Homeक्राईममध्यरात्री धुळे पोलिसांचा ‘ऑपरेशन क्लीन स्वीप’..! बकरी ईदपूर्वी...

मध्यरात्री धुळे पोलिसांचा ‘ऑपरेशन क्लीन स्वीप’..! बकरी ईदपूर्वी जिल्हाभर धडक कोंबिंग; फरार आरोपी जेरबंद, १५ गोवंशांची सुटका, वाहतूक नियमभंग करणाऱ्यांकडून लाखोंचा दंड?

शिरपुर| प्रतिनिधी

बकरी ईद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री राबविलेल्या विशेष ‘नाकाबंदी व कोंबिंग ऑपरेशन’मुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये मोठी खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशानुसार जिल्हाभर एकाच वेळी धडक कारवाई करण्यात आली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत गुन्हेगार, अवैध धंदे, वाहतूक नियमभंग करणारे चालक आणि संशयितांवर कठोर कारवाई करण्यात आली.

दि. २६ मे रोजी रात्री १० ते १२ या वेळेत जिल्ह्यातील २४ महत्त्वाच्या नाक्यांवर कडक नाकाबंदी लावण्यात आली होती. या कारवाईदरम्यान पोलिसांनी तब्बल ९३७ वाहनांची तपासणी केली. संशयित वाहनांची झडती घेऊन चालकांची कसून चौकशी करण्यात आली.

या मोहिमेदरम्यान प्राणी संरक्षण कायद्यान्वये ३ गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे ४ लाख ९ हजार रुपये किमतीच्या १५ गोवंशांची सुटका करण्यात आली. अवैध जनावर वाहतुकीवर पोलिसांनी प्रभावी कारवाई करत संबंधितांविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.

अवैध मद्यनिर्मिती व हातभट्टी व्यवसायावरही पोलिसांनी मोठा प्रहार केला. जिल्ह्यातील विविध भागांत ५ हातभट्ट्यांवर छापेमारी करून १४ हजार ८०० रुपये किमतीची दारू व रसायन जागीच नष्ट करण्यात आले. या कारवाईमुळे अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेने देखील या मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी बजावली. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील दोन अट्टल फरार आरोपी हेमंत पाटील व पापा फरोज शहा यांना पोलिसांनी शिताफीने अटक करून बेड्या ठोकल्या. फरार आरोपींना पकडण्यात आलेल्या या कारवाईमुळे पोलिसांच्या गुप्त माहिती यंत्रणेची कार्यक्षमता पुन्हा अधोरेखित झाली.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात आली. २४२ वाहनचालकांकडून १ लाख ५७ हजार ४५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांविरोधात ड्रंक अँड ड्राईव्ह अंतर्गत कारवाई करत ३० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.

विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांनी २५ हिस्ट्रीशीटरांची पडताळणी केली. तसेच ७३ हॉटेल्स-ढाबे आणि २१ मोकळ्या मैदानांची तपासणी करून संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले.

कायदा मोडणाऱ्यांना पोलिसांचा स्पष्ट इशारा

जिल्ह्यात शांतता, सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा यापुढेही सातत्याने राबविण्यात येणार असून, गुन्हेगारी व अवैध कृत्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा धुळे पोलिस प्रशासनाने दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूरमध्ये गांजा तस्करांवर पोलिसांचा छापा! पॅकिंग सुरू असतानाच धाड; मध्य प्रदेशातील सरपंचासह तिघे पसार...

शिरपूर,  : गांजाची विक्री करण्यासाठी पॅकिंग सुरू असतानाच सांगवी पोलिसांनी धडक कारवाई करत छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळी असलेल्या तिघांनी पळ काढला. विशेष...

पळासनेर दरोडा प्रकरणी पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये! ३ कोटी ६ लाखांच्या लुटीने धुळे जिल्हा...

शिरपूर : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पळासनेर परिसरात तब्बल ३ कोटी ६ लाख रुपयांच्या रोकड रकमेवर दरोडा टाकण्यात आल्याच्या गंभीर घटनेने संपूर्ण धुळे जिल्ह्यात खळबळ...

पळासनेरजवळ महामार्गावर ३ कोटी ६ लाखांचा सशस्त्र दरोडा! कार अडवून चालकासह साथीदाराला बेदम मारहाण;...

शिरपूर : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पळासनेर परिसरात तब्बल ३ कोटी ६ लाख रुपयांच्या रोकड रकमेवर दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अज्ञात पाच...

शिरपूर शहर पोलीस ठाण्याचा ‘मेगा स्ट्राइक’! १ कोटी ५२ लाख ५० हजारांचा गांजा...

  शिरपूर : शिरपूर शहर पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत आंबाफाटा गावाच्या पुढील डोंगराळ भागात वनपट्ट्यावरील जमिनीवर बेकायदेशीररीत्या लागवड केलेले गांजाचे पीक उद्ध्वस्त केले....

शिरपूर पोलिसांचा ‘मेगा स्ट्राइक’! ₹७ कोटी ६७ लाखांचा गांजा उद्ध्वस्त! ३,०६८ किलो...

  शिरपूर, धुळे : शिरपूर तालुक्यातील महादेव दोंदवाडा परिसरात अनेरडॅम वन्यजीव अभयारण्याच्या हद्दीतील वनविभागाच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे गांजाची लागवड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिरपूर...

error: Content is protected !!