Homeमहत्त्वाचेअन्न व औषध प्रशासनाची दुग्ध व्यवसायिकांसाठी कार्यशाळा; २५० दूध उत्पादक व डेअरी...

अन्न व औषध प्रशासनाची दुग्ध व्यवसायिकांसाठी कार्यशाळा; २५० दूध उत्पादक व डेअरी व्यावसायिकांचा उत्स्फूर्त सहभाग

धुळे | प्रतिनिधी

अन्न व औषध प्रशासन, धुळे यांच्या वतीने दूध उत्पादक शेतकरी, डेअरी चालक व दुग्ध व्यवसायिकांसाठी आयोजित करण्यात आलेली “प्राथमिक दूध संकलन ते दूध प्रक्रिया व दुग्धजन्य पदार्थ उत्पादन” या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा गुरुवारी (दि. ३०) दाते सीजेएससी, मालेगाव रोड, धुळे येथे उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत जिल्ह्यातील तब्बल २५० दूध उत्पादक शेतकरी, डेअरी चालक व दुग्ध व्यवसायिकांनी सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सहाय्यक आयुक्त (अन्न) श्री. गोपाल माहोरे यांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या सुरक्षित उत्पादन, प्रक्रिया व विक्रीसाठी आवश्यक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. सुरक्षित अन्न पुरवठा, ग्राहकांचा विश्वास आणि गुणवत्तापूर्ण दुग्ध व्यवसायासाठी शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यानंतर शासकीय कृषी महाविद्यालय, धुळे येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. देसले यांनी जागतिक व स्थानिक दूध उत्पादनाची सद्यस्थिती, दुग्ध व्यवसायातील संधी, भविष्यातील आव्हाने आणि बदलत्या बाजारपेठेत गुणवत्तेचे वाढते महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

कृषी विज्ञान केंद्र, धुळे येथील डॉ. धनराज चौधरी यांनी दुधाचे पोषणमूल्य, मानवी आहारातील महत्त्व, दूध स्वीकारताना घ्यावयाची काळजी, भेसळीचे प्रकार, भेसळ ओळखण्यासाठीच्या वैज्ञानिक चाचण्या तसेच फॅट (Fat) आणि एसएनएफ (SNF) यांच्या प्रमाणावरून भेसळीची शक्यता कशी ओळखता येते याविषयी माहिती दिली.

एटीआर लॅबोरेटरी, जळगाव येथील प्रशिक्षक सौ. वृषाली दुबे यांनी FoSTaC (Food Safety Training and Certification) संदर्भात प्रशिक्षण देत अन्न सुरक्षा मानकांचे पालन, स्वच्छता, वैयक्तिक आरोग्य, सुरक्षित उत्पादन प्रक्रिया, नोंदींचे व्यवस्थापन आणि कायदेशीर अनुपालनाचे महत्त्व स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी एमएसएमई (MSME) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ZED (Zero Defect Zero Effect) Certification Scheme विषयीही माहिती दिली. या योजनेद्वारे उद्योगांना गुणवत्तापूर्ण उत्पादन, पर्यावरण संरक्षण, ऊर्जा बचत, उत्पादन क्षमता वाढ, स्पर्धात्मकता आणि निर्यातक्षमतेसाठी मार्गदर्शन व प्रमाणपत्र सुविधा उपलब्ध होत असून पात्र उद्योगांना आर्थिक सहाय्यही दिले जाते, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी धुळे शहर दूध व्यावसायिक संघटनेचे अशोक चौगुले, प्रदीप कचवे, संदीप तनेजा, अन्न सुरक्षा अधिकारी शशिकांत राणे, तसेच अन्न व औषध प्रशासनातील अरविंद राऊत आणि मंगेश भावसार यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार यांनी केले, तर सतीश बहाळकर यांनी उपस्थित मान्यवर, तज्ज्ञ मार्गदर्शक आणि सहभागींचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

अन्न व औषध प्रशासन, धुळे यांनी भविष्यातही अशाच जनजागृतीपर आणि तांत्रिक मार्गदर्शनाच्या कार्यशाळांद्वारे सुरक्षित अन्न, गुणवत्तापूर्ण दुग्ध व्यवसाय आणि ग्राहक संरक्षणासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!