Homeराजकीयशिरपूर तालुक्यात ११८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी ३० जून रोजी आरक्षण सोडत ...

शिरपूर तालुक्यात ११८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी ३० जून रोजी आरक्षण सोडत पूर्वीची आरक्षण सोडत रद्द; सुधारित आदेशानुसार नव्याने प्रक्रिया

शिरपूर तालुक्यातील ११८ ग्रामपंचायतींच्या २०२५-२०३० या पंचवार्षिक कालावधीसाठी सरपंच पदाच्या आरक्षणासाठी नवीन सोडत प्रक्रिया येत्या ३० जून २०२५ रोजी होणार आहे. ग्रामविकास विभागाच्या सुधारित आदेशानुसार, यापूर्वी एप्रिल महिन्यात झालेली आरक्षण सोडत रद्द करण्यात आली असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नव्याने आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.

ग्रामविकास विभाग यांच्याकडे ५ मार्च २०२५ रोजीच्या अधिसूचनेनुसार, यापूर्वी शिरपूर तालुक्यात माहे एप्रिल २०२५ मध्ये ११८ ग्रामपंचायतींच्या २०२५-२०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या सरपंच पदाच्या निवडणुकीकरिता आरक्षण सोडत घेण्यात आली होती. यानुसार पैसा क्षेत्रातील ५० ग्रामपंचायतींचे सरपंच पद अनुसूचित जमाती करिता आरक्षित करण्यात आले होते. पेसाव्यतिरिक्त असलेल्या ६८ ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जाती करिता ४ ग्रामपंचायती, अनुसूचित जमाती करिता १४ ग्रामपंचायती, नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता १८ ग्रामपंचायती तर उर्वरित ३२ पदे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता आरक्षित करण्यात आली होती.

तथापि, ग्रामविकास विभाग मंत्रालय, मुंबई, यांचेकडील दिनांक १३ जून २०२५ रोजीच्या राजपत्रातील सुधारित निर्देशानुसार, यापूर्वी घेण्यात आलेली आरक्षण सोडत रद्द करून नव्याने आरक्षण सोडत घेणेबाबत सूचित करण्यात आले आहे.

त्यानुसार मा. जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडिल दि. १७ जून २०२५ रोजीच्या आदेशानुसार, शिरपूर तालुक्यातील २०२५ ते २०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ११८ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत सभा दिनांक ३०/६/२०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय शिरपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. सुधारित आरक्षणानुसार, पेसा क्षेत्रातील ५० ग्रामपंचायतीचे सरपंच पद अनुसूचित जमाती करिता आरक्षित करण्यात येणार आहे. पेसाव्यतिरिक्त असलेल्या ६८ ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जाती करिता ४ ग्रामपंचायती, अनुसूचित जमाती करिता १४ ग्रामपंचायती, नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता १९ ग्रामपंचायती तर उर्वरित ३१ पदे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता आरक्षित करण्यात येणार आहेत. सदर आरक्षण सोडल सभेसाठी तालुक्यातील सर्व आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, तसेच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व नागरिक यांनी उपस्थित राहणेबाबत याद्वारे आवाहन करण्यात येत आहे.

महेंद्र माळी

शिरपूर तहसीलदार

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!