Homeताज्या बातम्याकर्तव्याचा सन्मान! धुळे जिल्ह्याच्या भूमिपुत्राला केंद्रीय गृहमंत्र्यांचे प्रतिष्ठेचे पदक ...

कर्तव्याचा सन्मान! धुळे जिल्ह्याच्या भूमिपुत्राला केंद्रीय गृहमंत्र्यांचे प्रतिष्ठेचे पदक आर्थिक गुन्ह्यांच्या तपासातील उल्लेखनीय कामगिरीची दखल; सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे यांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

शिरपूर | प्रतिनिधी

कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिक सेवा आणि तपासातील अचूकता यांची राष्ट्रीय पातळीवर दखल घेत आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे यांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर झाले आहे. हा सन्मान केवळ त्यांच्या वैयक्तिक कार्याचा नसून धुळे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

मुंबई, थाळनेर, धुळे, नाशिक यांसह विविध ठिकाणी सेवा बजावताना उमेश बोरसे यांनी अनेक क्लिष्ट आणि गाजलेल्या गुन्ह्यांचा यशस्वी तपास करून आपली वेगळी ओळख निर्माण केली. गुन्ह्याच्या मुळापर्यंत पोहोचण्याची हातोटी, तांत्रिक पुराव्यांचा प्रभावी वापर, कायद्याचे सखोल ज्ञान आणि निष्पक्ष तपास या गुणांमुळे त्यांनी अनेक प्रकरणांना योग्य दिशा दिली.

तपासातील अचूकता ठरली यशाची गुरुकिल्ली

आर्थिक गुन्ह्यांचा तपास हा अत्यंत गुंतागुंतीचा मानला जातो. मात्र, कागदपत्रांचे बारकाईने विश्लेषण, आर्थिक व्यवहारांचा सखोल अभ्यास आणि आधुनिक तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर करून उमेश बोरसे यांनी अनेक कठीण प्रकरणे यशस्वीरीत्या उकलली. त्यांच्या तपासशैलीमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह न्यायव्यवस्थेचाही विश्वास त्यांनी संपादन केला.

दबावाला न झुकता कायद्याच्या चौकटीत काम

कर्तव्य बजावताना कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता कायद्याच्या चौकटीत राहून निष्पक्षपणे काम करणे, ही त्यांच्या कार्यशैलीची सर्वात मोठी ताकद मानली जाते. शिस्त, वेळेचे भान, तपासातील बारकावे आणि जनतेशी संवेदनशील संवाद यामुळे ते पोलीस दलातील विश्वासार्ह व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात.

समाजहिताची जपलेली बांधिलकी

गुन्हे उघडकीस आणण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था राखणे, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेत तत्पर आणि न्याय्य कारवाई करण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे नागरिकांचाही त्यांच्यावर विशेष विश्वास आहे.

महाराष्ट्र पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा

केंद्रीय गृहमंत्री पदक हे उत्कृष्ट तपासकौशल्य आणि उल्लेखनीय सेवेसाठी दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च सन्मानांपैकी एक मानले जाते. उमेश बोरसे यांच्या कार्याची केंद्र शासनाने घेतलेली ही दखल त्यांच्या सेवाभावी वृत्तीची आणि प्रामाणिक कर्तव्यनिष्ठेची साक्ष आहे.

या गौरवपूर्ण यशाबद्दल पोलीस अधिकारी, प्रशासन, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार आणि नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या या यशाने धुळे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलाचा अभिमान उंचावला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!