Homeराजकीयफेक ऑडिओ क्लिपचा कट? माजी मंत्री आमरीशभाई पटेल यांच्या नावाने व्हायरल ऑडिओप्रकरणी...

फेक ऑडिओ क्लिपचा कट? माजी मंत्री आमरीशभाई पटेल यांच्या नावाने व्हायरल ऑडिओप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात  तक्रार

शिरपूर | प्रतिनिधी

माजी मंत्री तथा माजी आमदार आमरीशभाई पटेल यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करून तयार करण्यात आल्याचा दावा असलेली कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शिरपूरच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

फिर्यादीनुसार, ५ ऑगस्ट रोजी एका परिचित व्यक्तीमार्फत इन्स्टाग्रामवरील व्हायरल रीलची लिंक प्राप्त झाली. संबंधित लिंक उघडून पाहिल्यानंतर आमरीशभाई पटेल यांच्या आवाजाशी साधर्म्य असलेली कथित ऑडिओ क्लिप प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले. या व्हिडिओमध्ये एका मराठी वृत्तवाहिनीच्या नावाचा वापर करून दिशाभूल करणारा मजकूरही दाखविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) किंवा अन्य तांत्रिक माध्यमांचा वापर करून आमरीशभाई पटेल यांच्या आवाजाची बनावट प्रतिकृती तयार करण्यात आली असावी, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकारामुळे त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा आणि जनतेमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

फिर्यादीने संबंधित इन्स्टाग्राम लिंक, स्क्रीनशॉट आणि उपलब्ध तांत्रिक पुरावे पोलिसांकडे सुपूर्द केले असून, ही क्लिप नेमकी कोणी तयार केली, ती सोशल मीडियावर कोणी प्रसारित केली आणि त्यामागील उद्देश काय होता, याचा तपास सुरू आहे.

पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तांत्रिक तपास करत असून, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!