Homeताज्या बातम्याधुळे जिल्ह्यात पोलिसांचा लोकाभिमुख उपक्रम — “स्मार्ट पोलिसिंग–टाईम बाऊंड सेवा” नागरिक सुविधा...

धुळे जिल्ह्यात पोलिसांचा लोकाभिमुख उपक्रम — “स्मार्ट पोलिसिंग–टाईम बाऊंड सेवा” नागरिक सुविधा केंद्राचा शुभारंभ

पासपोर्ट–व्हिसा–चारित्र्य पडताळणीसह सर्व कामे आता एका क्लिकइतकी जवळ**

धुळे : जनतेच्या सेवेला प्राधान्य देत धुळे पोलिस दलाने आज एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी थेट संबंधित असलेल्या विविध सेवांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे “स्मार्ट पोलिसिंग–टाईम बाऊंड सेवा” या संकल्पनेवर आधारित नवीन नागरिक सुविधा केंद्र आजपासून कार्यान्वित झाले.जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपअधीक्षक (गृह) ज्ञानेश्वर जाधव, पोलीस उपअधीक्षक विश्वजीत जाधव यांच्यासह अधिकारी–कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

.नागरिकांसाठी एकाच ठिकाणी सर्व सुविधा —

वेळ, श्रम आणि गोंधळाचा पूर्ण अंत!आतापर्यंत नागरिकांना पासपोर्ट, व्हिसा पडताळणी, चारित्र्य प्रमाणपत्र, वर्तवणूक दाखला किंवा परदेशी नागरिकांशी संबंधित कामांसाठी विविध विभागांच्या दाराआड भटकंती करावी लागत असे. कधी माहिती नसल्यामुळे तर कधी योग्य अधिकारी शोधण्यात मोठा वेळ खर्च होत असे.या सर्व समस्यांवर धुळे पोलिसांनी एकच उपाय शोधला —

नागरिक सुविधा केंद्र!

या केंद्रामध्ये आता खालील सर्व सेवा एकाच खिडकीतून उपलब्ध:पासपोर्ट व व्हिसा पडताळणी परदेशी नागरिकांबाबतची सर्व कामे नोकरीसाठी आवश्यक चारित्र्य पडताळणी वर्तवणूक दाखला सर्व आवक-जावक टपाल व्यवहार नागरिकांसाठी मार्गदर्शन, माहिती व अर्ज प्रक्रिया या सेवांमुळे प्रत्येक नागरिकाचा वेळ वाचणार, त्रास कमी होणार आणि कामकाजात पारदर्शकता वाढणार आहे. विभागांची माहिती एकाच जागी – गोंधळाला पूर्णविराम नव्या कक्षात पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व विभागांची माहिती, टेबल क्रमांक, अधिकारी यांची नावे आणि कामकाजाची यादी नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.यामुळे “कुठे जायचे?”, “कुणाला भेटायचे?” अशा प्रश्नांची आता गरजच उरणार नाही.हे केंद्र हे धुळे जिल्ह्यातील पहिलंच असे पूर्णपणे नागरिकाभिमुख सुविधा केंद्र ठरत आहे.

पासपोर्ट पडताळणी आणखी वेगवान — १८ संगणकांचे वितरण

धुळे जिल्ह्यात पासपोर्ट-बाबतची कामे मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने ती त्वरित आणि अचूक होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना १८ संगणकांचे वाटप करण्यात आले आहे.यामुळे पासपोर्ट पडताळणीची गती दुपटीने वाढणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

 नागरिक–पोलीस नात्याला नवा आयाम

या केंद्रामुळे:नागरिक–पोलीस संवाद अधिक मजबूत कामकाजात शिस्त व पारदर्शकता तक्रारी व गैरसमजांची संख्या घट लोकाभिमुख प्रशासनाला चालना सेवांचा वेळेत निपटारा अशाक अनेक सकारात्मक बदलांची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

लोकाभिमुख पोलिसिंगची नवी दिशा

उद्घाटनावेळी बोलताना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे म्हणाले— “पोलिसिंग म्हणजे केवळ कायदा-सुव्यवस्था राखणे नव्हे. नागरिकांना तात्काळ, पारदर्शक आणि सन्मानपूर्वक सेवा देणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. हे नागरिक सुविधा केंद्र म्हणजे लोकाभिमुख प्रशासनाकडे जाणारे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.”ते पुढे म्हणाले की, आगामी काळात या केंद्राच्या माध्यमातून अधिक आधुनिक तंत्रज्ञान, ऑनलाइन सुविधा आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर आधारित सेवा सुरु करून नागरिकांना आणखी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.

 धुळे जिल्ह्यातील पोलिसिंग आता अधिक स्मार्ट, अधिक वेगवान आणि नागरिकाभिमुख!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड येथील रेस्टोबारमध्ये वादातून तिघांनी एकाला बेदम मारहाण केली

पुणे : दौंड तालुक्यातील सहजपूर गावात आदल्या दिवशी एका व्यक्तीचा (३९) चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी यवत पोलिसांनी मंगळवारी तिघांना अटक केली.याप्रकरणी पिंपळे गुरव रहिवासी...

जुन्नरमध्ये बिबट्याचे हल्ले कमी करण्यासाठी AI-आधारित सायरन, सेलफोन अलर्ट

पुणे: जुन्नर वनविभागाने 20 अतिसंवेदनशील गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्राणी शोधणे आणि सतर्कता यंत्रणा बसवली आहे, जेथे बिबट्याचे दर्शन आणि हल्ले रहिवाशांसाठी वारंवार धोक्याचे...

पोलीस वसाहतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला अटक

पुणे : शहरातील पोलीस वसाहतीत रविवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास समर्थ पोलिसांनी एका पोलीस हवालदाराच्या मुलाला (23) एका अल्पवयीन मुला (12) सोबत अश्लील चाळे...

जनगणना कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख सत्यापित करण्यासाठी QR कोड

पुणे: महाराष्ट्र 16 मे ते 14 जून या कालावधीत घरोघरी जाऊन गणनेचा सराव सुरू करणार असून, खऱ्या जनगणनेच्या अधिकाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी नवीन...

दरवाढीच्या भीतीने पेट्रोल, डिझेलच्या विक्रीत २० टक्क्यांनी वाढ, पंतप्रधानांची घोषणा

पुणे: इंधनाच्या संभाव्य दरवाढीच्या अंदाजात पेट्रोल पंपांवर कोणतीही गर्दी दिसत नसली तरीही गेल्या दोन-तीन दिवसांत शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत सुमारे 20% वाढ झाल्याचे...

error: Content is protected !!