Homeताज्या बातम्याशिरपूर तालुक्यात बीएलओ व सुपरवायझर यांचे प्रभावी प्रशिक्षण देण्यात आले!

शिरपूर तालुक्यात बीएलओ व सुपरवायझर यांचे प्रभावी प्रशिक्षण देण्यात आले!

शिरपुर एस. एम. पटेल हॉल, करवंद नाका, शिरपूर येथे आज शिरपूर तालुक्यातील बीएलओ (Booth Level Officer) आणि सुपरवायझर यांचा व्यापक व प्रेरणादायी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाचे आयोजन मा. प्रांत अधिकारी श्री. शरद मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमास मा. तहसीलदार श्री. महेंद्र माळी व निवडणूक नायब तहसीलदार मा. श्री. रविंद्र कुमावत यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात पांडू बापू माळी म्युनिसिपल हायस्कूल, शिरपूर येथील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या प्रभावी मतदान जागृती गीताने झाली. या गीताच्या माध्यमातून लोकशाहीविषयी जनजागृती निर्माण झाली. यानंतर मा. तहसीलदार श्री. महेंद्र माळी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत प्रशिक्षणाचा उद्देश स्पष्ट केला.

प्रशिक्षणादरम्यान IIIDEM, दिल्ली येथील राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रात तयार करण्यात आलेला डेमो व्हिडिओ दाखवण्यात आला. त्यानंतर दिल्ली येथे राष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षण घेतलेल्या मास्टर ट्रेनर श्री. दीपक पाटील यांनी उपस्थितांना आपल्या अनुभवातून प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

प्रशिक्षण सत्रात बीएलओंची भूमिका, कर्तव्ये व जबाबदाऱ्या यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बीएलओ ॲप, वोटर हेल्पलाइन ॲप, BLA, BLV, BAG आणि SIR यासारख्या तांत्रिक संकल्पनांचे सखोल विवेचन PowerPoint सादरीकरणाच्या माध्यमातून करण्यात आले. घरोघरी सर्वेक्षण करताना येणाऱ्या अडचणींचे उदाहरणे मांडून, त्यावर सामूहिक चर्चेच्या माध्यमातून व्यावहारिक उपायही शोधण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी 30 वस्तुनिष्ठ प्रश्नांचा सराव गूगल फॉर्मद्वारे घेण्यात आला, ज्यामुळे प्रशिक्षण अधिक प्रभावी आणि सहभागात्मक ठरले.

या प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनामध्ये निवडणूक विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. उपस्थित बीएलओ व सुपरवायझर यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हा उपक्रम लोकशाही प्रक्रियेतील सहभाग अधिक बळकट करणारा ठर

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!