Homeक्राईमभरधाव स्कार्पिओचा थरारक कहर; भाविकांना जोरदार धडक – एक महिला ठार, युवती...

भरधाव स्कार्पिओचा थरारक कहर; भाविकांना जोरदार धडक – एक महिला ठार, युवती गंभीर जखमी! 

शिरपूर (प्रतिनिधी) : शिरपूर तालुक्यातील सेंधवा-शिरपूर महामार्गावर गुरुवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघाताने परिसर हादरला. नटवाडे फाट्यालगत पाटील ढाब्यासमोर भरधाव वेगाने धावणाऱ्या स्कार्पिओ कारने सप्तश्रृंगी गडाकडे पायी निघालेल्या महिला भाविकांना जोरदार धडक दिली. या हृदयद्रावक अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर एक युवती गंभीर जखमी झाली आहे.

अपघाताची थरारक घटना

सकाळी सुमारे ११.१५ वाजण्याच्या सुमारास (क्र. 24 BH 67 19 H) क्रमांकाची स्कार्पिओ कार अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या भाविकांवर धडकली. धडकेचा जोर इतका जबरदस्त होता की परिसरात एकच गोंधळ उडाला.

या अपघातात सखुबाई बाबूलाल भिल (वय ३५, रा. सुळे) यांचा जागीच मृत्यू झाला. तर मनीषा कालूसिंग पावरा (वय १६) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल शिंदे यांनी तपासणी करून सखुबाई भिल यांना मृत घोषित केले.

ग्रामस्थांचा संताप; ठिय्या आंदोलन

अपघाताची बातमी कळताच सुळे गावातील भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. संतप्त नागरिकांनी काही काळ ठिय्या आंदोलन करत निषेध व्यक्त केला. यामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ पूर्णपणे ठप्प झाली होती.

पोलिसांची धावपळ; परिस्थिती नियंत्रणात

घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलीस, थाळनेर पोलीस व महामार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला शांत करत परिस्थिती नियंत्रणात आणली व वाहतूक सुरळीत केली.

टायर फुटल्याने अपघाताचा प्राथमिक अंदाज

प्राथमिक माहितीनुसार, स्कार्पिओ वाहनाचा टायर अचानक फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा भीषण अपघात घडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. संबंधित चालक हा सैन्यात कार्यरत असून तो पत्नीसमवेत कर्तव्यावर हजर होण्यासाठी प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे.

आमदारांची तात्काळ भेट

अपघाताची माहिती मिळताच आमदार काशिराम पावरा यांनी तात्काळ रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व एपीआय हेमंत पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.पुढील तपास सुरूया प्रकरणी शिरपूर तालुका पोलीसांकडून पुढील तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड येथील रेस्टोबारमध्ये वादातून तिघांनी एकाला बेदम मारहाण केली

पुणे : दौंड तालुक्यातील सहजपूर गावात आदल्या दिवशी एका व्यक्तीचा (३९) चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी यवत पोलिसांनी मंगळवारी तिघांना अटक केली.याप्रकरणी पिंपळे गुरव रहिवासी...

जुन्नरमध्ये बिबट्याचे हल्ले कमी करण्यासाठी AI-आधारित सायरन, सेलफोन अलर्ट

पुणे: जुन्नर वनविभागाने 20 अतिसंवेदनशील गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्राणी शोधणे आणि सतर्कता यंत्रणा बसवली आहे, जेथे बिबट्याचे दर्शन आणि हल्ले रहिवाशांसाठी वारंवार धोक्याचे...

पोलीस वसाहतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला अटक

पुणे : शहरातील पोलीस वसाहतीत रविवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास समर्थ पोलिसांनी एका पोलीस हवालदाराच्या मुलाला (23) एका अल्पवयीन मुला (12) सोबत अश्लील चाळे...

जनगणना कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख सत्यापित करण्यासाठी QR कोड

पुणे: महाराष्ट्र 16 मे ते 14 जून या कालावधीत घरोघरी जाऊन गणनेचा सराव सुरू करणार असून, खऱ्या जनगणनेच्या अधिकाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी नवीन...

दरवाढीच्या भीतीने पेट्रोल, डिझेलच्या विक्रीत २० टक्क्यांनी वाढ, पंतप्रधानांची घोषणा

पुणे: इंधनाच्या संभाव्य दरवाढीच्या अंदाजात पेट्रोल पंपांवर कोणतीही गर्दी दिसत नसली तरीही गेल्या दोन-तीन दिवसांत शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत सुमारे 20% वाढ झाल्याचे...

error: Content is protected !!