Homeमहत्त्वाचेबकरी ईदपूर्वी धुळे पोलिसांचा शहरात शक्तीप्रदर्शनात्मक रूट मार्च..! संवेदनशील भागांत कडेकोट...

बकरी ईदपूर्वी धुळे पोलिसांचा शहरात शक्तीप्रदर्शनात्मक रूट मार्च..! संवेदनशील भागांत कडेकोट बंदोबस्त; शांतता व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन सतर्क

शिरपुर | प्रतिनिधी

धुळे जिल्ह्यात दिनांक 28 मे 2026 रोजी मुस्लिम बांधवांचा बकरी ईद उत्सव साजरा होणार असून, उत्सवादरम्यान शहरात शांतता, सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी धुळे जिल्हा पोलिस प्रशासनाने व्यापक तयारी सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने मंगळवार दिनांक 26 मे 2026 रोजी सायंकाळी 6 ते 7 या वेळेत धुळे शहरातील संवेदनशील व मिश्रवस्ती भागांत पोलिसांचा भव्य पथसंचलन (रूट मार्च) आयोजित करण्यात आला.

पोलीस अधीक्षक धुळे श्री. विशाल आनंद व अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या रूट मार्चमध्ये पोलिस दलाने शहरातील विविध भागांतून शिस्तबद्ध संचलन करत नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केली. अरिहंत मंगल कार्यालय, गजानन कॉलनी पोलीस चौकी, भोईवाडा, वडजाई रोड, भोला बाजार, मच्छी बाजार, महादेवपुरा, मौलवीगंज, घड्याळवाली मशिद ते बारा पत्थर या परिसरातून पोलिसांनी संचलन केले.

सदर रूट मार्चमध्ये अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे शहर विभाग श्री. राजकुमार उपासे, स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा, शहर वाहतूक शाखा, पोलीस मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह धुळे शहर, आझादनगर, देवपूर, पश्चिम देवपूर, मोहाडी नगर व चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी व पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याशिवाय राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 6 तसेच होमगार्ड जवानांचाही सहभाग होता.

रूट मार्चदरम्यान पोलिस प्रशासनाकडून नागरिकांना शांतता राखण्याचे, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच कोणतीही संशयास्पद घटना आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. आगामी सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने घेतलेली ही खबरदारी आणि सज्जता शहरातील कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.

धुळे पोलिसांनी केलेल्या या प्रभावी शक्तीप्रदर्शनामुळे समाजकंटकांना स्पष्ट इशारा मिळाला असून, बकरी ईद उत्सव शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूरमध्ये गांजा तस्करांवर पोलिसांचा छापा! पॅकिंग सुरू असतानाच धाड; मध्य प्रदेशातील सरपंचासह तिघे पसार...

शिरपूर,  : गांजाची विक्री करण्यासाठी पॅकिंग सुरू असतानाच सांगवी पोलिसांनी धडक कारवाई करत छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळी असलेल्या तिघांनी पळ काढला. विशेष...

पळासनेर दरोडा प्रकरणी पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये! ३ कोटी ६ लाखांच्या लुटीने धुळे जिल्हा...

शिरपूर : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पळासनेर परिसरात तब्बल ३ कोटी ६ लाख रुपयांच्या रोकड रकमेवर दरोडा टाकण्यात आल्याच्या गंभीर घटनेने संपूर्ण धुळे जिल्ह्यात खळबळ...

पळासनेरजवळ महामार्गावर ३ कोटी ६ लाखांचा सशस्त्र दरोडा! कार अडवून चालकासह साथीदाराला बेदम मारहाण;...

शिरपूर : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पळासनेर परिसरात तब्बल ३ कोटी ६ लाख रुपयांच्या रोकड रकमेवर दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अज्ञात पाच...

शिरपूर शहर पोलीस ठाण्याचा ‘मेगा स्ट्राइक’! १ कोटी ५२ लाख ५० हजारांचा गांजा...

  शिरपूर : शिरपूर शहर पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत आंबाफाटा गावाच्या पुढील डोंगराळ भागात वनपट्ट्यावरील जमिनीवर बेकायदेशीररीत्या लागवड केलेले गांजाचे पीक उद्ध्वस्त केले....

शिरपूर पोलिसांचा ‘मेगा स्ट्राइक’! ₹७ कोटी ६७ लाखांचा गांजा उद्ध्वस्त! ३,०६८ किलो...

  शिरपूर, धुळे : शिरपूर तालुक्यातील महादेव दोंदवाडा परिसरात अनेरडॅम वन्यजीव अभयारण्याच्या हद्दीतील वनविभागाच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे गांजाची लागवड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिरपूर...

error: Content is protected !!