेक्ट्रिक वायर तसेच घरात फिटिंग केलेली वायर असा ५५,०७५/- रुपये किंमतीचा माल चोरून नेला होता.या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक श्री. किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. दरम्यान, कळमसरे (ता. शिरपूर) येथील अरुणावती नदी पुलाजवळ दोन इसम काळ्या रंगाच्या हिरो स्प्लेंडर मोटरसायकल (क्र. MH-18/CC-5220) वर गोणीत व खोक्यात संशयास्पद वस्तू घेऊन जात असल्याचे आढळून आले.तत्काळ कारवाई करत पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली असता आरोपींची नावे1) रोहित दगडू कोळी (वय १९, रा. अजंदे, ता. शिरपूर)2) बबलू ऊर्फ आदित्य जामसिंग पावरा (वय १९, रा. पारशीपाडा, वरझडी, ता. शिरपूर)अशी निष्पन्न झाली. सखोल विचारपूस केल्यानंतर त्यांनी पाणी फिल्टर प्लांटच्या मागील बांधकामातून संगनमताने चोरी केल्याची कबुली दिली.पोलिसांनी आरोपींकडून ५५,०७५/- रुपये किंमतीची इलेक्ट्रिक वायर तसेच ५०,०००/- रुपये किंमतीची हिरो स्प्लेंडर मोटरसायकल असा एकूण १,०५,०७५/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून दि. ११/०२/२०२६ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ. रविंद्र आखडमल करीत आहेत..

ही कारवाई यांनी केली  पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे,मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे,तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनील गोसावी. रविंद्र आखडमल, पो.कॉ. विनोद आखडमल, गोविंद कोळी, भटू साळुंके, प्रशांत पवार, मनोज महाजन, योगेश दाभाडे, मनोज दाभाडे, सचिन वाघ, आरीफ तडवी, सोमा ठाकरे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड येथील रेस्टोबारमध्ये वादातून तिघांनी एकाला बेदम मारहाण केली

पुणे : दौंड तालुक्यातील सहजपूर गावात आदल्या दिवशी एका व्यक्तीचा (३९) चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी यवत पोलिसांनी मंगळवारी तिघांना अटक केली.याप्रकरणी पिंपळे गुरव रहिवासी...

जुन्नरमध्ये बिबट्याचे हल्ले कमी करण्यासाठी AI-आधारित सायरन, सेलफोन अलर्ट

पुणे: जुन्नर वनविभागाने 20 अतिसंवेदनशील गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्राणी शोधणे आणि सतर्कता यंत्रणा बसवली आहे, जेथे बिबट्याचे दर्शन आणि हल्ले रहिवाशांसाठी वारंवार धोक्याचे...

पोलीस वसाहतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला अटक

पुणे : शहरातील पोलीस वसाहतीत रविवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास समर्थ पोलिसांनी एका पोलीस हवालदाराच्या मुलाला (23) एका अल्पवयीन मुला (12) सोबत अश्लील चाळे...

जनगणना कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख सत्यापित करण्यासाठी QR कोड

पुणे: महाराष्ट्र 16 मे ते 14 जून या कालावधीत घरोघरी जाऊन गणनेचा सराव सुरू करणार असून, खऱ्या जनगणनेच्या अधिकाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी नवीन...

दरवाढीच्या भीतीने पेट्रोल, डिझेलच्या विक्रीत २० टक्क्यांनी वाढ, पंतप्रधानांची घोषणा

पुणे: इंधनाच्या संभाव्य दरवाढीच्या अंदाजात पेट्रोल पंपांवर कोणतीही गर्दी दिसत नसली तरीही गेल्या दोन-तीन दिवसांत शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत सुमारे 20% वाढ झाल्याचे...

error: Content is protected !!