Homeक्राईमशिरपूरात बालिकेवरील अत्याचार प्रकरणी मूक मोर्चा

शिरपूरात बालिकेवरील अत्याचार प्रकरणी मूक मोर्चा

शिरपूर तालुक्यातील आठ वर्षीय बालिकेवर 15 ऑगस्ट रोजी अमानुष लैंगिक अत्याचार करण्यात आला. हा प्रकार समोर येतात तालुक्यात संतापाची लाट उसळली. हा संताप व्यक्त करण्यासाठी आणि आरोपी अनिल काळे याला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी आज (18 ऑगस्ट) शिरपूर शहरात हजारोंच्या संख्येने नागरिकांनी मूक मोर्चा काढला. या मोर्चात रहिवाशांसह विविध संघटना, आदिवास समाज, विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सर्वत्र स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना नराधम अनिल काळे (वय 28) याने या बालिकेवर लैंगिक अत्याचार केला आणि तिला रस्त्याच्या कडेला फेकून दिले. एक मुलगी रस्त्याच्या कडेला पडल्याची माहिती शिरपूर तालुका पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तपास सुरू करण्यात आला आणि अवघ्या एका तासात आरोपी नराधम अनिल काळे यांच्या मुसक्या आवळ्यात आल्या. मात्र या लज्जास्पद घटनेमुळे शिरपूर तालुक्यास शहरात संतापाची तीव्र लाट पसरली आहे.या घटनेचा निषेध करण्यासाठी आज (18 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता चोपडा जिनपासून मोर्चाला सुरुवात झाली. आदिवासी समाज, विविध संघटनांचे कार्यकर्ते आदी या मूक मोर्चात सहभागी झाले. या मूक मोर्चात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. मूक मोर्चाने उपविभागीय कार्यालयात पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी यांना निवेदन दिले आणि आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. या मोर्चात आमदार काशीराम पावरा, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्ष धरती देवरे, मनोज पावरा, विलास पावरा आदी सहभागी झाले होते.

हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशी द्यावी, अशी मागणी केल्याचे आमदार काशीराम पावरा यांनी सांगितले. तसेच या याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. काहीही झाले तरी आरोपीली कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी शिरपूरवासीयांनी केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!