शिरपूर (प्रतिनिधी) –
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथे पोलिसांनी अंमली पदार्थांच्या अवैध धंद्यावर मोठा प्रहार करत तब्बल ₹37,45,965 किमतीचा 224.699 किलो गांजा, डोडा व अफूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे. राष्ट्रीय महामार्गालगत सुरू असलेल्या या बेकायदेशीर कारभाराचा पर्दाफाश झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, पोलिसांच्या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गोपनीय माहितीवरून उघड झाला काळा धंदा
दिनांक 18 मार्च 2026 रोजी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 लगत पळासनेर परिसरातील काही हॉटेल व ढाब्यांवर अंमली पदार्थांची साठवणूक व विक्री सुरू आहे.या माहितीची तात्काळ दखल घेत त्यांनी वरिष्ठ अधिकारी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे (धुळे) यांना कळवून छापा टाकण्याची परवानगी घेतली.
चार पथके, अचूक नियोजन आणि एकाच वेळी धडक
सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलिसांनी चार स्वतंत्र पथके तयार केली. पंच, वजनकाटा धारक व फोटोग्राफर यांच्या उपस्थितीत सकाळी 11:30 वाजता एकाच वेळी खालील तीन ठिकाणी छापे टाकण्यात आले 🔸 हॉटेल जय बाबारी🔸 जय मातादी ढाबा अॅण्ड रेस्टॉरंट🔸 हॉटेल रामदेव बाबा अचानक केलेल्या या कारवाईमुळे आरोपींना पळ काढण्याची कोणतीही संधी मिळाली नाही.जप्त मुद्देमाल – धक्कादायक प्रमाणछाप्यात खालील अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले –गांजाचा चुरा सुकलेला गांजा अफूची पावडर (डोडा)अफूच्या सुकलेल्या बोंडांचे तुकडेएकूण वजन: 224.699 किलो एकूण किंमत: ₹37,45,965/-हा साठा मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी ठेवण्यात आला असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.तीन आरोपी जेरबंद या कारवाईत पोलिसांनी खालील आरोपींना अटक केली –भल्ला उर्फ सोडा भरवाड गोपाळ रघु भरवाड लाला गांगु भरवाड(सर्व रा. चारणपाडा, पळासनेर, ता. शिरपूर, जि. धुळे या प्रकरणी पोहेकॉ शेखर बागुल यांच्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाणे येथे विविध प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू – मोठ्या रॅकेटचा शोधया गुन्ह्याचा पुढील तपास पो.स.ई. सुनील वसावे करीत असून, या प्रकरणामागे मोठे अंमली पदार्थ रॅकेट कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
यांनी कारवाई केली
मा. श्रीकांत धिवरे – पोलीस अधीक्षक, धुळे मा. अजय देवरे – अपर पोलीस अधीक्षक, धुळे मा. सुनील गोसावी – उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरपूर विभाग जयपाल हिरे – पोलीस निरीक्षक सुनील वसावे – पोलीस उपनिरीक्षक (मनोज कचरे – पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार – पोलीस उपनिरीक्षक शेखर बागुल राजू ढिसले – संदीप ठाकरे – सुनील पाठक अनिल चौधरी – कृष्णा पावरा – दिनकर पवार – स्वप्निल बांगर – विजय ढिवरे बडगुजर –शिवाजी वसावे जयेश मोरे अल्ताफ मिर्झा इसार फारुकी यांनी मिळून कारवाई केली

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















