Homeक्राईममहामार्गावर बॅग लिफ्टिंग करणाऱ्या परराज्यातील टोळीचा शिरपूर तालुका पोलिसांनी केला पर्दाफाश! अवघ्या...

महामार्गावर बॅग लिफ्टिंग करणाऱ्या परराज्यातील टोळीचा शिरपूर तालुका पोलिसांनी केला पर्दाफाश! अवघ्या काही तासांत आरोपी जेरबंद; ५७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शिरपूर | प्रतिनिधी महामार्गावर प्रवाशांना टार्गेट करून बॅग लिफ्टिंग करणाऱ्या परराज्यातील गुन्हेगारांच्या टोळीवर शिरपूर तालुका पोलिसांनी जबरदस्त कारवाई करत मुख्य आरोपीला मुद्देमालासह जेरबंद केले आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे. दि. ०५ मे २०२६ रोजी सांगवी गावाच्या शिवारातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील देव मोगरा चहा हॉटेलसमोर उभ्या असलेल्या इनोव्हा (MH 41 AK 0101) गाडीतून अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीची बॅग लंपास केली होती. या बॅगेमध्ये रोख रक्कम, एटीएम कार्ड, डेबिट कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्ससह महत्त्वाची कागदपत्रे होती. घटनेनंतर शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. १४७/२०२६ अन्वये BNS कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि सततच्या पाठपुराव्यानंतर आरोपी मध्यप्रदेश राज्यातील धार जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कल्याण जगदोश आलावा (वय २५) रा. डेडगाव, ता. मनावर, जि. धार (मध्यप्रदेश) याला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास ११ मे २०२६ पर्यंत ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. चौकशीदरम्यान आरोपीकडून ₹५५ हजार रोख रक्कम, इयरबड्स, घड्याळ, विविध बँकांचे एटीएम व डेबिट कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स असा एकूण सुमारे ₹५७ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. सदरची उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या नेतृत्वात पोहेका सुनील पाठक, संतोष पाटील, योगेश मोरे, स्वप्नील बांगर आणि विजय डिवरे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!