Homeराजकीयशिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत; ९ सप्टेंबरला महिला आरक्षण निश्चित होणार

शिरपूर | प्रतिनिधी

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून, मंगळवार, ८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता शिरपूर तहसील कार्यालयातील नवीन प्रशासकीय इमारतीत आरक्षण सोडत आयोजित करण्यात आली आहे.

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या २०२५ ते २०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या सरपंच पदांसाठी यापूर्वी जून २०२५ मध्ये आरक्षण सोडत घेण्यात आली होती. मात्र, त्यानंतरच्या सुधारित आरक्षणानुसार नव्याने सोडत घेण्यात येणार आहे.

📌 सुधारित आरक्षणानुसार वर्गवारी

एकूण ६८ ग्रामपंचायतींपैकी—

🔵 अनुसूचित जाती (SC) – ४ ग्रामपंचायती

🟢 अनुसूचित जमाती (ST) – १४ ग्रामपंचायती

🟠 नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) – १६ ग्रामपंचायती

⚪ सर्वसाधारण प्रवर्ग – ३४ ग्रामपंचायती

अशा प्रकारे एकूण ६८ सरपंच पदांसाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.

👩‍🦰 ९ सप्टेंबरला महिला आरक्षणाची सोडत

यानंतर बुधवार, ९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता, शिरपूरचे उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महिला आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया पार पडणार आहे. ही प्रक्रिया देखील शिरपूर तहसील कार्यालयातील नवीन प्रशासकीय इमारतीत होणार आहे.

इच्छुकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

या दोन्ही आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेसाठी तालुक्यातील आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, आजी-माजी सरपंच व उपसरपंच, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार महेंद्र माळी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

कर्तव्याचा सन्मान! धुळे जिल्ह्याच्या भूमिपुत्राला केंद्रीय गृहमंत्र्यांचे प्रतिष्ठेचे पदक आर्थिक...

  शिरपूर | प्रतिनिधी कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिक सेवा आणि तपासातील अचूकता यांची राष्ट्रीय पातळीवर दखल घेत आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे यांना केंद्रीय गृहमंत्री...

error: Content is protected !!