Homeताज्या बातम्याशिरपूरचे तहसीलदार महेंद्र माळी यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरव

शिरपूरचे तहसीलदार महेंद्र माळी यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरव

शिरपूर (प्रतिनिधी): विविध शासकीय कामकाज व योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल शिरपूरचे तहसीलदार महेंद्र माळी यांना धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते ‘प्रशस्तीपत्र’ देऊन गौरवण्यात आले.

महसूल विभागाच्या वतीने आयोजित महसूल दिन २०२५ च्या कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला. १ ऑगस्ट २०२४ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत त्यांनी महसूल संकलन, गौणखनिज वसुली, निवडणूक व्यवस्थापन, तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत उल्लेखनीय कामगिरी केली.

विशेषतः, ई-फेरफार प्रणाली, संजय गांधी निराधार योजना, तसेच लोकसभा व विधानसभा निवडणूक २०२४ मधील अचूक नियोजन आणि अंमलबजावणी यामुळे त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे ठरले आहे. याचबरोबर, राज्य शासनाच्या १०० दिवसीय कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात शिरपूर तहसील कार्यालयाने नाशिक विभागात तिसरा क्रमांक मिळवत आदर्श निर्माण केला आहे.

या यशाबद्दल उपविभागीय अधिकारी डॉ. शरद मंडलिक यांनीही तहसीलदार माळी यांचे विशेष अभिनंदन केले. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनीही शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव केल्यास त्यांच्या कार्यक्षमता वाढते आणि इतरांसाठीही प्रेरणा निर्माण होते, असे नमूद केले.

तहसीलदार माळी यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर तालुक्यात प्रभावी व लोकाभिमुख प्रशासन कार्यरत असल्याने हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!