Homeक्राईमधुळे सायबर पोलिसांची मोठी कारवाई अवैध ऑनलाईन शेअर ट्रेडिंग कॉल सेंटरचा पर्दाफाश;...

धुळे सायबर पोलिसांची मोठी कारवाई अवैध ऑनलाईन शेअर ट्रेडिंग कॉल सेंटरचा पर्दाफाश; ३.१४ कोटींची फसवणूक, ४ आरोपी जेरबंद ?

शिरपूर | प्रतिनिधी ऑनलाईन शेअर मार्केटमध्ये अल्पावधीत मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल ३ कोटी १४ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय कॉल सेंटर टोळीचा धुळे सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार आहेत. विशेष म्हणजे, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत फिर्यादीचे तब्बल १ कोटी १९ लाख रुपये परत मिळवून देण्यात यश मिळवले आहे. फिर्यादी हर्षद नारायण देशपांडे (रा. स्नेहनगर, धुळे) यांना व्हॉट्सअॅप लिंकद्वारे “848 FYERS HNI VIP Growth Hub” या ग्रुपमध्ये जोडण्यात आले होते. आरोपींनी “FYERS INDIA (HNI)” नावाचे बनावट अॅप डाउनलोड करण्यास सांगून सुरुवातीला शेअर मार्केटमध्ये नफा दाखवला. विश्वास बसल्यानंतर विविध बँक खात्यांमध्ये RTGS, NEFT आणि UPI द्वारे तब्बल ३,१४,९९,८९१ रुपये जमा करून घेतले. मात्र, कोणताही परतावा न देता आरोपींनी फिर्यादीची फसवणूक केली. या प्रकरणी धुळे सायबर पोलीस ठाण्यात BNS कलम 318(4), 319(2) तसेच आयटी अॅक्ट कलम 66(D) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायगावमध्ये बनावट कॉल सेंटर सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सखोल तपास करत वसईतील नायगाव येथे सुरू असलेले बनावट कॉल सेंटर उघडकीस आणले. बनावट सिमकार्डचा वापर करून आरोपी देशभरातील नागरिकांना IPO आणि शेअर ट्रेडिंगमध्ये जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत होते. अटक आरोपी साबिर मोहम्मद खान (नवी मुंबई) सनत संजीव दास (वसई) राहुलकुमार शुक्ला ऊर्फ कैलाश (मिरारोड) आमिर करमशेर खान (झारखंड) तर अभिषेक नारकर ऊर्फ गोपाल आणि रोशनकुमार शेट्टी हे आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. नागरिकांना पोलिसांचे आवाहन सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ऑनलाईन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना केवळ SEBI नोंदणीकृत ब्रोकर्समार्फतच व्यवहार करावेत. कोणत्याही अनोळखी लिंक, बनावट अॅप किंवा जास्त परताव्याच्या आमिषाला बळी पडू नये.

ही कारवाई यांनी केलीमा. पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद (भा.पो.से.) व अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. अभिजित सोनवणे यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार राजेंद्र मोरे, भूषण खलाणेकर, दिनेश श्रीराव, प्रसाद वाघ, चेतन सोनगीरे, हेमंत वागले, तुषार पोतदार, विवेक बिलाडे, महेश मराठे, शितल लोहार, प्रियंका देवरे व इंदिरा वाघ यांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोचिंग असोसिएशनने म्हटले आहे की लीक थांबवण्यासाठी NEET वर्षातून दोनदा आणि ऑनलाइन ठेवा. पुणे...

NEET-UG प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. पुणे : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने बुधवारी अशी मागणी केली आहे की भविष्यातील गळती आणि गैरप्रकार...

ज्युनियर डेव्हिस चषक आशिया-ओशनिया अंतिम पात्रता स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताची मजल

पुणे: कझाकस्तानमधील श्यामकेंट येथे बुधवारी झालेल्या ज्युनियर डेव्हिस कप (१६ वर्षांखालील) आशिया-ओशनिया अंतिम पात्रता स्पर्धेत भारतीय मुलांनी चीनचा ३-० असा धुव्वा उडवत...

वनराज खून प्रकरणातील संशयिताच्या भावावर पाच जणांनी गोळीबार केला आणि त्याच्यावर प्राणघातक हल्ला, पीडितेचा...

जखमी ऑटोरिक्षा चालक अक्षय म्हस्के हा त्याच्या तीनचाकीमध्ये नाश्त्यासाठी थांबला असताना बुधवारी सकाळी हल्लेखोरांनी त्याच्यावर जवळून गोळीबार केला आणि त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला....

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने मुंढवा जमीन कायमस्वरूपी बीएसआयकडे हस्तांतरित करण्याचा अंतिम प्रस्ताव पाठवला आहे

पुणेमुंढवा येथील अंदाजे ४४.५ एकर जमीन भारतीय बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया (BSI) कडे कायमस्वरूपी हस्तांतरित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अंतिम प्रस्ताव राज्य सरकारकडे...

अमरिशभाई पटेल व आ. काशिराम पावरा यांच्या पाठपुराव्याला यश, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून...

    शिरपूर : माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व आमदार काशिराम दादा पावरा यांच्या पाठपुराव्यामुळे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत आदिवासी दुर्गम व ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी 14 कोटी रुपये मंजूर...

error: Content is protected !!