Homeक्राईमशिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे क्षेत्रातील ३ हजार ७२ किलो गांजाच्या झाडांची लागवड उघड; पोलीस-वन विभागाची संयुक्त कारवाई शिरपूर?

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३ हजार ७२ किलो वजनाची कॅनॅबिस (गांजा सदृश्य) वनस्पतींची उभी पिके आढळून आली असून, त्यांची अंदाजे किंमत ७ कोटी ६८ लाख रुपये असल्याची माहिती देण्यात आली आहे. दिनांक १ सप्टेंबर २०२६ रोजी जामन्यापाणी वनक्षेत्रालगत आजूबाजूच्या परिसरात अज्ञात इसमांनी कॅनॅबिस वनस्पतीची लागवड केल्याची गोपनीय माहिती वन विभाग व पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, प्रभारी अधिकारी, शिरपूर शहर पोलीस ठाणे यांना मिळाली. त्यानंतर ही माहिती धुळे येथील मा. मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आली. NDPS कायदा १९८५ मधील कलम ५२अ नुसार दुर्गम भागातून गांजा वाहून आणणे शक्य नसल्याने, न्यायालयाच्या देखरेखीखाली मालमत्तेची यादी तयार करून मुद्देमाल नष्ट करण्यासाठी विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्या छापा कारवाईसाठी नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार २ सप्टेंबर २०२६ रोजी शिरपूर तालुका पोलीस ठाणे व वन विभागाने संयुक्तरीत्या अतिदुर्गम भागातील नियतक्षेत्र भोरखेडा, रोहिणी व खंबाळे परिसरात कारवाई केली. या भागातील सुमारे ९० गुंठे क्षेत्रावर मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या कॅनॅबिस वनस्पतीची बेकायदेशीर लागवड केल्याचे आढळून आले. कारवाईदरम्यान विविध ठिकाणी आढळलेल्या गांजाच्या पिकाची किंमत पुढीलप्रमाणे आहे : ८२८ किलो कॅनॅबिस वनस्पती — अंदाजे २ कोटी ७ लाख रुपये २ हजार १४४ किलो कॅनॅबिस वनस्पती — अंदाजे ५ कोटी ३६ लाख रुपये १०० किलो कॅनॅबिस वनस्पती — अंदाजे २५ लाख रुपये अशा प्रकारे एकूण ३ हजार ७२ किलो गांजाच्या वनस्पतींची किंमत ७ कोटी ६८ लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यापैकी जागेवरच गांजाच्या झाडांचा नाश करण्यात आला असून, १० गुंठे क्षेत्रातील सुमारे १०० किलो कॅनॅबिस वनस्पतींची झाडे पुढील कायदेशीर सोपस्कारासाठी जप्त करण्यात आली आहेत. छापा कारवाईदरम्यान हुक्का भिकला पावरा, रा. खंबाळे, ता. शिरपूर, जि. धुळे याचे नाव निष्पन्न झाले असून त्याच्याकडून वनपडत क्रमांक प्राप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात विविध रित्या गुन्हा दाखल

सदर कामगिरी यांनी केली पोलीस अधीक्षक धुळे श्री. विशाल आनंद, उपवनसंरक्षक धुळे (प्रादेशिक) श्री. मोहन नाईकवाडी यांचे मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधीर पाटील / सहा. वनसंरक्षक श्री. राहुल घरटे यांचे उपस्थितीत मा. कार्यकारी दंडाधिकारी श्री. महेश साळुंखे,तहसिल कार्यालय शिरपूर शिरपूर तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. जयपाल हिरे वन परिक्षेत्रीय अधिकारी-सांगवी श्री. विशाल दुसाणे श्री. कैलास सोनवणे श्री. सुनिल जोग/ श्री. किरण गिरवले पोउनि. मनोज कचरे / पोउनि. हेमंत खैरनार पोउनि. मिलींद पवार आणि शिरपूर तालुका पोलीस ठाणे व वनविभागाचे कर्मचारी अशांनी संयुक्तरित्या करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

कर्तव्याचा सन्मान! धुळे जिल्ह्याच्या भूमिपुत्राला केंद्रीय गृहमंत्र्यांचे प्रतिष्ठेचे पदक आर्थिक...

  शिरपूर | प्रतिनिधी कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिक सेवा आणि तपासातील अचूकता यांची राष्ट्रीय पातळीवर दखल घेत आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे यांना केंद्रीय गृहमंत्री...

error: Content is protected !!