Homeताज्या बातम्याशिरपूरात अवैध सावकारीचा “काळा खेळ” उघड..! गरजूंना कर्जाच्या जाळ्यात अडकवून जमीन-घरांवर...

शिरपूरात अवैध सावकारीचा “काळा खेळ” उघड..! गरजूंना कर्जाच्या जाळ्यात अडकवून जमीन-घरांवर डल्ला; तिघांविरोधात अधिकृत गुन्हा?

शिरपूर | प्रतिनिधी

शिरपूर शहरात अवैध सावकारीचे मोठे रॅकेट उघडकीस आले असून, सहकार विभागाने धडक कारवाई करत तिघांविरोधात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अंतर्गत अधिकृत फिर्याद दाखल केली आहे. गरजू नागरिकांना अवाजवी व्याजदराने पैसे देत आर्थिक शोषण करून त्यांच्या मालमत्तांवर डल्ला मारल्याचा गंभीर आरोप संबंधितांवर करण्यात आला आहे.

या प्रकरणातील आरोपींमध्ये सुरेश रामचंद्र माळी, नारायण जगन्नाथ मराठे आणि दिलीप बापू पाटील यांचा समावेश आहे. विनापरवाना सावकारी व्यवसाय चालवत अनेकांना कर्जाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून जमिनी, घरे आणि दुकाने हस्तगत करण्याचा प्रकार चौकशीत समोर आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

या संदर्भात कदीर अहमद हमीद शेख (रा. मदिना मोहल्ला, शिरपूर) यांनी सप्टेंबर २०२५ मध्ये सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीत संबंधितांकडून मोठ्या व्याजदराने पैसे देण्यात येत असून, व्याजाच्या बदल्यात नागरिकांच्या मालमत्ता बळकावल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला होता.

तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, धुळे यांच्या आदेशानुसार विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली. पोलिस बंदोबस्तात १४ ऑक्टोबर २०२५ रोजी संबंधितांच्या घरांवर झडती घेण्यात आली.

झडतीदरम्यान सुरेश माळी यांच्या घरातून अवैध सावकारीशी संबंधित ११ दस्तऐवज, नोंदवह्या आणि तक्रारदाराच्या नावाचे सहा कोरे धनादेश जप्त करण्यात आले. नारायण मराठे यांच्या घरातून उसनवारी पावत्या, नोंदवह्या, कोरे धनादेश तसेच सौदापावतीची कागदपत्रे आढळून आली. तर दिलीप पाटील यांच्या घरातून थेट कागदपत्रे न मिळाल्यासुद्धा, मराठे यांच्या घरातून जप्त झालेल्या सौदापावतीत त्यांचा सहभाग स्पष्ट झाल्याचे चौकशीत नमूद करण्यात आले आहे.

चौकशीदरम्यान तिन्ही जणांकडे सावकारी व्यवसायासाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. संबंधितांनी दिलेले खुलासे असमाधानकारक ठरले असून, तक्रारदाराने सादर केलेले पुरावे सक्षम असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, एप्रिल २०२६ मध्ये जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाईचे आदेश दिल्यानंतर सहाय्यक निबंधक राजेंद्र विरकर यांनी सरकारतर्फे अधिकृत फिर्याद दाखल केली आहे.

“अवैध सावकारांविरोधात आता मोठी मोहीम?”

शिरपूर शहरात वाढत्या अवैध सावकारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या कारवाईनंतर आणखी काही धक्कादायक प्रकरणे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!