Homeमनोरंजनसावळदे येथे महाशिवरात्रीनिमित्त ऐतिहासिक आणि भव्य यात्रा ३१ फुटी त्रिशूल स्थापना,...

सावळदे येथे महाशिवरात्रीनिमित्त ऐतिहासिक आणि भव्य यात्रा ३१ फुटी त्रिशूल स्थापना, तापी घाटावर प्रथमच महाआरती; सामाजिक सभागृहाचे लोकार्पण

सावळदे येथे महाशिवरात्रीनिमित्त ऐतिहासिक आणि भव्य यात्रा

३१ फुटी त्रिशूल स्थापना, तापी घाटावर प्रथमच महाआरती; सामाजिक सभागृहाचे लोकार्पण

सावळदे तापी घाट परिसरात वसलेल्या श्री तीर्थक्षेत्र महादेव मंदिरात यंदा महाशिवरात्रीनिमित्त दि. १३ ते १५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान भव्य आणि ऐतिहासिक यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक वैभव आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम साधणारी ही यात्रा संपूर्ण पंचक्रोशीचे लक्ष वेधून घेणार आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेदरम्यान तापी घाट परिसर भक्तिरसाने भारावून जाणार असून हजारो भाविकांच्या उपस्थितीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आकर्षक कार्यक्रमांची रेलचेल, भव्य सजावट, प्रकाशयोजना आणि भक्तिमय वातावरणामुळे सावळदे गाव सणासुदीचे केंद्रबिंदू ठरणार आहे.

यात्रेची भव्य सुरुवात

दि. १३ फेब्रुवारी रोजी यात्रेची सुरुवात सुप्रसिद्ध लोकनाट्य तमाशा सम्राट भीमा नामा अंजाळेकर यांच्या बहारदार तमाशा सादरीकरणाने होणार आहे. ग्रामीण संस्कृतीचा अस्सल ठसा उमटवणारा हा कार्यक्रम पहिल्याच दिवशी यात्रेचा उत्साह द्विगुणित करणार आहे.

भक्तिरसाची अनुभूती

दि. १४ फेब्रुवारी रोजी रात्री ९ ते ११ या वेळेत हरिभक्तपरायण ह.भ.प. धनश्रीताई भडगावकर यांचे प्रभावी कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. त्यांच्या ओघवत्या वाणीमधून भाविकांना शिवभक्तीचा अमृतानुभव मिळणार आहे.

महाशिवरात्रीचा मुख्य सोहळा

दि. १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी ८ ते ११ या वेळेत ढोल-ताशांच्या गजरात, जयघोषात आणि पारंपरिक वेशभूषेत भव्य त्रिशूल शोभायात्रा गावातून मार्गक्रमण करणार आहे.

यानंतर सकाळी ११ ते ११.३० या वेळेत ३१ फुटी भव्य त्रिशूल व कलश स्थापना विधिवत पार पडणार आहे. यावेळी शिवलिंग पूजन, कळस स्थापना तसेच महादेव मंदिराच्या जिर्णोद्धाराशी संबंधित धार्मिक विधी मोठ्या भक्तिभावाने संपन्न होणार आहेत.

याच दिवशी श्री वीर एकलव्य भगवान जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत हरिभक्तपरायण ह.भ.प. योगेश महाराज चिंचोलीकर यांचे कीर्तन होऊन महाशिवरात्रीचा दिवस भक्तीमय वातावरणात साजरा होणार आहे.

खान्देशात प्रथमच तापी मातेची भव्य महाआरती

महाशिवरात्रीपासून तापी घाटावर तापी मातेच्या भव्य महाआरतीचा शुभारंभ होणार असून हा सोहळा लोकनेते सरकार साहेब रावल यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. खान्देशात प्रथमच होणारी ही विशाल महाआरती ऐतिहासिक ठरणार असून तापी मातेचा साडी-चोळी व नारळ अर्पण करून सन्मान करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे तापी घाटाला धार्मिक व सांस्कृतिक दृष्ट्या नवी ओळख मिळणार आहे.

सामाजिक बांधिलकीचा ठसा

या यात्रेचे आणखी एक महत्त्वाचे आकर्षण म्हणजे केवलसिंग बन्सीलाल राजपूत यांच्या वतीने स्वर्गीय डॉ. चिरंजीव अभिषेकदादा राजपूत यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या भव्य सामाजिक सभागृहाचे नामकरण व लोकार्पण. या दातृत्वपूर्ण कार्याबद्दल राजपूत परिवाराचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमादरम्यान आकर्षक लेझर लाईट शो देखील सादर होणार आहे.

भाविकांसाठी विशेष सोयी

यात्रेदरम्यान तापी नदीकाठी नौकाविहार (बोटिंग) सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन स्टॉल, रक्तदान शिबिर आणि शासकीय वैद्यकीय शिबिर आयोजित करण्यात आले असून धार्मिकतेसोबत सामाजिक उपक्रमांनाही प्राधान्य देण्यात आले आहे.

भविष्यात तापी घाटाला खान्देशातील एक प्रमुख सांस्कृतिक, धार्मिक व पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा संकल्प सावळदे येथील उपसरपंच तथा पॅनल प्रमुख गटनेते सचिन पदमसिंग राजपूत यांनी व्यक्त केला आहे.

या भव्य, ऐतिहासिक आणि भक्तिमय सोहळ्यास माता-भगिनी, युवक मंडळे व समस्त भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवावी, असे आवाहन समस्त सावळदे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पोलीस वसाहतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला अटक

पुणे : शहरातील पोलीस वसाहतीत रविवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास समर्थ पोलिसांनी एका पोलीस हवालदाराच्या मुलाला (23) एका अल्पवयीन मुला (12) सोबत अश्लील चाळे...

जनगणना कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख सत्यापित करण्यासाठी QR कोड

पुणे: महाराष्ट्र 16 मे ते 14 जून या कालावधीत घरोघरी जाऊन गणनेचा सराव सुरू करणार असून, खऱ्या जनगणनेच्या अधिकाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी नवीन...

दरवाढीच्या भीतीने पेट्रोल, डिझेलच्या विक्रीत २० टक्क्यांनी वाढ, पंतप्रधानांची घोषणा

पुणे: इंधनाच्या संभाव्य दरवाढीच्या अंदाजात पेट्रोल पंपांवर कोणतीही गर्दी दिसत नसली तरीही गेल्या दोन-तीन दिवसांत शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत सुमारे 20% वाढ झाल्याचे...

पुणे जिल्हा प्रशासनाने उष्णतेच्या लाटेचा सल्ला जारी केला आहे, कंपन्यांना कामगारांसाठी पंखे आणि विश्रांतीची...

पुणे: जिल्हा प्रशासनाने बुधवारी उष्णतेच्या लाटेचा सल्ला जारी करून उद्योग, कारखाने आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या आयोजकांना कामगार आणि अभ्यागतांसाठी पिण्याचे पाणी, छायांकित विश्रांती...

बारामती हवाई पट्टीजवळ प्रशिक्षण विमान कोसळले, पायलट किरकोळ जखमी होऊन बचावला

पुणे: रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीचे एक विमान बुधवारी सकाळी 8.50 च्या सुमारास पुणे जिल्ह्यातील बारामती हवाई पट्टीजवळ क्रॅश लँड झाले आणि प्रशिक्षणार्थी वैमानिक किरकोळ...

error: Content is protected !!