Homeक्राईमशिरपूरमध्ये अवैध सावकारांवर सहकार विभागाचा धडाकेबाज छापा कोरे धनादेश, नोंदवह्या जप्त; शेतकऱ्यांना...

शिरपूरमध्ये अवैध सावकारांवर सहकार विभागाचा धडाकेबाज छापा कोरे धनादेश, नोंदवह्या जप्त; शेतकऱ्यांना धमकी प्रकरण उघड?

शिरपूर शेतकऱ्यांना अवैध पद्धतीने कर्ज देऊन त्यांच्याकडून दुप्पट-तिप्पट वसुली करणाऱ्या सावकारांवर सहकार विभागाने धडक कारवाई करत शहरात खळबळ उडवली आहे. भामपूर (ता. शिरपूर) व गोराणे (ता. शिंदखेडा) येथील दोन शेतकऱ्यांनी केलेल्या गंभीर तक्रारीनंतर बुधवारी (ता. १८) सहकार विभागाच्या पथकाने दोन ठिकाणी छापे टाकून महत्त्वाचा मुद्देमाल जप्त केला.
तक्रारदार शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरपूर येथील बाजार समिती परिसरात ‘गांगेश्वर ट्रेडिंग कंपनी’ चालविणारे व्यापारी मुकेश रमेशचंद्र अग्रवाल यांनी जून २०२५ मध्ये दोघांना प्रत्येकी ७५ हजार रुपये, असे एकूण दीड लाख रुपये उसनवार दिले होते. मात्र, केवळ चार महिन्यांतच या कर्जाची परतफेड करताना संबंधित शेतकऱ्यांकडून तब्बल ३ लाख ७० हजार रुपये वसूल करण्यात आले.
धक्कादायक बाब म्हणजे एवढी मोठी रक्कम परतफेड करूनही संबंधित सावकाराकडून अजून पैशांची मागणी केली जात होती. यासोबतच शिवीगाळ, दमदाटी व धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणाची दखल घेत सहायक निबंधक राजेंद्र वीरकर यांनी तात्काळ दोन स्वतंत्र पथके गठित केली. या पथकांनी गुरुवारी संबंधित व्यापाऱ्याचे दुकान तसेच शहरातील पित्रेश्वर कॉलनीतील निवासस्थानी एकाचवेळी छापा टाकला. सुमारे तीन तास चाललेल्या या कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी सखोल तपासणी केली.
छाप्यामध्ये चार कोरे धनादेश, व्यवहाराच्या दोन नोंदवह्या आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. या कागदपत्रांच्या आधारे अवैध सावकारीचा मोठा गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याबाबत बोलताना सहायक निबंधक राजेंद्र वीरकर यांनी सांगितले की, जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या अवैध सावकारीविरोधात निर्भीडपणे पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड येथील रेस्टोबारमध्ये वादातून तिघांनी एकाला बेदम मारहाण केली

पुणे : दौंड तालुक्यातील सहजपूर गावात आदल्या दिवशी एका व्यक्तीचा (३९) चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी यवत पोलिसांनी मंगळवारी तिघांना अटक केली.याप्रकरणी पिंपळे गुरव रहिवासी...

जुन्नरमध्ये बिबट्याचे हल्ले कमी करण्यासाठी AI-आधारित सायरन, सेलफोन अलर्ट

पुणे: जुन्नर वनविभागाने 20 अतिसंवेदनशील गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्राणी शोधणे आणि सतर्कता यंत्रणा बसवली आहे, जेथे बिबट्याचे दर्शन आणि हल्ले रहिवाशांसाठी वारंवार धोक्याचे...

पोलीस वसाहतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला अटक

पुणे : शहरातील पोलीस वसाहतीत रविवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास समर्थ पोलिसांनी एका पोलीस हवालदाराच्या मुलाला (23) एका अल्पवयीन मुला (12) सोबत अश्लील चाळे...

जनगणना कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख सत्यापित करण्यासाठी QR कोड

पुणे: महाराष्ट्र 16 मे ते 14 जून या कालावधीत घरोघरी जाऊन गणनेचा सराव सुरू करणार असून, खऱ्या जनगणनेच्या अधिकाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी नवीन...

दरवाढीच्या भीतीने पेट्रोल, डिझेलच्या विक्रीत २० टक्क्यांनी वाढ, पंतप्रधानांची घोषणा

पुणे: इंधनाच्या संभाव्य दरवाढीच्या अंदाजात पेट्रोल पंपांवर कोणतीही गर्दी दिसत नसली तरीही गेल्या दोन-तीन दिवसांत शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत सुमारे 20% वाढ झाल्याचे...

error: Content is protected !!