Homeक्राईमविश्व आदिवासी दिन उत्सव शांततेत आणि एकोप्याने साजरा करा : आमदार काशीराम...

विश्व आदिवासी दिन उत्सव शांततेत आणि एकोप्याने साजरा करा : आमदार काशीराम पावरा

शिरपूर | प्रतिनिधी

शिरपूर हे शांतताप्रिय शहर असून येथील नागरिकांच्या सलोख्यामुळे शहराचा सर्वत्र नावलौकिक झाला आहे. ९ ऑगस्ट रोजी होणारा विश्व आदिवासी दिन उत्सव सर्वांनी एकोप्याने, शांततेत आणि उत्साहात साजरा करून आदर्श निर्माण करावा, असे आवाहन आमदार काशीराम पावरा यांनी केले.

विश्व आदिवासी दिनानिमित्त शहरात मिरवणुकीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शिरपूर शहर पोलीस ठाण्यात शांतता समिती व विविध सामाजिक संघटनांची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी आमदार पावरा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

ते म्हणाले की, शिरपूर तालुक्याला सामाजिक सलोखा आणि परंपरेचा उज्ज्वल इतिहास लाभला आहे. चोपडा जीन ते पित्रेश्वर कॉलनी मैदान या मार्गावरील मिरवणुकीत सर्वांनी पारंपरिक वेशभूषा आणि वाद्यांसह सहभागी व्हावे. मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी. ग्रामीण भागातील सरपंच व पोलीस पाटील यांनाही विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या असून आदिवासी बांधवांनी हा उत्सव शांततेत आणि बंधुभावाने साजरा करावा, असेही त्यांनी सांगितले.

उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) सुधीर पाटील यांनी पोलिसांकडून करण्यात आलेल्या सुरक्षा नियोजनाची माहिती देत सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.

पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी मिरवणुकीदरम्यान घातक हत्यारे न आणता केवळ पारंपरिक शस्त्रांच्या प्रतिकृतींचा वापर करावा, संशयास्पद अथवा गैरप्रकार करणाऱ्या व्यक्तींची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच आक्षेपार्ह गाणी वाजविणे टाळावे, असे आवाहन केले.

यावेळी सांगवी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मिलिंद पवार तसेच शांतता समितीचे सदस्य, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!