Homeमहत्त्वाचेशिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने जप्त; विद्यार्थ्यांच्या अन्नाच्या गुणवत्तेची होणार तपासणी

शिरपूर | प्रतिनिधी

शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता तपासण्यासाठी उडीद डाळ, पीठ आणि बेसन पीठ या तीन अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी घेतले.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली असून, नमुन्यांचा प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर आवश्यक ती पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान, याच दिवशी धुळे शहरातील मालेगाव रोडवरील ‘हॉटेल सुपर सम्राट’ येथेही अन्न व औषध विभागाने धडक तपासणी केली. तपासणीदरम्यान अस्वच्छता, अन्नपदार्थांवर माशांचा प्रादुर्भाव तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ मधील नियमांचे उल्लंघन आढळून आल्याने संबंधित हॉटेलला दि. ८ ऑगस्ट २०२६ पासून बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

ही संयुक्त कारवाई सहाय्यक आयुक्त (अन्न) श्री. गो. वी. माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिजीत जाधव, सुर्णाना महाजन, अरविंद राऊत आणि मंगेश भावसार यांनी केली.

जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत या मोहिमेतून मिळत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

कर्तव्याचा सन्मान! धुळे जिल्ह्याच्या भूमिपुत्राला केंद्रीय गृहमंत्र्यांचे प्रतिष्ठेचे पदक आर्थिक...

  शिरपूर | प्रतिनिधी कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिक सेवा आणि तपासातील अचूकता यांची राष्ट्रीय पातळीवर दखल घेत आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे यांना केंद्रीय गृहमंत्री...

error: Content is protected !!