Homeक्राईमनागरिकांच्या सतर्कतेमुळे शिरपूरात एटीएम चोरीचा डाव फसला मध्यरात्रीचा थरार, पाठलागात संशयित...

नागरिकांच्या सतर्कतेमुळे शिरपूरात एटीएम चोरीचा डाव फसला मध्यरात्रीचा थरार, पाठलागात संशयित शेतात पसार; पिकअप वाहन पोलिसांच्या ताब्यात

शिरपूर | प्रतिनिधी

शिरपूर शहरात काल मध्यरात्री एटीएम फोडून मोठी रक्कम लंपास करण्याचा कट नागरिकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला असून, प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे. अज्ञात संशयितांनी नियोजनपूर्वक एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला असताना परिसरातील नागरिकांच्या जागरूकतेमुळे हा प्रकार वेळीच उधळून लावण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास काही इसम पिकअप वाहनातून एटीएमजवळ थांबले आणि मशीन फोडण्याचा प्रयत्न सुरू केला. असामान्य हालचाली लक्षात येताच नागरिकांनी आरडाओरड करत पाठलाग सुरू केला. नागरिकांचा वाढता पाठलाग व गोंधळ पाहून घाबरलेल्या संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढत जवळच्या शेतात अंधाराचा फायदा घेत फरार होण्याचा प्रयत्न केला.

घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पिकअप वाहन ताब्यात घेतले. वाहनामध्ये चोरीसाठी वापरण्यात येणारी उपकरणे असल्याची शक्यता असून, त्याची सखोल तपासणी सुरू आहे. वाहनाच्या नोंदणी क्रमांकावरून व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा माग काढण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत.

पोलिसांनी परिसरात तात्काळ नाकाबंदी केली असून आसपासच्या गावांमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. फरार आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे

नागरिकांच्या धाडस व सजगतेमुळे मोठी आर्थिक हानी टळली आहे. शिरपूर शहर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!