Homeक्राईममुंबई-आग्रा महामार्गावर मृत्यूचा सापळा! भीषण धडकेत दोघांचा जागीच अंत; शिरपूर हादरले

मुंबई-आग्रा महामार्गावर मृत्यूचा सापळा! भीषण धडकेत दोघांचा जागीच अंत; शिरपूर हादरले

शिरपूर (प्रतिनिधी) : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी (दि. २२ एप्रिल) सकाळी सुमारे १० वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडून दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. उभ्या असलेल्या खाजगी प्रवासी वाहनाला मागून भरधाव आयशर ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत ही दुर्दैवी घटना घडली.

या भीषण अपघातात मनीषा राजेंद्र पाटील (वय ४६, रा. पिंपरखेड, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) आणि बंटी किशन जाधव (वय ३२, रा. हिसाळे, ता. शिरपूर, जि. धुळे) यांचा जागीच मृत्यू झाला. धडक इतकी प्रचंड होती की वाहनाचा चक्काचूर झाला आणि दोघांनाही गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच अंत झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूरहून हिसाळे गावाकडे जाणारे प्रवासी वाहन महामार्गावरील हॉटेल आरतीसमोर रस्त्याच्या कडेला उभे होते. त्याचवेळी मागून येणाऱ्या डी.डी. ०१ जी ९७५२ क्रमांकाच्या आयशर ट्रकने या वाहनाला जबर धडक दिली.

अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. जखमींना तात्काळ शासकीय रुग्णवाहिकेद्वारे शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप बस्सी यांनी तपासणी करून दोघांना मृत घोषित केले.

या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, मृत मनीषा पाटील या लग्नकार्याच्या निमित्ताने हिसाळे येथे आल्या होत्या. तब्येत बिघडल्याने उपचारासाठी शिरपूरला जाऊन परत येत असतानाच हा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात घडला. त्या नायब तहसीलदार विजय पाटील यांच्या भगिनी असल्याची माहिती समोर आली आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!