Homeक्राईमहाडाखेड चेक पोस्टवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; ७.५३ लाखांचा प्रतिबंधित...

हाडाखेड चेक पोस्टवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; ७.५३ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त गुप्त माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; वॅगनारमधून ६,३४० पॅकेट गुटखा, पान मसाला व तंबाखू जप्त

शिरपूर | प्रतिनिधी

शिरपूर तालुक्यातील हाडाखेड चेक पोस्ट येथे अन्न व औषध प्रशासनाने गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत ₹७ लाख ५३ हजार ४०० किमतीचा महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा, पान मसाला व तंबाखू जप्त केला. या कारवाईत ६,३४० पॅकेट प्रतिबंधित अन्नपदार्थांसह मारुती वॅगनार (क्र. MP-09 ZB-3920) वाहन ताब्यात घेण्यात आले असून, तिघांविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, सांगवीकडून शिरपूरच्या दिशेने येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या मारुती वॅगनारमधून महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटखा व पान मसाल्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार हाडाखेड चेक पोस्टवर सापळा रचून संशयित वाहन अडविण्यात आले.

वाहनाची सखोल तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व तंबाखूचा साठा आढळून आला. त्यानंतर वाहन शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात आणून पंचनामा करण्यात आला. तपासणीदरम्यान ६,३४० पॅकेट प्रतिबंधित अन्नपदार्थ जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत ₹७,५३,४०० इतकी असल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी अतुल ब्राह्मणे (वाहन चालक), सौरभ ललवाणी (क्लीनर) आणि हेमंत मराठे (मालक) यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई सहाय्यक आयुक्त (अन्न) श्री. गो. वी. माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी श्री. आनंद पवार, श्री. शशिकांत राणे, श्री. अरविंद राऊत आणि श्री. मंगेश भावसार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

या धडक कारवाईमुळे प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्याची अवैध वाहतूक करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, अन्न व औषध प्रशासनाच्या या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!