Homeक्राईमशिरपूर तालुक्यात अन्न विभागाची धडक कारवाई प्रतिबंधित गुटखा-पानमसाल्याची...

शिरपूर तालुक्यात अन्न विभागाची धडक कारवाई प्रतिबंधित गुटखा-पानमसाल्याची ११.३२ लाखांची खेप जप्त; ७२५ किलो स्टार्च मक्क्याचा साठाही ताब्यात

शिरपूर, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांच्या वाहतुकीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. हाडाखेड चेकपोस्ट येथे केलेल्या तपासणीत वाहनातून ११ लाख ३२ हजार ६०० रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी वाहनचालकाविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मा. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार धुळे जिल्ह्यात अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या अनुषंगाने विविध अन्न आस्थापनांची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत १७ सप्टेंबर रोजी शिरपूर येथील मे. रतलाम इंटरप्राईजेस, प्लॉट क्रमांक १, बालाजी नगर, मांडळ शिवार येथे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने तपासणी केली.

तपासणीदरम्यान स्टार्च मक्का या अन्नपदार्थाचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. तसेच संशयाच्या आधारे ७२५ किलो साठा, अंदाजे ८७ हजार रुपये किमतीचा, जप्त करण्यात आला. नमुन्यांचा विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

हाडाखेड चेकपोस्टवर वाहनाची तपासणी

दरम्यान, १९ सप्टेंबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार इंदोरहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा व पानमसाला वाहून नेला जाणार असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यानुसार हाडाखेड चेकपोस्ट, सांगवी, ता. शिरपूर येथे अशोक लेलँड कंपनीचे वाहन क्रमांक NL-01-AF-1275 थांबवून तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान वाहनामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला पानमसाला, गुटखा व तंबाखूचा साठा आढळून आला. या कारवाईत १,२७५ पॅकेट्स, एकूण किंमत ११ लाख ३२ हजार ६०० रुपये, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी वाहनचालक नाजीर माजिद, रा. मेवात, ता. नुहू, हरियाणा याच्याविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाणे, सांगवी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

सदर कारवाई सह आयुक्त मंगेश माने (नाशिक) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त (अन्न) गो. वी. माहोरे तसेच अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार, अरविंद राऊत आणि मंगेश भावसार यांनी केली.

अन्नपदार्थांच्या गुणवत्तेसह प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक व विक्री रोखण्यासाठी प्रशासनाकडून तपासणी व कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!