Homeक्राईमशिरपूर शहर पोलीस ठाण्याचा ‘मेगा स्ट्राइक’! १ कोटी ५२ लाख ५०...

शिरपूर शहर पोलीस ठाण्याचा ‘मेगा स्ट्राइक’! १ कोटी ५२ लाख ५० हजारांचा गांजा जप्त! आंबाफाट्याच्या डोंगराळ भागात ६१० किलो गांजाची बेकायदेशीर शेती उद्ध्वस्त; शिरपूर शहर पोलीस ठाण्याची धडक कारवाई!

शिरपूर : शिरपूर शहर पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत आंबाफाटा गावाच्या पुढील डोंगराळ भागात वनपट्ट्यावरील जमिनीवर बेकायदेशीररीत्या लागवड केलेले गांजाचे पीक उद्ध्वस्त केले. या कारवाईत तब्बल ६१० किलो वजनाची गांजाची उभी झाडे जप्त करण्यात आली असून, त्यांची अंदाजित किंमत १ कोटी ५२ लाख ५० हजार रुपये आहे.

दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी आंबाफाटा, ता. शिरपूर, जि. धुळे गावाच्या पुढील डोंगराळ भागातील वनपट्ट्याच्या जमिनीवर अज्ञात व्यक्तींनी प्रतिबंधित कॅनाबीस वनस्पतीची (गांजा) बेकायदेशीर लागवड केल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीची खातरजमा करून शिरपूर शहर पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईदरम्यान राजपत्रित अधिकारी, शासकीय पंच, वन परिक्षेत्रीय अधिकारी, वजनकाटाधारक, फोटोग्राफर आणि फॉरेन्सिक पथकाच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. यावेळी एकूण ६१० किलो वजनाची गांजाची उभी झाडे, अंदाजित किंमत १ कोटी ५२ लाख ५० हजार रुपये, असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

या प्रकरणी अज्ञात इसमांविरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा विविध नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई

ही कामगिरी धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, सपोनि वर्षा पाटील तसेच शिरपूर शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व पोलीस अंमलदारांनी पार पाडली.

या पथकात अतुल पाटील, मनोज पाटील, अनिल सोनार, पवन ईशी, रविंद्र अखडमल, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, मनोज महाजन, सोमा ठाकरे, भटु साळुंके, विनोद अखडमल, सचिन वाघ, आरिफ तडवी, गोपाल माळी, सतीश भामरे, दादाभाई बोरसे, निलेश चौधरी, प्रशांत बाविस्कर, अनिता पवार, रविंद्र महाले, जगन्नाथ कोळी व होमगार्ड मिथुन पवार यांचा समावेश होता.

शिरपूर शहर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध गांजा लागवड करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अमली पदार्थांविरोधातील पोलिसांची मोहीम अधिक तीव्र झाल्याचे चित्र आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूरमध्ये गांजा तस्करांवर पोलिसांचा छापा! पॅकिंग सुरू असतानाच धाड; मध्य प्रदेशातील सरपंचासह तिघे पसार...

शिरपूर,  : गांजाची विक्री करण्यासाठी पॅकिंग सुरू असतानाच सांगवी पोलिसांनी धडक कारवाई करत छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळी असलेल्या तिघांनी पळ काढला. विशेष...

पळासनेर दरोडा प्रकरणी पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये! ३ कोटी ६ लाखांच्या लुटीने धुळे जिल्हा...

शिरपूर : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पळासनेर परिसरात तब्बल ३ कोटी ६ लाख रुपयांच्या रोकड रकमेवर दरोडा टाकण्यात आल्याच्या गंभीर घटनेने संपूर्ण धुळे जिल्ह्यात खळबळ...

पळासनेरजवळ महामार्गावर ३ कोटी ६ लाखांचा सशस्त्र दरोडा! कार अडवून चालकासह साथीदाराला बेदम मारहाण;...

शिरपूर : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पळासनेर परिसरात तब्बल ३ कोटी ६ लाख रुपयांच्या रोकड रकमेवर दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अज्ञात पाच...

शिरपूर पोलिसांचा ‘मेगा स्ट्राइक’! ₹७ कोटी ६७ लाखांचा गांजा उद्ध्वस्त! ३,०६८ किलो...

  शिरपूर, धुळे : शिरपूर तालुक्यातील महादेव दोंदवाडा परिसरात अनेरडॅम वन्यजीव अभयारण्याच्या हद्दीतील वनविभागाच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे गांजाची लागवड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिरपूर...

शिरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचा ‘सर्जिकल स्ट्राइक’; ५.७७ कोटींची गांजासदृश अंमली...

  शिरपूर | प्रतिनिधी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात अवैध गांजा लागवडीविरोधात अवघ्या काही दिवसांत दोन मोठ्या कारवाया झाल्याने परिसरातील अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर लागवडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर...

error: Content is protected !!